महिंद्रा BE 6 ची किंमत रु. 26.9 लाख, जाणून घ्या Mahindra BE 6 Top Variant Price

Published:

महेंद्रची इलेक्ट्रिक एसयूव्ही महिंद्रा BE 6 ही तीन मोठ्या बॅटरी पॅक मध्ये उपलब्ध असणार आहे, पॅक वन, पॅक टू आणि पॅक थ्री जिची किंमत 18.9 लाखापासून चालू होणार आहे. महिंद्राच्या फ्रेश ‘BE’ सब- ब्रँड डेव्हलपमेंटच्या अंडर असणार महिंद्रा BE 6 हे पहिलं इलेक्ट्रिक मॉडेल आहे, महिंद्रा बी इ सिक्स हे मॉडेल नंबर 2024 मध्ये सादर करण्यात आले होते. चला जाणून घेवूया या कारबद्दल संपूर्ण माहिती. Mahindra BE 6 Top Variant Pricing

या कारच्या इंटिरियर बाबतीत माहिती देता कार मध्ये बीई लोगो असणार स्ट्रेअरिंग व्हील, ड्राइव्ह मोड शिफ्टर सोबत ग्रे कलर चे अपहोल्स्ट्री  सीट्स मिळतात. ॲडव्हान्स फीचर्स मध्ये मल्टीझोन एसी आणि वायरलेस फोन चार्जेस आणि अम्बिअन लाईटींग पॅटर्न आणि पॅरानॉमिक क्लास रूप आणि , ड्युअल डिजिटल डिस्प्ले- ड्रायव्हर डिस्प्ले आणि इन्फोटेनमेंटसाठी प्रत्येकी 10.25-इंच युनिट यांचा समावेश आहे.

महिंद्रा BE 6 इंटीरियर

या इलेक्ट्रिक कार मध्ये आकर्षक असणाऱ्या गोष्टीत हेडलाइट्स आणि सी आकाराचे एलईडी DRLS मिळतात, शिवाय या कारमध्ये 19 इंचाचा एरोडायनामिकली डिझाईन केलेले R19 डायमंड-कट अलॉय व्हील मिळतात, ज्याच्यामध्ये 20 इंचाचा अलॉय व्हील्सचा पर्याय सुद्धा मिळतो. याच सोबत फ्लश-प्रकारचे डोअर हँडल, हाय पोझिशन बुटलिड आणि सी शेप एलईडी टेललाईट यामध्ये मिळतात.महिंद्रा BE 6 इलेक्ट्रिक कारच्या सेफ्टी फीचर्स मध्ये 7 एअरबॅग, ISOFIX चाइल्ड सीट माउंटिंग पॉइंट्स, TPMS, इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक, पार्क असिस्ट , 360 डिग्री कॅमेरा शिवाय ऑटोनॉमस इमर्जन्सी ब्रेकिंग, फॉरवर्ड कॉलेज कंट्रोल, ऍडॉप्टीव्ह क्रूज कंट्रोल यांसारखे फिचर्स मिळतात.

हेपण वाचा: टाटा मोटर्सच्या अपकमिंग फॅमिली कार 2025- Tata Motors upcoming cars

महिंद्रा BE 6 बॅटरी पॅक

महिंद्रा BE 6 कारमधले बॅटरी पॅक वेगवेगळी रेंज पुरवतात, यातला पहिला बॅटरी पॅक जो 59 kWh पॅक एका चार्जवर 535 किलोमीटर इतकी रेंज मिळून देतो तर 79 kWh बॅटरी पॅक एका चार्जवर 683 किलोमीटर पर्यंतची रेंज मिळून येतो, यामध्ये असणारी इलेक्ट्रिक मोटर 231 PS आणि 286 PS इतकी पावर जनरेट करते, तर 380 NM इतका टॉर्क तयार करते.

Photo of author

Aishwarya Potdar

मला ऑटोमोबाइल फिल्डमधली माहिती वाचायला आणि या ब्लॉगच्या मदतीने तुमच्यापर्यंत सरळ, सोप्या मराठी भाषेत मांडायला खूप आवडते. २०१९ पासून मी ह्या क्षेत्रात वेगवेगळ्या ब्लॉगवर काम करत आहे. तुम्हाला ह्या पेजवर नवीन कार, इलेक्ट्रिक कार-बाईक आणि स्कूटर याचसोबत ऑटोमोबाईलमधील येणारे नवे अपडेट यांची संपूर्ण माहिती मिळेल.

Leave a Comment