Tata Car Discounts – सणसुदीच्या मुहूर्तावर टाटा कार्स वर मिळतोय 3 लाख रुपयांचा डिस्काऊंट

सणसुदीच्या मुहूर्तावर टाटा नेक्सॉन ईव्ही वर 3 लाख रुपयांचा डिस्काऊंट मिळतो आहे. पंच ईव्ही वर १ लाख 20 हजारांचा डिस्काउंट मिळतोय आणि टियागो ईव्ही वर 40 हजारांचा डिस्काउंट मिळतोय. या सोबत 6 महिने फ्री अनलिमिटेड फ़ास्ट चार्जिंग करण्याची सुविधा मिळणार आहे. नेक्सॉन च्या सर्वच ट्रिम वर 3 लाखांचा डिस्काउंट पंच च्या सर्व ट्रिम वर 1 लाख 20 हजाराचा डिस्काउंट मिळतोय अस नाही प्रत्येक मॉडल च्या ट्रिम वर वेग वेगळा डिस्काउंट आहे.

Published:

GXGssXMWgAAO uU

टाटा मोटर्स ने या सणासुदीत त्यांच्या इलेक्ट्रिक तसेच सीएनजी, पेट्रोल, डिझेल वाहनांवर ‘Festival of Cars’ या ऑफर अंतर्गत तब्बल ३ लाख रुपयांपर्यंत सूट दिलेली आहे. त्यामुळे टाटाच्या गाड्या कमालीच्या स्वस्त झाल्या आहेत. ह्युंदाई, मारुती आणि महिंद्राला या नवीन ऑफर मुळे मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

सर्वात प्रथम इलेक्ट्रिक वाहनाची प्राइस कट बघूयात

ज्याना इलेक्ट्रिक वाहन खरेदी करायचं होत परंतु पेट्रोल पेक्षा जास्त किंमत असल्याने घेऊ शकता न्हावते त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे.

टाटा नेक्सॉन ईव्ही डिस्काउंट ऑफर

टाटा नेक्सॉन मध्ये सर्वात जबरदस्त किमतीत घट झाली आहे. 14.49 लाख रुपयांपासून सुरु होणारी ही इलेक्ट्रिक कार आता 12.49 लाख रुपयांपासून सुरु होते आहे. जुनी किंमत 14.49 लाख रुपये इतकी होती म्हणजे बेस मॉडल ला 2 लाख रुपये डिस्काउंट मिळतो आहे. टॉप मॉडल मध्ये जर पाहिलं तर 3 लाख रुपये डिस्काउंट मिळतो आहे. नेक्सॉन ईव्ही च्या टॉप ट्रिम ची किंमत 19.29 लाख रुपये होती ती आता घटून 16.29 लाख रुपये झाली आहे. नेक्सॉन ईव्ही मध्ये 30 kWh बैटरी पैक असणाऱ्या गाडीत 325 किमी क्लेम रेंज मिळते तर 40.5 kWh बैटरी पैक असणाऱ्या गाडीत 465 किलोमीटर रेंज मिळते. संबंधित ऑफर 10 सप्टेंबर 2024 पासून लागू झाल्या आहेत.

टाटा टियागो ईव्ही डिस्काउंट ऑफर

टाटा मोटर्स ची एंट्री लेव्हल ईव्ही – टियागो आता 40 हजारानी स्वस्त झाली आहे. यानंतर ही इलेफ्ट्रिक हॅचबॅक ची सुरुवातीची किंमत 7.99 लाख रुपये आहे. आणि टॉप ट्रिम 11.39 लाखांत मिळत होत ते आता तुम्हाला 10.89 लाखांत नर आहे. टायगोच्या काही खास ट्रिम वरच तुम्हाला डिस्काऊंट पाहायला मिळणार आहे त्यामुळे शोरूम मधून खात्री करुन घ्या. या गाडीमध्ये 19.2 kWh बैटरी असणारी गादी 250 किमी रेंज देते आणि 24 kWh क्षमतेची बैटरी ऑप्शन असणारी गाडी 315 किमी रेंज देते. आपणाला सांगू इच्छितो की हे प्राइस कट 31 ऑक्टोबर 2024 पर्यंत वैध असणार आहेत त्यामुळे तुम्हाला गाडी घ्यायची असेल तर त्वरित बुक करा.

टाटा पंच ईव्ही डिस्काउंट ऑफर

आता पर्यंत सर्वात जबरदस्त प्रेसन्स असणारी टाटा मोटर्स ची पंच ईव्ही सुद्धा 1 लाख 20 हजारांनी स्वस्त झाली आहे. पंच चे स्टार्टिंग मॉडल 10.99 लाख रुपयांच्या एक्स शोरूम किमतीमध्ये उपलब्ध होती ती आता 1 लाख रुपयांच्या डिस्काऊंट सह 9.99 लाखांत मिळणार  आहे. या गाडीचे टॉप मॉडल 14.99 लाख रुपयांत उपलब्ध होते यावर 1 लाख 20 हजारांनाच डिस्काउंट मिळतो आहे आणि किंमत झालीय 13.79 लाख रुपये एक्स शोरूम.

सर्व इलेक्ट्रिक चार चाकी वाहनांवर 6 महिने फ़ास्ट चार्जिंग ची सुविधा टाटा मोटर्स देणार आहे. देशात टेबल 5500 पेक्षा ही जास्त चार्जर्स वर ग्राहक फ्री मध्ये 6 महिने गाडी चार्ज करू शकतात. म्हणजे इथेही ग्राहकांचा फायदाच होणार आहे..

ICE वाहनांच्या प्राइस कट

इलेक्ट्रिक कार्स प्रमाणे टाटा मोटर्स ने सीएनजी, पेट्रोल आणि डिझेल कार्स वर सुद्धा बाँपर सुट दिली आहे.

all pv banner

टियागो ICE ची बेस मॉडल ची किंमत आता 4.99 लाखांपासून सुरू होत आहे. या गाडीवर 65 हजारांना डिस्काउंट मिळत आहे. या गाडीला टक्कर देणारी वाहन फक्त किमतीच्या जोरावर पुढं होती पण आता ती सुद्धा कपात झाल्याने बेस्ट सेफ्टी असलेली स्वदेशी सीएनजी गाडी ग्राहकाना या दिवाळीत घेण्याची संधी मिळणार आहे.

टिगोर वर 30 हजारांचा डिस्काउंट मिळत असल्याने आता बेस वेरिएंट 5.99 लाख रुपयांपासून सुरु होते आहे. या गाडीला जबरदस्त मागणी होतीच पण आता डिस्काऊंट मूळ सेल्स फिगर जबरदस्त वाढणार असल्याचे संकेत आहेत. अल्ट्रोज वर 45 हजारांचा डिस्काउंट दिला जात असल्याने गाडीची स्टार्टींग प्राइस 6.49 लाख रुपये एक्स शोरूम झाली आहे. नेक्सॉन वर 80 हजारांचा डिस्काउंट दिला असल्याने किंमत सुरु होते आहे 7.99 लाखांपासून. हॅरिअर वर 1.60 लाखांचा डिस्काउंट मिळत असल्याने किंमत सुरु होते 14.99 लाखांपासून आणि सफारी वर 1.80 लाखांचा डिस्काउंट मिळत असल्याने किमत सुरु होते आहे 15.49 लाखांपासून. या व्यतिरिक्त तुम्ही एक्स्ट्रा 45 हजारांचा एक्सचेंज बोनस सुद्धा मिळवू शकता ज्यामुळे तुमचे सेव्हिंग्स अजुन वाढणार आहेत.

तुम्ही कोणती गाडी घेण्याचा प्लान आखला आहे कमेंट मध्ये जरूर कळवा. या पोस्ट बद्दल आपल्या प्रतिक्रिया लिहा. जय महाराष्ट्र.

Photo of author

Ajinkya Sid

२०१० पासून ब्लॉग लिखाण करणारा अजिंक्य सध्या एक मराठी युट्युबर असून त्याला ऑटो मोबाइल क्षेत्रातील माहिती लिहिण्याची आवड आहे.

Leave a Comment