बिग बॉस विजेत्याला मिळणार ही इलेक्ट्रिक गाडी, बिग बॉसच्या इतिहासात पहिल्यांदाच इको फ्रेंडली बक्षीस

Bigg Boss 10 winner prize package: रिअ‍ॅलिटी शो बिग बॉस कन्नड विजेत्याला मिळणाऱ्या, ‘इको फ्रेंडली’ बक्षिसामुळे चर्चेत आला आहे, या चर्चेचं कारण आहे; कन्नड बिग बॉसच्या विजेत्याला मिळणारी, ‘टॉप इलेक्ट्रिक स्कूटर‘. याआधी बिग बॉसच्या प्रत्येक शो मध्ये विजेत्याला ठराविक रक्कम बक्षीस म्हणून मिळायची, पण आता या रक्कमेसोबत मिळणार आहे, ‘ब्रॅंड न्यू इलेक्ट्रिक स्कूटर.’

  • विजेत्याला मिळणारे बक्षीस
  • बिग बॉस कन्नडाचे होस्ट किच्चा सुदीप यांची परितोषक संबंधी घोषणा
  • उपविजेत्याला मिळणारे बक्षीस

विजेत्याला मिळणार ५० लाख, भव्य कार आणि इलेक्ट्रिक स्कूटर

ऑटोमोबाइल च्या आजच्या जमान्यात बॉलिवूड ते हॉलिवूड कलाकार सुद्धा आजकाल लक्सरियस इलेक्ट्रिक कार मधून प्रवास करताना दिसून येतात, आणि आता हीच इलेक्ट्रिक कार झळकणार आहे, कन्नड फिल्म इंडस्ट्री मधल्या बिग बॉसमध्ये.

रिअ‍ॅलिटी शो बिग बॉस कन्नड

नुकताच बिग बॉस कन्नड १० चा ग्रॅंड फिनाले पार पडत असताना बिग बॉस कन्नडाचे होस्ट किच्चा सुदीप यांनी या रियालिटी शो दरम्यान विजेत्याला मिळणाऱ्या भव्य अश्या बक्षिसपरितोषकची घोषणा केली, ज्यामुळे प्रेक्षकवर्ग आणि विजेत्यांच्या यादीत उत्साह पसरला. या बिग बॉस कन्नड सारख्या एंटरटेनिंग शो च्या विजेत्याला बक्षिसामध्ये मिळणार आहे, ५० लाखांचे उदार रोख सोबत आलिशान लाइफस्टाइल जगण्यासाठी भव्य कार आणि एक इलेक्ट्रिक स्कूटरसुद्धा मिळणार आहे.

वाचा: 24 किमी मायलेज देणारी, मारुती सुझुकीची नवीन स्पोर्टलूक स्विफ्ट कार पहिली का?

उपविजेत्याला सुद्धा मिळणार इलेक्ट्रिक बाईक

आनंदाची गोष्ट ही आहे की, ही ईव्ही स्कूटर फक्त विजेत्यासाठीच नसून उपविजेत्यालासुद्धा त्याच्या हक्काच्या इलेक्ट्रिक स्कूटरच्या चाव्या सोपविण्यात येणार आहेत. बिग बॉस कन्नडाचे होस्ट किच्चा सुदीप यांनी माहिती दिली, ‘नेहमीप्रमाणे यावर्षीसुद्धा बिग बॉसच्या विजेत्याला पारितोषक म्हणून ट्रॉफीसोबत रक्कम तर मिळणारच आहे पण उपविजेत्यालासुद्धा प्रोत्साहन देण्यासाठी मिळणार आहे, स्वतःची इलेक्ट्रिक स्कूटर.

वाचा: नव्या वर्षातच सलग तीन दिवस पेट्रोल डिझेल बंद, आजच भरुन घ्या गाडीत पेट्रोल-डिझेल, वाचा कारण

याआधी ‘बिग बॉस’ कन्नड अथवा इतर भाषेतील शोमधल्या विजेत्याना ट्रॉफी सोबत ठराविक रक्कम सोपवली जायची, पण आता कन्नड बिग बॉस ने नवीन पायंडा रचला आहे, ज्यात विजेत्याला कौतुकास पात्र म्हणून ‘ट्रॉफी आणि रक्कमेसोबत पर्यावरणाची जाण ठेवत एक आलिशान कार सोबत इलेक्ट्रिक स्कूटर’ मिळणार आहे. बिग बॉस कन्नड एवढ्यावरच न थांबता ‘ विजेत्यासोबत उपविजेत्याला प्रोत्साहन देण्यासाठी इलेक्ट्रिक स्कूटर बक्षीस म्हणून देणार आहे.

Photo of author

Aishwarya Potdar

मला ऑटोमोबाइल फिल्डमधली माहिती वाचायला आणि या ब्लॉगच्या मदतीने तुमच्यापर्यंत सरळ, सोप्या मराठी भाषेत मांडायला खूप आवडते. २०१९ पासून मी ह्या क्षेत्रात वेगवेगळ्या ब्लॉगवर काम करत आहे. तुम्हाला ह्या पेजवर नवीन कार, इलेक्ट्रिक कार-बाईक आणि स्कूटर याचसोबत ऑटोमोबाईलमधील येणारे नवे अपडेट यांची संपूर्ण माहिती मिळेल.

Leave a Comment