New Maruti Desire – मिळणार “35 च मायलेज” सगळ्यांच मार्केट खाणार आगामी डिजायर

सध्याची मारुती सुझुकी डिजायर बंद होणार असून ज्यांनी या गाडीला बुक केले आहे त्यांच्याकडे "मोठा डिस्काउंट" घेण्याची एक सुवर्ण स्वतःहून चालून आली आहे

Published:

सगळं बिन बोभाट सुरु असताना कंपनीच्या कामगारांकडून एक चूक घडली आणि राहिलेला डिजायर चा स्टॉक खात्र्यात आला. याच कारण काय तर मारुती सुझुकी डिजायर चे नवीन फेसलिफ्ट लाँच करणार असून नुकतीच गाडीचा फोटो लीक झाला आहे.

नवीन मारुती डिजायर फेसलिफ्ट

ही गाडी दिसायला फॉक्स वैगन व्हर्टस सारखी असून 35+kmpl मायलेज आणि ADAS सारख्या बेस्ट फिचर्स सह येणार आहे.. मारुती काय संपूर्ण बातमी जाणून घेऊया.

फेस्टिवल सिझन आहे त्यामुळे आपल्याला एक विशिष्ट मुहूर्तावर गाडी मिळावी यासाठी धड-पडत आहेत. काहींनी या येत्या दसरा – दिवाळीला मारुती सुझुकी ची डिजायर बुक केली असेल.

2024 maruti dzire leaks 1

आता ज्याना जून व्हेरिएंट पसंत आहे त्यांचं सोडा पण नवीन जनरेशन ला हे नाव मॉडल बघितल्यावर जून व्हेरिएंट घ्यायची इंच्छा राहील का? येणार मॉडल जबरदस्त दिसतंय.

आता कंपनीला हे मॉडल इतक्या लवकर दाखवायचं नसावं कारण जुना स्टॉक खात्र्यात येईल पण कंपनीकडून एक चूक झाली आणि नवी गाडी कॅमेरात कैद झाली.. असो.. गाडीचे फिचर्स सांगतोच पण यामध्ये फोटो लीक मुळे तुम्हाला चांगला डिस्काऊंट मिळवण्याची संधी आली आहे.

नवीन व्हेरिएंट अचानक समोर आल्याने बरेच लोक जुन मॉडल रद्द करुन नवीन साठी थांबतील आणि तुम्ही जून व्हेरिएंट घेणार असाल तर थोडं bargening करा म्हणजे झकास पैकी पैसे वाचतील.

आता जरा नव्या मॉडल वर नजर टाकूयात.

3rd जनरेशन डिझायर ची सध्या मार्किट मध्ये उत्तम विक्री सुरू आहे. कॉम्पैक्ट सेडान फॉर्मेट मध्ये होंडा अमेझ, ह्युंदाई औरा आणि टाटा टीगोर यांना भिडत गाडीचे 10 ते 12 हजार युनिट्स विकले जात आहेत. विक्री च्या बाबत गाडी नेहमीच टॉप 10 मध्ये आपला स्थान ठिकवते. आता नवीन फेसलिफ्ट लाँच झाल्यावर गाडी रेकॉर्ड मोडीत काढू शकते इतकेच नाही तर ही स्विफ्ट ला सुद्धा धोका बनू शकते. कारण भुरळ घालणारी डिजाईन आणि फिचर्स या आगामी गाडीत मिळणार आहेत..

2024 मारुती सुझुकी डिझायर फिचर्स आणि डिजाइन

डिजायर फेसलिफ्ट अपडेट अनेक स्टाइलिंग इन्हान्समेंट सह येण्यासाठी सज्ज आहे.. गाडीमध्ये नवीन डिजाइन असणारा बँपर आणि स्लिक पॅटर्न असलेली हेडलँप या फोटो मध्ये दिसते आहे. गाडीचा शेप हा बॉक्सी कट्स असणार असल्याने गाडी व्हर्टस सारखी छबी देते.. गाडीच्या मागे नवीन टेल लैंप, बूट गेट आणि बम्पर या अपडेट मध्ये मिळणार आहे..

गाडीत नव्या डिजाइन चे 16 इंच आलोय व्हील्स दिले आहेत.. सध्याच्या ट्रेंड प्रमाणे सन रूफ सुद्धा गाडीत दिला आहे. गाडीचे डायमेन्सन्स आणि प्लेटफॉर्म पूर्वी सारखेच असतील त्यामध्ये गाडी जास्त काही बदल करणार नाही. पण गाडीचा चेहरा मोहरा बदलणार आहे. केबिन सुद्धा अपडेट केलं असेल ज्यामध्ये मारुती सुझुकी बलेनो सारखं डॅशबोर्ड प्रीमियम डॅशबोर्ड मिळेल. मारुतीने या गाडीत ऐपल कार प्ले आणि एंड्राइड ऑटो सारखी स्मार्टफोन कनेक्टिविटी आणि कनेक्टेड कार तंत्रज्ञानासह 9 इंच फ्लोटिंग टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम देखील दिली आहे. नव्या डिजयरला ADAS, वेंटिलेट्ड सीट्स, इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक सोबत ऑटो होल्ड फंक्शन, 360-डिग्री कॅमेर आणि वॉइस असिस्टेड सन रूफ यांसारखी कामाचे फिचर्स जोडले आहेत. मारुतीने भारतीय स्विफ्ट ला 360 डिग्री कैमरा ऑफर केला नाहीये पण अंतर राष्ट्रीय स्विफ्ट मध्ये तो दिला आहे. त्यामुळे भारतात हे फिचर स्विफ्ट ला मारक ठरेल किंवा नाही हे ही गाडी बाजारात आल्यावर समजेल.

इंजिन पॉवर आणि मायलेज

डिजायर फेसलिफ्ट मध्ये स्विफ्टचेच नवीन Z सिरीज 1.2 लिटर, 3 सिलेंडर पेट्रोल इंजिन दिल जाईल. हे इजिन मायलेज आणि परफॉर्मन्स दोन्ही मध्ये उत्कृष्ट असेल. गाडीत ऑटोमैटिक आणि मैन्युअल गियरबॉक्स ऑप्शन मिळेल, पेट्रोल सोबत सीएनजी सुद्धा ऑप्शन मिळेल. रूमर्स असे आहेत की डिजायर मध्ये हाइब्रिड तंत्रज्ञान दिल जाईल ज्याने गाडीच मायलेज खतरनाक असेल. सीएनजी मध्ये ही गाडी 35 kmpl पेक्षा ही जास्त मायलेज प्रदान करेल.

मारुती नव्या डिजयरला आधुनिक फिचर्स आणि अपडेट्स सह लाँच करणार आहे त्यामुळे गाडीची किंमत सध्याच्या मॉडल पेक्षा 30 ते 70 हजारांनी मागण्याची शक्यता आहे.. गाडीचे बेसिक व्हेरिएंट 7 लाखांपासून सुरू होईल.. तुम्ही या आगामी अपडेट फेसलीफ्टेड डिजायर ची वाट पाहणार की ऑनगोइंग मॉडल खरेदी करणार कॉमेंट मध्ये नक्की सांगा.. जय महाराष्ट्र..

Photo of author

Ajinkya Sid

२०१० पासून ब्लॉग लिखाण करणारा अजिंक्य सध्या एक मराठी युट्युबर असून त्याला ऑटो मोबाइल क्षेत्रातील माहिती लिहिण्याची आवड आहे.

Leave a Comment