ह्युंडाईची पहिली इलेक्ट्रिक कार क्रेटा इलेक्ट्रिक हिला लवकरच भारतामध्ये मोबिलिटी एक ग्लोबल 2025 या कार्यक्रमांमध्ये लॉन्च करण्यात येणार आहे आता नुकतीच क्रेटा इलेक्ट्रिक बाबतीत आतुरता लागून ठेवणारे अशी बातमी बाहेर पडलेले आहे या क्रेटा ईव्हीचे इंटेरियर कसे असेल याची सिक्रेट माहिती बाहेर पडलेली आहे तुम्ही सुध्दा क्रेटा इलेक्ट्रिकचे लॉन्चिंग आधीच फॅन झालेले असाल तर खालील माहिती वाचा. Hyundai Creta Electric Interiors details Revealed
Hyundai Creta Electric इंटीरियर
क्रेटा इलेक्ट्रिक SUV च्या इलेक्ट्रिक फीचर्समध्ये सगळ्यात आधी आपण जाणून घेऊया या कारच्या डॅशबोर्ड बाबतीत माहिती 26.03cm (10.25”) ड्युअल कर्व्हिलिनियर इन्फोटेनमेंट आणि डिजिटल क्लस्टर स्क्रीन दिलेली आहे, ज्यामध्ये अनेक कंट्रोल आणि कनेक्टिव्हिटी यांचा समावेश होतो, शिवाय यामध्ये ईव्ही-प्रेरित तीन-स्पोक स्टीयरिंग व्हील सुद्धा दिलेला आहे.
क्रेटा इलेक्ट्रिकमधल्या सीट्स अतिशय आरामदायी
या कारच्या इतर ऍडव्हान्स फीचर्स मध्ये इको फ्रेंडली सीट जे रिसायकल प्लास्टिक बॉटल पासून बनवलेले आहेत, कॉर्न एक्सट्रॅक बेस्ट आर्टिफिशियल लेदर यांचा समावेश आहे . फ्रंट सीट्स, वेलकम रिट्रॅक्टसह ड्रायव्हर मेमरी सीट जे गाडीमध्ये उठबस करण्यासाठी खूपच कन्व्हिनियंट आणि आरामदायी आहेत, या कार मधले स्टोरेज स्पेस कमालीचे आहे जवळजवळ 22 लिटरची फ्रंक स्पेस आणि 433 लिटरचा बूट स्पेस या कारमध्ये ऑफर केलेली आहे जो तुमच्या डेली यूज साठी आणि लांबच्या पल्यासाठी अतिशय गरजेचा आणि उपयोगी ठरतो, याचसोबत 2610 मिमी व्हीलबेससह, क्रेटा इलेक्ट्रिक सर्व रहिवाशांसाठी पुरेशी लेगरूम, गुडघ्याची खोली, हेडरूम या कारमध्ये ऑफर केली आहे.
हेपण वाचा: टाटा मोटर्सच्या अपकमिंग फॅमिली कार 2025- Tata Motors upcoming cars
कारमध्ये बसलेल्या ड्रायव्हर सोबत इतर प्रवाशांना पर्सनलाईज प्रीमियम फील येण्यासाठी टच इनेबल ड्युअल ऑटोमॅटिक टेंपरेचर कंट्रोल – (DATC) मिळतो. शिवाय कार मध्ये ड्रायव्हर्स ओन्ली मोड सुद्धा दिलेले आहेत, ज्यामध्ये कारची एनर्जी वाचवून ती एनर्जी लॉंग रेंज मिळवण्यामध्ये इन्वेस्ट केली जाते.