Tata Motors Rewire: Scrap your Vehicle Online टाटा मोटर्स रिवायर

Published:

टाटा मोटर्सने भारतातील रस्त्यावरून धावणारे कार,ट्रक, टेम्पो सारखे जुने आणि अतिवापरात असणारे वाहने रिसायकल करण्यासाठी एक फ्रँचायझी बनावली आहे. ज्यामध्ये १५ वर्षापेक्षा अधिक वापरात असणाऱ्या आणि प्रदूषण करणाऱ्या वाहनांना आदरणीयरीत्या स्क्रॅप करून पुन्हा वापरात आणले जातात, ज्यामुळे पर्यावरणाला होणारा वाढत्या प्रदूषणाचा धोका टळला जातो, REWIRE stands for “Recycle with Respect.

REWIRE: Recycle with Respectरिवायर म्हणजे काय ?

रिवायर म्हणजे रिसायकल विथ रिस्पेक्ट . या ठिकाणी कोणत्याही ब्रँडची – कोणत्याही कंपनीची कार असो, पॅसेंजर व्हेईकलच नाही तर कमर्शियल व्हेईकल सुद्धा स्क्रॅप होतात. या एरियात प्रतिवर्षी पंधरा हजार कमर्शियल वाहनांना डिसमेंटल आणि डिपोल्यूट केले जातात.

जुन्या वाहनांना scrap करण्याची का गरज पडते?

नवीन वाहनांच्या तुलनेत जुनी वाहन जी दहा ते पंधरा वर्षे वापरलेले आहेत ते जास्त प्रदूषण करतात. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर नवीन वाहनांच्या तुलनेत जुने वापरलेले ट्रक किंवा कार हे 4 ते 6% अधिक कार्बन डाय-ऑक्साइड तयार करतात.

गाडी कधी स्क्रॅप करावी लागणार?

गव्हर्मेंट स्क्रॅप पॉलिसीच्या अनुसार कोणतीही पॅसेंजर व्हेईकल तुम्हाला पंधरा वर्षानंतर पुन्हा री रजिस्ट्रेशन करावी लागणार आहे आणि त्यासाठी फिटनेस सर्टिफिकेटची गरज लागणार आहे, जर ही गाडी पास झाली तर तुम्हाला ती गाडी वापरता येऊ शकणार आहे आणि जर ही गाडी फेल झाली तर तुम्हाला त्या गाडीतला स्क्रॅप करावे लागणार आहे.

जे लोक वाहनांना REWIRE रिसायकल करत नाहीयेत किंवा स्क्रॅप करत नाहीयेत त्या वाहनांचा पर्यावरणावर शिवाय वाहन चालकावर आणि पॅसेंजरवर काय परिणाम होतो?

जुन्या वाहनांना तुम्ही नवीन वाहनांनी रिप्लेस केलं तर तुमचं लॅमिनेशन सोबत टोटल कॉस्ट ऑफ ओनरशिप सुद्धा कमी होऊ शकते.

जुनं वाहन स्क्रॅपसाठी दिलं तर तुम्हाला नवीन वाहन खरेदी करताना काय काय फायदे मिळू शकतात?

ग्राहकांना स्क्रॅपेस्ट सर्टिफिकेट मिळणार आहे जे सर्टिफिकेट दाखवून ग्राहक नवीन वाहन खरेदी दरम्यान रोड टॅक्सवर, इन्शुरन्सवर सवलत मिळवू शकणार आहेत, सोबत गव्हर्मेंट चे असे काही इन्सेंटिव्ह आहेत ज्या मार्फत नवीन गाडी खरेदी करताना ग्राहकांचा फायदा होईल. 

Recycle with Respect process वेहिकल स्क्रॅपिंगची प्रोसेस

  • तुम्हाला तुमच्या वाहनांना स्क्रॅप करायचं असेल, तर टाटा मोटर्स रिवायर फॅसिलिटी मध्ये तुम्हाला तुमच्या वाहनांना घेऊन जायचं आहे, त्यानंतर तुमच्या वाहनाची तपासणी केली जाईल, या वाहनाचं इवोल्युएशन केलं जाईल, त्यानंतर त्या वाहनाची काय किंमत ठरू शकते ती किंमत तुम्हाला सांगितली जाईल, जर तुम्ही त्या किमतीशी सहमत असाल तर वाहनाच्या स्क्रॅपिंगची पुढील प्रक्रिया सुरू केली जाईल. 
  • वाहनाच्या स्क्रॅपिंगच्या प्रोसेस दरम्यान पहिली स्टेप म्हणजे वाहनाचा आरटीओकडून डी रजिस्ट्रेशन करणे याचा अर्थ असा की आता ते वाहन रस्त्यावर धावू शकणार नाहीये त्या वाहनाचं रजिस्ट्रेशन संपूर्णपणे संपलेला आहे.
  • या स्टेप मध्ये गाडीला डिपॉझिट केलं जातं म्हणजे गाडीमध्ये तब्बल आठ प्रकाराचे तेल वापरले जातात ज्यामध्ये विणशील वॉशर आलं ते रिमूव केले जातात इंजिन ऑइल रिमूव केला जातो याप्रकारे गाडीतले सगळ्या आठ प्रकारांचे हानिकारक तेल काढून टाकले जातात. 
  • आता गाडी जेव्हा स्क्रॅपिंग साठी येते त्यावेळेस ती गाडी संपूर्णपणे खराब झालेली असेल किंवा त्या गाडीमध्ये सगळे पार्ट्स खराब झालेले असतील असा अजिबात नाहीये, त्यामुळे कम्प्युटरच्या मदतीने इव्हॅल्युएशनच्या नंतर या गाडीच्या चांगल्या पाठसाठी एक बारकोड जनरेट केला जातो जो बारकोड या गाडीच्या चांगल्या पुन्हा वापरात येणाऱ्या वेगवेगळ्या पार्टस वर चिकटवला जातो जेणेकरून ते पार्ट्स पुन्हा एकदा उपयोगात येतील. 
  • बारकोड चिकटवल्यानंतर या गाडीच्या संपूर्ण पार्टला गाडीपासून वेगळं केलं जातं दरवाजे बंपर सीड्स लाईट्स चाके हे सगळे पार्ट गाडी पासून वेगळे होतात. इंजिन सस्पेन्शन सेटअप गेअर सेटअप या सगळ्या महत्त्वाच्या पार्ट या गाडी पासून वेगळं केलं जातं. डॅशबोर्ड स्टेरिंग जे काही रबर वाले पाठ आहेत त्या सगळ्या पार्टनर गाडी पासून वेगळं केलं जातं, यानंतर गाडीचा फक्त उरतो तो म्हणजे धातूंचा सांगाडा. 
  • आता उरलेला जो काही धातूचा सांगाडा आहे त्या सांगाड्याला छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये कट करून ते तुकडे बॅनर मशीन मध्ये टाकले जातात या मशीन मध्ये असणाऱ्या हायड्रोलिक प्रेशर च्या मदतीने त्या तुकड्यांना अधिक लहान आणि पातळ केलं जातं. कमर्शियल वाहनांची स्क्रॅपिंग प्रक्रिया थोडी वेगळी आहे कमर्शियल वाहनांच्या सगळ्या पार्ट्सना एका स्टेशनवर रिमूव केला जातो . पावर ट्रेन टायर ट्रान्समिशन सारख्या पार्ट्स ना रिमूव करण्यासाठी डेडिकेटेड डीप डिसमेंटनिंग एरिया केलेले आहेत.
  • वाहनांच्या सोर्सिंग पासून ऑपरेशन पर्यंतचा जो काही संपूर्ण प्रोसेस वाहनांच्या सोर्सिंग पासून ऑपरेशन पर्यंत जी काही प्रक्रिया आहे ती प्रक्रिया इंटिग्रेटेड आयटी सिस्टीमच्या मदतीने मॅनेज केली जाते. यानंतर स्क्राप केलेल्या वाहनांच्या बारीक आकारातल्या पार्ट्सना वेगवेगळ्या भागांमध्ये विभाजन जातं जसं की लोखंडाचे पार्ट ,रबर पार्ट, प्लास्टिक पार्ट, धातूचे पार्ट्स, काचेचे पार्ट्स वेगवेगळे केले जातात. या पार्ट्सना रजिस्ट्रेशन आहेत जे काही या पार्टनर रिसायकल करू शकतील अशा वेंडर ना पुढे दिलं जातं. 
Photo of author

Aishwarya Potdar

मला ऑटोमोबाइल फिल्डमधली माहिती वाचायला आणि या ब्लॉगच्या मदतीने तुमच्यापर्यंत सरळ, सोप्या मराठी भाषेत मांडायला खूप आवडते. २०१९ पासून मी ह्या क्षेत्रात वेगवेगळ्या ब्लॉगवर काम करत आहे. तुम्हाला ह्या पेजवर नवीन कार, इलेक्ट्रिक कार-बाईक आणि स्कूटर याचसोबत ऑटोमोबाईलमधील येणारे नवे अपडेट यांची संपूर्ण माहिती मिळेल.

Leave a Comment