सध्या वाहन क्षेत्रात सगळीकडे चर्चा रंगलेली आहे ती म्हणजे ह्युंडाई मोटर्सची. याचे कारण म्हणजे हुंडाईचा ब्रँड अँबेसिडर बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खान आणि त्याची नव्याने प्रसिद्ध झालेली हुंडाई क्रेटा इलेक्ट्रिकची जाहिरात..! अचानकपणे वायरल होणारी ही हुंडाई क्रेटा ईव्हीची जाहिरात ह्युंडाईच्या ईव्ही टेक्नॉलॉजीच्या दृष्टिकोनातून होणारी प्रगती दर्शवत आहे.
Creta Electric मुख्य हायलाइट्स फीचर्स
Creta EV लाँच झाल्यावर Mahindra XUV 400, MG ZS EV आणि Tata Curvv EV ला टक्कर देणार आहे . नव्याने लॉंच होणाऱ्या Honda Elevate EV आणि Harrier EV ला सुद्धा हुंडाई क्रेटा इलेक्ट्रिकचे प्रतिस्पर्धी मानले जातील. या इलेक्ट्रिक क्रेटामध्ये काही महत्त्वाचे फीचर्स हायलाईट झालेले आहेत. तुम्हाला सुद्धा हे सिक्रेट हायलाईट फीचर्स ची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल, तर सदर माहिती वाचा.
2025 Hyundai Creta EV चे वेरिएंट्स , रेंज आणि बॅटरी
ही एसयूव्ही टर्बो पेट्रोल, NA पेट्रोल, टर्बो डिझेल आणि इलेक्ट्रिक अशा इंजिन पर्यायांमध्ये मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होणार आहे. लांबच्या पल्यासाठी क्रेटा उत्तमच ठरणार आहे एका चार्जवर ही क्रेटा इवी जवळपास 473 किलोमीटर पर्यंतची ड्रायव्हिंग रेंज मिळवून देते. ही कमालीची रेंज मिळवण्यासाठी क्रेटा इलेक्ट्रिक मध्ये 51.4 kWh चा बॅटरी पॅक दिला गेलेला आहे, ज्याला इलेक्ट्रिक मोटर सुद्धा जोडली गेलेली आहे . याच सोबत अजून एक छोटा 42kWh चा बॅटरी पॅकचा पर्याय सुद्धा यामध्ये ऑफर केलेला आहे ,जो एका चार्जवर 390 किलोमीटर पर्यंतची रेंज मिळवून देऊ शकतो. या एसयूव्हीला फास्ट चार्जिंगचा सुद्धा पर्याय मिळतो जो केवळ 58 मिनिटांमध्ये दहा ते 80% पर्यंत गाडीला चार्ज करतो तर या ईव्हीची बॅटरी होम चार्जरने चार्ज होण्यासाठी सहा ते आठ तास लागू शकतात.
हेपण वाचा: नव्या वर्षासाठी Hyundai Creta च Electric वर्जन
2025 Hyundai Creta EV हायलाईट फीचर्स
ह्युंडाई क्रेटा इलेक्ट्रिकच्या अन्य हायलाईट झालेल्या फीचर्स मध्ये वाहन-टू-लोड (V2L), ऑल वेदर कपॅबिलिटी, स्टेरिंग स्टॉलवर गेअर सिलेक्टर, व्हॉइस ऍक्टिव्हेटेड पॅरानॉमिक सनरूफ, फ्रंट माउंट चार्जिंग पोर्ट आणि ड्राईव्ह मोडस यांसारख्या फीचर्स समावेश आहे.
2025 Hyundai Creta EV बाहेरील बाजू
कारच्या बाहेरील बाजूची माहिती देता रिडिझाईन केलेले फ्रंट आणि रियर बंपर, hyundai चा लोगो, फ्रंट- फेंडर- माउंटेड चार्जिंग पोर्ट रिक्त बंद लोखंडी ग्रील आणि एरोडायनामिकली डिझाईन केलेले १७ इंचाचे अलॉय व्हील्स दिले गेलेले आहेत.
2025 Hyundai Creta EV आतील बाजू
या ईव्हीच्या डॅशबोर्डमध्ये दोन स्क्रीन दिल्या गेलेल्या आहेत ; एक इन्फोटेनमेंटसाठी आणि दुसरी क्लस्टरसाठी शिवाय क्लायमेट कंट्रोल, 360 डिग्री कैमरा, लेव्हल 2 ADAS, कनेक्टेड कार टेक, वायरलेस चार्जिंग आणि एअर पुरिफायर, व्हेंटिलेटर सीट्स, इलेक्ट्रॉनिक फ्रंट ड्राइवर सीट्ससारखे अनेक एडवांस्ड फिचर्स या क्रेटा मध्ये देण्यात आले आहेत.