नव्या अपडेटसोबत Ather च्या लोकप्रिय इलेक्ट्रिक ‘Rizta’ स्कूटरचे 6 एप्रिल रोजी लाँचिंग, जाणून घ्या किंमत आणि नवे बदल

Published:

जर तुम्ही गुगलवर भारतातील टॉप इलेक्ट्रिक स्कूटर असं सर्च केलं तर ‘एथर एनर्जी’ स्कूटरच नाव नक्कीच पाहायला मिळेल आणि आता एथर इलेक्ट्रिक स्कुटर Rizta ला घेवून इलेक्ट्रिक वाहन बाजारात उतरत आहे, या इलेक्ट्रिक स्कुटरच्या लाँचिंग बद्दल अधिक माहिती Ather Energy च्या सीईओ यांनी दिली आहे. नव्या रिझता इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये बरेच फीचर्स नव्याने देण्यात आले आहेत. चला जाणून घेऊया या स्कुटर बाबत अधिक माहिती.

Ather Energy च्या सोशल मीडिया X म्हणजे ट्विटर हॅन्डलवरून, एथर 450X आणि एथर 450 एपेक्स सारख्या सर्वोत्तम इलेक्ट्रिक फॅमिली स्कुटरमध्ये एथर रिझताला मोजलं जाणार आहे, याची माहिती मिळाली. यापूर्वी सुद्धा रिझताची टेस्टराईड करताना कॅमेरात कैद करण्यात आले होते पण त्याच तुलनेत आता लाँच होणाऱ्या इतर रिझतामध्ये काही फीचर्स आणि लुक नव्याने देण्यात आलेले आहेत.

या इलेक्ट्रिक स्कूटरची सर्वात आकर्षणाची गोष्ट म्हणजे या स्कूटरमध्ये मिळणार भरपूर स्टोरेज, या सीटच्या खाली भरपूर स्पेस मिळणार आहे. या स्कूटरची सीटिंग अरेंजमेंट हे खूपच आरामदायी आणि सुरक्षित करण्यात आलेली आहे. स्कूटरमध्ये फ्लॅट आणि मोठ्या आकाराचा फ्लेवरबोर्ड आणि चाके ही बारा इंचाचे आहेत सोबत डिजिटल टचस्क्रीन इन्स्ट्रुमेंट क्लस्टर,स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी, डिजिटल कन्सोल, रीजनरेटिव्ह ब्रेकिंग, OTA अपडेट्स, कॉल अलर्ट ,राइट्स मोड, फास्ट चार्जिंग आणि नेवीगेशन, यूएसबी चार्जिंग पोर्ट ,ऍप्रॉन-माउंट केलेले हेडलाइट आणि टर्न इंडिकेटर यांसारखे फीचर्स या स्कूटरमध्ये देण्यात आलेले आहेत. या इलेक्ट्रिक स्कूटरच्या मोटर आणि बॅटरी पॅकची माहिती देता, यामध्ये 2.9kWh क्षमतेची बॅटरी आणि 5.4kW पीक पॉवर जनरेट करणारी मोटर असू शकते अशी शक्यता मांडली जाते.

वाचा: ‘नाद करा पण टाटाचा कुठं’ ,नेक्सॉनने क्रॅश टेस्टिंगमध्ये सर्वांचा टाकलं मागे

वाचा: तुमची आवडती टाटा एसयुव्ही आता ‘डार्क एडिशनमधून’ उपलब्ध, हे घ्या नवे फिचर्स आणि किंमत

Ather 450X च्या तुलनेत एथेर रिझतामधल्या काही फीचर्सना अपग्रेड करण्यात आलेला आहे, या इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत 1,57,547 रुपये असून ही इलेक्ट्रिक स्कूटर चार वेरिएंट्स आणि सहा रंग- स्पेस ग्रे, स्टिल व्हाईट, सॉल्ट ग्रीन, ट्रू रेड, कॉस्मिक ब्लॅक आणि लुनर ग्रेमध्ये उपलब्ध आहे. या स्कूटरमध्ये हॅण्डल बार काउलवर बसवलेले एलईडी टन इंडिकेटर्स आणि एलईडी हेडलाईट मिळतात, ज्यामुळे ही स्कूटर स्पोर्टी दिसते. या स्कूटरच्या बॅटरी पॅक बाबतीत माहिती देता इथे  2.9kWh आणि 3.7kWh बॅटरी पॅक पुरवलेला आहे, यातील 2.9kWh चा बॅटरी पॅक 90 किलोमीटरची रेंज देतो तर 3.7kWh बॅटरी पॅक 110 किलोमीटरची रेंज देतो.

याआधी एथर एनर्जीकडून यादी ट्विटर हँडलवर सुपरस्टार कॉमेडियन अनुभव सिंग बस्सी हा सुद्धा एथर एनर्जीचा वापरकर्ता झाला असल्याची बातमी जाहीर केली होती. इलेक्ट्रिक वाहन बाजारपेठेत TVS iQube S आणि Ola S1 Pro ला टक्कर देणाऱ्या रेड्याची किंमत 1.25 लाख ते 1.35 लाख दरम्यान आहे.

Photo of author

Aishwarya Potdar

मला ऑटोमोबाइल फिल्डमधली माहिती वाचायला आणि या ब्लॉगच्या मदतीने तुमच्यापर्यंत सरळ, सोप्या मराठी भाषेत मांडायला खूप आवडते. २०१९ पासून मी ह्या क्षेत्रात वेगवेगळ्या ब्लॉगवर काम करत आहे. तुम्हाला ह्या पेजवर नवीन कार, इलेक्ट्रिक कार-बाईक आणि स्कूटर याचसोबत ऑटोमोबाईलमधील येणारे नवे अपडेट यांची संपूर्ण माहिती मिळेल.

Leave a Comment