‘सनरूफवाली डिझायर’ मारुती सुझुकी न्यू डिझायरचे हे 5 फिचर्स तुम्हाला माहितीये का ?

मारुती सुझकीची New Swift नुकतीच लाँच झाली असून, आत्ता ही best car compony आत्ता त्यांच्या सर्वात विकल्या जाणाऱ्या डिझायरला अपडेट करत आहेत, ह्या नव्या New Dzire sedan मध्ये नवीन Bonet, Tire, Speed – Dimension सोबत ह्या कारला अधिक प्रीमियम लुक येण्यासाठी सनरूफ (New Dzire with sunroof) देण्यात आले आहे. या व्यतिरिक्त मारुती सुझुकीने 4th Gen Maruti Suzuki Dzire या कारमध्ये 5 प्रमुख फिचर्सचा समावेश केला आहे, चला जाणून घेयूया या कारच्या किंमतीसोबत सर्व फिचर्स आणि स्पेसिफिकेशन यांची माहिती.

2024 New Dzire चे 5 फिचर्स

  1. सनरूफ
  2. 6 एयरबॅग्स 
  3. 9 इंचाची नवीन टचस्क्रीन
  4. वायरलेस चार्जर
  5. पॉवरफुल इंजिन

2024 मध्ये मारुती सुझुकीची नवीन जनरेशन मारुती स्विफ्ट लाँच झाली आहे, जिची किंमत 6.49 लाखापासून सुरू होते, या 5 वेरिएंट्समधून विकल्या जाणाऱ्या new swift नंतर लगेचचं मारुतीच्या अजून एका कारचे अपडेटेड वर्जन लाँच होत आहे, हे अपडेटेड मॉडल आहे, New Dzire. जिला सनरूफ मिळणार आहे हे सनरूफ सिंगल पेन सनरूफ असणार आहे, याचसोबत या कारमध्ये सर्वात पॉवरफुल अश्या इंजिनचा समावेश केला आहे. 6 एयरबॅग्स आणि वायरलेस चार्जरसोबत 9 इंचाची नवीन टचस्क्रीन या अद्यावत फिचर्सची भर या sedan कारमध्ये पडली आहे.

या कारमधील इंजिन मारुतीच्या न्यू जनरेशन स्विफ्टची कॉपी असू शकते, कारण या डिझायरचे इंजिन 1.2 लिटरचे Z सीरीज पेट्रोल इंजिन असणार आहे. याचसोबत स्विफ्टप्रमाणेच डिझायर कारमध्ये क्लॅमशेल बॉनेट, हेडलाईटस, फॉग लाइट्स यांचा समावेश करण्यात येणार आहे. या कारचा व्हीलबेस 2,450 मिमी इतका आहे.

वाचा: अनन्याने रिव्हिल केली मारुतीची ही 7 लाखाची कार, बुकिंग कसं करायचंय कळत नाहीये? सोप्या पद्धतीने करा बुकिंग 

सनरूफ अपडेटेड डिझायर संपूर्ण माहिती

कारची डिझाइनमध्ये नाविन्यता आणण्यासाठी प्रीमियम केबिन दिले गेले आहे, हे केबिन ड्युअल टोन थिममध्ये रंगवण्यात आले आहे. फ्रंट-रो मध्ये स्ट्रीअरिंग व्हीलसोबत अपडेटेड क्लायमेट कंट्रोल, 9 इंचाचे टचस्क्रीन यूनिट, वायरलेस फोन चार्जिंग व्यवस्था, मागील AC वेंट्स, हाईट एडजस्ट होणारी ड्रायव्हर सिट , कार चालू अथवा बंद करण्यासाठी पुश बटण, ISOFIX चाइल्ड सिट माऊंट, 360 डिग्री कॅमरासोबत 6 एअरबॅगसारख्या प्रमुख फिचर्सचा समावेश केला आहे.

या कारमध्ये इंजिन 1.2 लिटरचे आहे, जे Z सिसिज 3 सिलेंडर पेट्रोल इंजिन आहे. हे इंजिन 82 PS इतकी पॉवर तर 112 Nm इतका टॉर्क जनरेट करू शकत. कारमधील ट्रांसमिशन 5 स्पीड MT आणि AMT असून, ह्या नव्या अपडेटेड अगदी नवीन असून New Dzire ची किंमत 7 लाख रुपये इतकी असण्याची शक्यता आहे.

Photo of author

Aishwarya Potdar

मला ऑटोमोबाइल फिल्डमधली माहिती वाचायला आणि या ब्लॉगच्या मदतीने तुमच्यापर्यंत सरळ, सोप्या मराठी भाषेत मांडायला खूप आवडते. २०१९ पासून मी ह्या क्षेत्रात वेगवेगळ्या ब्लॉगवर काम करत आहे. तुम्हाला ह्या पेजवर नवीन कार, इलेक्ट्रिक कार-बाईक आणि स्कूटर याचसोबत ऑटोमोबाईलमधील येणारे नवे अपडेट यांची संपूर्ण माहिती मिळेल.

Leave a Comment