या नवीन वर्षात अशा कोणत्या इलेक्ट्रिक किंवा आयसीडी कार लॉन्च होणार आहेत याची उत्सुकता तुम्हाला जर लागली असेल तर खालील माहिती फक्त तुमच्यासाठी आहे कारण या माहितीमध्ये नवनवीन कार जानेवारीमध्ये लॉन्च होणार आहेत, त्यांची सबंध माहिती तुम्हाला खालील माहिती मिळेल. Upcoming Cars in India
1. महिंद्रा BE 6 – Upcoming Car Mahindra BE 6
BE 6e ची किंमत रु. 18.9 इतकी आहे, या कारमध्ये 59kWh आणि 79kWh बॅटरी पॅक दिलेले आहेत, या कारमध्ये RWD चा पर्याय मिळतो, या कारमध्ये 682 किलोमीटरची रेंज देऊ शकते. या कारमध्ये वायरलेस मोबाईल चार्जिंग, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, ड्राईव्ह मोड्स, पॅरानॉमिक्स, 16-स्पीकर हरमन कार्डन-सोर्स्ड म्युझिक सिस्टम आणि ओटीए अपडेट यांसारख्या प्रीमियम फीचर्सचा समावेश आहे.
2. एमजी सायबरस्टर
एमजी सायबरस्टर ही एक आगामी आणि बहुप्रतीक्षित कार मार्च 2025 रोजी लॉन्च होणार आहे. ही कार लॉन्च झाल्यावर फोर एक्सटेरियर पेंट स्कीम मध्ये लॉन्च होणार आहे. ह्या इलेक्ट्रिक कार मध्ये 503 बीएचपी इतकी पावर आणि 725 एमएम इतका टॉर्क जनरेट करण्याची क्षमता असेल, ही दोन दरवाजा असणारी कार अतिशय आकर्षक आणि बोल्ड आहे.
3. किआ सिरोस
किया मोटर्सने किया सिरोस बुकिंगसाठी चालू केलेली आहे. 25 हजार रुपये टोकन अमाऊंट भरून या सर्वचे बुकिंग स्वीकारले जाईल. या कारमध्ये मल्टी इंजिनचे ऑप्शन दिले जातील किया मध्ये एक लिटरचे टर्बो पेट्रोल स्टार्ट स्ट्रीम इंजिन दिले गेलेले आहे जे 6 स्पीड मॅन्युअल आणि 7 स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसोबत जोडले गेलेले आहे. डिझेल व्हेरिएंट मध्ये एक पॉईंट पाच लिटर डिझेल इंजिन सुद्धा दिले गेलेला आहे.
4.ह्युंदाई क्रेटा ईव्ही
17 जानेवारी 2024 रोजी हुंडईने क्रेटा लॉन्च केली होती आणि अगदी एक वर्षानंतर म्हणजेच 17 जानेवारी 2025 मध्येच हुंडाई क्रेटाच इलेक्ट्रिक व्हर्जन लॉन्च होणार आहे. ही क्रेटा इंटिरियर आणि एक्सटेरियर बाबतीत एकदम बोल्ड आणि क्लास असणार आहे. यामध्ये पिक्सेलेटेड ग्राफिक ग्रिल आणि मागील बंपर, मल्टी-कलर सराउंड लाइट आणि स्टेट ऑफ चार्ज (SOC) इंडिकेटरसह चार्जिंग पोर्ट आणि R17(D=436.6 mm) कमी रोलिंग रेझिस्टन्स (LRR) टायर्ससह एरो ॲलॉय व्हील सारखे प्रीमियम फिचर्स मिळणार आहेत.
हेपण वाचा: का Tata Harrier EV रेसट्रॅकवर चालवली?
5. टाटा सफारी ईव्ही
2025 मध्ये टाटा सफारी ईव्ही भारतामध्ये लॉन्च होऊ शकते, जिची किंमत एक शोरूम 32 लाख रुपये पासून आहे. सफारी ईव्ही एका चार्ज मध्ये 500 किलोमीटर इतकी रेंज देऊ शकते, मारुती ईवीएक्स इलेक्ट्रिक, एमजी झेडएस ईवी आणि हुंडई कोना इलेक्ट्रिक यांसारख्या अपकमिंग कारला टाटा मोटर्सची सफारी ईवी टक्कर देऊ शकते.
6. Upcoming Car eVitara – मारुती सुझुकी ई-विटारा
मारुती सुझुकीची ही पहिली इलेक्ट्रिक कार असून या कारचं भारत मोबिलिटी एक्सपोमध्ये अनावरण होणार आहे. ही कार भारतामध्ये 17 एप्रिल 2025 रोजी लॉन्च होणार आहे मारुती सुझुकी ई विटारा ची किंमत वीस लाख ते पंचवीस लाख दरम्यान असून या कारमध्ये दोन बॅटरी पॅक पर्याय दिले जातील पहिला बॅटरी पॅक जो 49kWh असेल ज्यामध्ये FWD चा पर्याय मिळतो आणि दुसरा बॅटरी पॅक 61kWh सोबत FWD आणि 4 WD असे पर्याय मिळतात.