अपडेटेड मारुती स्विफ्टबद्दल ‘ह्या’ गोष्टी तुम्हाला महितीचं हव्या !

2024 Maruti Suzuki Swift- new generation

मारुती सुझुकी स्विफ्ट नवीन हॅचबॅक लॉन्च झाल्यापासून भारतीय बाजारपेठेत जिथे-तिथे स्विफ्ट दिसायला लागल्या आहेत. या वर्षात मारुती सुझुकीने त्यांचे सर्वात लोकप्रिय स्विफ्ट हे मॉडेल सर्वात जास्त विकून भारतामध्ये सर्वात जास्त विकल्या जाणाऱ्या कारच्या यादीत पहिले नाव पटकावले आहे. अद्यावत स्विफ्ट मध्ये भरपूर जागा सोबत बाहेरील डिझाईन मध्ये दिलेले अपडेट हे स्विफ्ट आवडण्याचे सर्वात मोठे कारण आहे. चला जाणून घेऊया मारुती स्विफ्टच्या हॅचबॅक कार बद्दल सगळी माहिती.

मारुती सुझुकीच्या टॉप ५ बेस सेलिंग हॅचबॅक कार जून 2024

मारुती सुझुकीच्या यंदाच्या सर्वात विकल्या जाणाऱ्या कार मध्ये मारुती सुझुकी अल्टो, वैगन-आर आणि मारुती सुझुकी बलेनो आणि सुझुकी स्विफ्ट यांसारख्या कारचा समावेश आहे. त्यामधील नवीन मारुती सुझुकी स्विफ्टची 2024 जून मध्ये तब्बल 16,422 मॉडेलची विक्री झालेली आहे.

नवीन मारुती स्विफ्ट इंजिन माहिती

अपडेट केलेल्या स्विफ्टच्या इंजिन बाबतीत माहिती देता या मधले इंजिन 1.2 लिटर तीन सिलेंडर झेड सिरीज पेट्रोल इंजिन दिले गेलेला आहे जे ८२ बीएचपीची पावर आणि 112 एमएम इतका टॉर्क जनरेट करतात या कारमध्ये पाच स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गेअर इंजिन सोबत जोडले गेलेले. मारुती स्विफ्ट पेट्रोल मॅन्युअल वेरिएंट 24.8 किलोमीटरचा मायलेज तर ऑटोमॅटिक 25.75 किलोमीटरचा मायलेज देत.

चौथा जनरेशन स्विफ्ट ला  युरो NCAP कडून 3 स्टार सेफ्टी रेटिंग

या नवीन जनरेशनच्या स्विफ्टची म्हणजेच चौथ्या जनरल स्वीट ची युरो NCAP द्वारे सेफ्टी टेस्टपण करण्यात आलेली आहे. ज्यामध्ये नवीन सुझुकी स्विफ्ट मध्ये जात नवीन सुझुकी स्विफ्ट ला तीन स्टार रेटिंग सुद्धा मिळालेले आहेत यातील रेटिंग अडल्ट ऑक्यूपेंट 67%, चाइल्ड ऑक्यूपेंट 65%,  सेफ्टी असिस्ट 62% तर वलनरेबल रोड युझर्स 76 % इतके गुण मिळालेले आहेत. या कारमध्ये सेफ्टी टेस्ट दरम्यान 6 एअर बॅग, सीट बेल्ट प्री-टेन्शनर, लोड लिमिटर आणि सीट बेल्ट रिमाइंडर सिस्टीम यांसारख्या सेफ्टी फीचर्सचा समावेश होता सोबत दुसऱ्या रांगेत आयसोफिक्स चाइल्ड सीट अँक्रेस पॉईंट आणि यांसारख्या फीचर्स सुद्धा समावेश होता.

अपडेटेड मारुती स्विफ्ट मध्ये या फीचर्स चा समावेश

अपडेटेड केलेल्या मारुती स्विफ्ट ला ऍडव्हान्स फीचर्स मध्ये 9 इंचाची टच स्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम आणि वायरलेस फोन चार्जिंग आणि कनेक्टेड कार टेक्नॉलॉजी आणि ऑटोमॅटिक एसी यांसारखी ऍडव्हान्स फीचर्स मिळतात तर सेफ्टी फीचर्स मध्ये सहा एअरबॅक्स आणि रियर पार्किंग कॅमेरा आणि रियर पार्किंग सेन्सर सारखे फीचर्स देण्यात आलेले आहेत.

अपडेटेड मारुती स्विफ्ट किंमत

मारुती सुझुकीच्या नवीन स्विफ्टची म्हणजे अपडेटेड स्विफ्टच्या टॉप मॉडेलची किंमत 6.49 लाखापासून ते 9.64 लाखापर्यंत आहे. तुम्हाला जर या कारचे बुकिंग करायचे असेल किंवा टेस्ट राईड घ्यायची असेल तर तुम्ही तुमच्या डिवाइस मध्ये मारुती सुझुकी शोरूम नियर मी असं टाकून, तुमच्या जवळील मारुती सुझुकीच्या शोरूम ला किंवा डीलर ला भेट देऊ शकता.

Photo of author

Ajinkya Sidwadkar

२०१० पासून ब्लॉग लिखाण करणारा अजिंक्य सध्या एक मराठी युट्युबर असून त्याला ऑटो मोबाइल क्षेत्रातील माहिती लिहिण्याची आवड आहे.

Leave a Comment