कियाची सर्वाधिक विकली जाणारी कार Carens MPV ICE चे फेसलिफ्ट नुकतेच आंध्र-प्रदेशात हेरण्यात आले आहे, किआ केरेन्स फेसलिफ्ट स्पाइडची माहिती जाणून घ्यायची असेल तर सदर माहिती संपूर्ण वाचा. 2025 Kia Carens Facelift All information
किआ केरेन्स फेसलिफ्ट स्पाइड
नव्या Carens फेसलिफ्ट हे 2025 च्या वर्षामध्ये लॉंच होणार असून या कारच्या नवीन लूकमध्ये भर टाकण्यात आलेली आहे. यामध्ये नवीन लोखंडी जाळी, नवीन हेडलॅम्पस, स्पोर्ट्स दिसणारी लाइटिंग, रीडिज़ाइन केलेले पुढचे आणि मागचे बंपर दिसून आले आहे. नवीन अलॉय व्हीलचा सेटअपसुद्धा या फेसलिफ्टमध्ये मिळणार आहे. कारच्या आतील बाजूस म्हणजे इंटेयरमध्ये नवीन ट्रीम, नवा डैशबोर्ड असण्याची अपेक्षा मांडली जातेय, या कारमध्ये काही वैशिष्ट्ये kiya Syros सारखी असू शकतात, ज्यामध्ये 30 इंचाचा पॅरानॉमिन डिस्प्ले ज्यामध्ये 12.3 इंच HD टचस्क्रीन, 12 इंच LCD इंस्ट्रूमेंट क्लस्टर आणि 5 इंच फुल ऑटोमैटिक एयर कंडीशन कंट्रोल यांचा समावेश आहे.
हेपण वाचा: झलक Hyundai Creta Electric च्या प्रिमियम इंटीरियरची..! फ्रंक स्पेस आणि बूट स्पेस
2025 Carens फेसलिफ्ट हे सेफ्टी फीचर्स असणार
मागील सीट्स व्हेंटिलेटेड असून याच्या सेफ्टी एडवांस्ड फीचर्समध्ये 360° अराउंड व्ह्यू कॅमेरा, 6-एअरबॅग्ज, इलेक्ट्रॉनिक स्थिरता नियंत्रण, वाहन स्थिरता व्यवस्थापन, हिल स्टार्ट असिस्ट कंट्रोल, डाउनहिल ब्रेक कंट्रोल, रीअर पार्किंग सेन्सर्स, डायनॅमिक मार्गदर्शक तत्त्वांसह रीअर व्ह्यू कॅमेरा आणि टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम यांचा समावेश आहे.
किआ केरेन्स फेसलिफ्टमध्ये नवीन पॉवरट्रेन असणार का ?
सध्या भारतीय रोडवर धावत असणाऱ्या किआ केरेन्सप्रमाणेच इंजिन पर्याय किआ केरेन्स फेसलिफ्टला मिळणार आहेत, 1.5-लीटर NA पेट्रोल इंजिन जे 115 PS इतकी पॉवर देईल, 1.5-लीटर टर्बो पेट्रोल इंजिन जे 160 PS इतकी पॉवर देईल आणि 1.5-लीटर डिझेल इंजिन जे 116 PS इतकी पॉवर तयार करू शकत. NA पेट्रोल इंजिन मध्ये 6-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन पर्याय दिले जाते, टर्बो पेट्रोलमध्ये 6iMT आणि 7DCT चे पर्याय आहेत आणि डिझेल युनिट 6-स्पीड मॅन्युअल किंवा 6AT शी जोडलेले आहे.