नवीन जनरेशनचे रेनॉल्ट डस्टरचे लॉन्च हे काही कारणास्तव कॅन्सल झालेले असून, हे लॉन्चिंग पुढे ढकलण्यात आलेला आहे. नवीन जनरेशन रेनॉल्ट डस्टर फ्रंट व्हील ड्राइव्ह आणि फोर व्हील ड्राईव्ह सिस्टीममध्ये चालवली जाईल, याच सोबत यातील ऍडव्हान्स फीचरमध्ये मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गेअरबॉक्स सुद्धा पर्याय उपलब्ध असणार आहे, पण ही प्रीमियम कार लॉन्चिंग साठी एवढा विलंब का करतेय म्हणजेच नवीन पिढीच्या रेनॉल्ट डस्टरला लॉन्च होण्यासाठी एवढा उशीर का होतोय याचं कारण काय आहे? याची संपूर्ण माहिती आणि नवीन पिढीच्या रेनॉल्ट डस्टर संबंधित संपूर्ण माहिती तुम्हाला सदर माहिती वाचायला मिळेल. 2025 Renault Duster India Launch Delayed
नवीन 3rd-gen Renault Duster लाँचला विलंब
बेस्ट कॉम्पॅक्ट कार कंपनीमध्ये रेनॉल्ट डस्टरच रेनॉल्ट नाव आवर्जून घेतल जात. जनरेशन डस्टर मॉडेल हे भारतामध्ये 2012 मध्ये सादर केलं होतं आणि तेच मॉडेल 2022 पर्यंत चालू राहिलं होतं त्यानंतर सेकंड जनरेशन डस्टर हे रेनॉल्ट ने 2017 मध्ये लॉन्च केलं होतं पण ते भारतातल्या रस्त्यांवर कधीच धावलं नाही त्यामुळे रेनॉल्ट ला डस्टर विक्रीमध्ये बऱ्यापैकी तोटा झाला आणि आता यानंतर थर्ड जनरेशन डस्टर हे लॉन्चिंग आधीच चर्चेत आलेला आहे त्याची कारण म्हणजे थर्ड जनरेशन डस्टर ची डिझाईन आणि स्टाईलिंग शिवाय हे मॉडेल लॉन्च होण्यासाठी होणारा उशीर म्हणजेच नवीन डस्टर 2026 मध्ये कुठेतरी लॉन्च होण्याची शक्यता आहे.
नवीन डस्टर इंडियाचे इंजिन
भारतामध्येही नवीन जनरेशनचे Renault Duster एसयूव्ही 5 आणि 7 सीटर लेआउट मध्ये लॉन्च होणार असून रेनॉल्टच्या नवीन जनरेशनच्या डस्टर मध्ये पेट्रोल व्हेरिएशन सादर होणार आहे. ज्यामध्ये एक पॉईंट तीन लिटरचा टर्बो पेट्रोल इंजिन आणि दोन इलेक्ट्रिक मोटर्स पर्याय मिळणार आहे, ज्यामध्ये 130 bhp इतकी पॉवर /240 Nm इतका टॉर्क सोबत 150 bhp इतकी पॉवर /250 इतका टॉर्क जनरेट करण्याची क्षमता आहे. हे इंजिन 6 स्पीड मॅन्युअल आणि 6 स्पीड ट्विन क्लच ईडीसी ऑटोमॅटिक गेअरबॉक्सची जोडले जाणार आहे.
हेपण वाचा: ‘छप्पड फाडके’ कार सेल, मालामाल झाल्या या कार कंपन्या Car Sales
नवीन जनरेशनचे रेनॉल्ट डस्टरमधले खास फिचर्स
या गाडीच्या ॲडव्हान्स आणि सेफ्टीमध्ये मोठे पॅरेनॉमिक सनरूफ, ॲपल कारप्ले सोबत 10.1-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आणि 7-इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, अँड्रॉइड ऑटो कनेक्टिव्हिटी, पॉवर ड्रायव्हर सीट, क्लायमेट कंट्रोल, ADAS, ट्विन क्लच ऑटोमॅटिक गिअरबॉक्स वायरलेस चार्जिंग, हिल डिसेंट कंट्रोल, 360 डिग्री कॅमेरा आणि इलेक्ट्रिक पार्किंग ब्रेक याच सोबत अन्य फीचर्स सुद्धा समावेश आहे.