भारतातील नंबर १ कार निर्माता कंपनी असलेल्या मारुती सुझुकी इंडिया ने त्यांच्या नव्या अपडेटेड स्विफ्ट ला अजून एक सीएनजी अपडेट देत ग्राहकांना गणपती उत्सवाची गॉड बातमी दिली आहे. इतर कंपन्या धडाधड गाड्या लाँच करुन सुद्धा भारतीय ग्राहक फक्त स्विफ्ट सीएनजी ची वाट बघत होते आणि ही गाडी आता लवकरच शोरूम वर उपलब्ध होणार आहे.
मारुतीने स्विफ्ट सीएनजी लाँच केली असून गाडीमध्ये कोण कोणते फिचर्स दिले आहेत आणि महाराष्ट्रात किंमत किती आहे हे या पोस्ट च्या माध्यमातून सविस्तर बघूयात.
Maruti Swift CNG लाँच झाली
12 सप्टेंबर 2024 रोजी सुझुकी स्विफ्ट चे सोशल मीडिया च्या माध्यमातून ऑफिशिअली अनावरण करण्यात आले असून या गाडीच्या पेट्रोल वर्जनलाच सीएनजी शी टिक करुन मार्किट मध्ये उपलब्ध करण्यात आले आहे. तुम्हाला सांगू इच्छितो की मे महिन्याच्या ९ तारखेला मीडिया समोर चौथ्या पिढीच्या पेट्रोल स्विफ्ट चे लाँच करण्यात आले होते.
हे पण ट्राय करा – अपडेटेड मारुती स्विफ्टबद्दल ‘ह्या’ गोष्टी तुम्हाला महितीचं हव्या !
फिचर्स आणि तंत्रज्ञान
सीएनजी स्विफ्ट मध्ये 7 इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिसिटीम, ऑटो क्लाइमेट कंट्रोल एसी, रिअर एसी व्हेंट्स, वायरलेस स्मार्टफोन चार्जर, कनेक्टेड कार टेक, 60:40 स्पिट सीट्स आणि सेफ्टी मध्ये इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी प्रोग्राम, सहा एअरबॅग, रिव्हर्स पार्किंग सेन्सर्स सह कैमरा, रिअर डी-फॉगर, ऑटो हेडलँप, पुश स्टार्ट-स्टॉप बटन विद स्मार्ट की, हिल होल्ड असिस्ट, अँटिलॉक ब्रेकिंग सिस्टम आणि इलेक्ट्रॉनिक ब्रेक डिस्ट्रुब्यूशन सारखे फिचर्स दिले आहेत.
नव्या सीएनजी स्विफ्ट मध्ये सुझुकी चे नामी S-CNG तंत्रज्ञान दिले असून या अपडेट मध्ये कंपनीने सीएनजी गॅस भरण्याचा नोब पेट्रोल कॅप शेजारी दिला आहे. गाडीला सुरु होण्यासाठी पेट्रोल ची आवश्यकता असेल परंतु स्टार्ट झाल्यानंतर ऑटोमैटिक सीएनजी वर शिफ्ट होते.
स्विफ्ट सीएनजी प्राइस
टॉप मॉडल मध्ये सीएनजी ही ग्राहकांची मागणी असते आणि मारुती सुझुकीला इतर कंपन्यांकडून मिळत असलेले कॉम्पिटिशन यामुळे स्विफ्ट सीएनजी ला VXI, VXI (O) आणि ZXI या ट्रिम्स मध्ये उपलब्ध करुन देण्यात आले आहे. गाडीच्या टॉप सीएनजी ZXI ट्रिम ची एक्स शोरूम किमत 9 लाख 19 हजार पाचशे रुपये ठेवण्यात आली आहे. VXI (O) सीएनजी ची एक्स शोरूम किंमत 8 लाख 46 हजार पाचशे रुपये तर VXI सीएनजी ची एक्स शोरूम किंमत 8 लाख 19 हजार पाचशे रुपये ठेवण्यात आली आहे.
इंजिन पॉवर व मायलेज
सीएनजी स्विफ्ट मध्ये नवीन झेड 12 ई सिरीज चे 3 सिलेंडर इंजिन दिले असून हे इंजिन 1.2 लिटर क्षमतेचे आहे. सीएनजी इंधनावर हे इंजिन 69.75 PS पॉवर आणि 101.8 Nm टॉर्क निर्माण करते. कंपनीच्या सांगण्यानुसार स्विफ्ट सीएनजी पेट्रोल मोड मध्ये 24.80 kmpl चे आणि सीएनजी मोड मध्ये 32.85 kmkg चे मायलेज क्लेम करते. सीएनजी मध्ये फक्त ५ स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स ऑप्शन दिला आहे.
टाटा आणि ह्युंदाई ची टक्कर
सध्या भारतीय बाजारात ह्युंदाई आणि टाटा मोटर्स कडून सुझुकीला काट्याची टक्कर मिळत आहे. टाटा मोटर्स ने सीएनजी मध्ये ट्विन सिलेंडर तंत्रज्ञान आणि चांगली सेफ्टी दिली असल्याने ग्राहक पंच किंवा टिगोर, टियागो घेणं पसंत करत आहे. दुसरीकडे हुंडाई ने नुकतीच एक्स्टर आणि नियोस ट्विन सिलेंडर सह लाँच केली असल्याने ग्राहकांना बूट मध्ये जबरदस्त स्पेस मिळत असल्याने ग्राहक तिकडे वळत आहेत.