भारतामध्ये इलेक्ट्रिक कंपनी दुचाकी बनवणारी कंपनी एथर हिने या नव्या वर्षात बेस्ट सेलर 450 इलेक्ट्रिक स्कूटरच्या रेंजमध्ये वाढ केलेली आहे शिवाय या एथर इलेक्ट्रिक स्कूटरच्या किमतीमध्ये वाढ सुद्धा झालेले आहे. तुम्हाला सुद्धा जर जाणून घ्यायचं असेल की नवीन एथरची रेंज काय असेल ? किंमत किती असेल? तर सदर माहिती संपूर्णपणे वाचा. 2025 Ather 450S, 450X लाँच किंमत आणि अपडेट
2025 Ather 450 स्कूटर
मॉडेल्स | किंमत |
Ather 450S | रु 1,29,999 |
एथर 450S प्रो पॅक | रु 1,43,999 |
एथर 450X 2.9kWh | रु 1,46,999 |
एथर 450X 2.9kWh प्रो पॅक | रु 1,63,999 |
एथर 450X 3.7kWh किंमत | रु 1,56,999 |
एथर 450X 3.7kWh प्रो पॅक | रु 1,76,999 |
एथर 450 Apex | Rs 1,99,999 |
(एक्स शोरूम बेंगलोर)
एथर 450S माहिती
एथर एनर्जीने नवीन अपडेट मध्ये इतर 450 ला दोन बॅटरी बॅक पुरवलेले आहे; 2.9kWh आणि 3.7kWh बॅटरी पॅक . 2.9kWh ची बॅटरी पैक हा 450S मध्ये उपलब्ध आहे, जो एका चार्जमध्ये 105 किलोमीटरची रेंज देऊ शकतो आणि ही स्कूटर चार्ज होण्यासाठी 7 तास 45 मिनिट लागतात, या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये बेसिक राईड मोड मोबाईल ॲप कनेक्टिव्हिटी आणि कलर एलसीडी स्क्रीन सारखे इतर अद्यावत असे फीचर्स सुद्धा दिले गेलेले आहेत तर यातील प्रो पॅक वरिएंट मध्ये बेसिक राईड मोड सोबत दिलेले आहेत नेवीगेशन सारखे ऍडव्हान्स फीचर सुद्धा या दुचाकी मध्ये मिळते. शिवाय या सेगमेंट मध्ये आता दोन नवीन रंग सुद्धा जोडले गेलेले आहेत; हायपर सँड आणि स्टेल्थ ब्लू.
एथर 450x माहिती
या इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये सुद्धा दोन बॅटरी पॅक पुरवण्यात आलेले आहेत, 2.9kWh बॅटरी पैक 105 किलोमीटर रेंज आणि 3.7kWh बॅटरी पैक 130 किलोमीटर रेंज मिळवून देईल.
हेपण वाचा: 2025 मध्ये आगामी रॉयल एनफिल्ड मोटरसायकल : 440cc ते 750 सीसी
एथर 450 एपेक्स माहिती
एथर 450 एपेक्स सेगमेंट मधली सगळ्यात महागडी स्कूटर आहे, या स्कूटर मध्ये 3.7kWh बॅटरी पॅक मिळतो जो एकाच मध्ये 130 किलोमीटर पाच तास 45 मिनिटे लागतात.