टोयाटोची नवीन शक्कल, तुमची आवडती टोयोटा कारची होणार ‘होम-डिलीवर’

Awesome New Car Delivery Solution by Toyota India- ‘ग्राहकांना सॅटिसफाय करण्यासाठी कार कंपन्या कोणकोणत्या आयडिया अजमावतील याचा काही नेम नाही’, हे वाक्य आता खऱ्यरूपाने अर्थपूर्ण झालंय असं म्हणायला काहीच हरकत नाही; कारण टोयोटा किर्लोस्कर मोटर्स (TKM) ने कार खरेदी करणाऱ्या ग्राहकाला कार घेतल्यावर ब्रँड न्यू कारचा फील येण्यासाठी चक्क कारची डिलिव्हरी घरापर्यंत केली जाणार आहे, तेही नो-कॉस्ट ऑप्शनसोबत.

तुम्ही जर टोयोटा च्या कार विकत घेण्याचा विचार करत असाल,तर सर्वोत्कृष्ट टोयोटा कार कोणत्या आहेत, तुम्ही  टोयोटाच्या कारचे बुकिंग केले असेल तर, कारची घरपोच डिलिव्हरी होण्याचा लाभ कसा घेऊ शकता किंवा कोणकोणत्या भागात Toyota Awesome New Car Delivery Solution चा फायदा काय जाणून घ्या.

टोयोटा डोरस्टेप डिलिव्हरी सेवा ग्राहकांसाठी विनाखर्च पर्याय

टोयोटा आता तुमची अगदी नवीन कार तुमच्या दारात पोहोचवेल. कार निर्मात्याने डीलरच्या स्टॉकयार्डमधून फ्लॅटबेडवरील ग्राहकापर्यंत नवीन वाहने पोहोचवण्यासाठी नवीन सेवा सुरू केली आहे.

टोयोटा किर्लोस्कर मोटर्स (TKM) ने ग्राहकाच्या समाधानाला प्राधान्य देत, नवीन कार तुमच्या दारात पोहोचवण्याची सुविधा चालू केली आहे. तुम्हाला तुमची नवीन टोयोटा कार डीलरच्या स्टॉकयार्डमधून फ्लॅटबेड ट्रकच्या मदतीने डोअरस्टेप पर्यंत आणून दिली जाणार आहे आणि महत्वाची गोष्ट हि आहे कि हि सुविधा विनाखर्च असणार आहे, सोबत ट्रान्झिट इन्शुरन्स डीलरमार्फत भरला जाणार आहे.

वाचा: ‘स्वस्तात मस्त’ टाटाची Altroz Racer, टाटाची डायरेक्ट ह्युंदाईशी टक्कर

‘कमीतकमी ओडोमीटर रीडिंगसह नवीन वाहने रस्त्यावर न चालवता थेट ग्राहकांना म्हणजेच अंतिम डिलिव्हरी पॉईंटपर्यँत मिळावे, तेसुद्धा फ्री-ऑफकॉस्ट’ या उपक्रमाचे उद्दीष्ट आहे. शिवाय या नवीन टोयोटाच्या ह्या नव्या कारला स्टॉकयार्डपासून डीलरशिपपर्यंत पोहोचवताना कार चालविण्याची डीलर कर्मचाऱ्यांची गरज लागणार नाही.

टोयोटा नवीन कार डिलिव्हरी सोल्यूशन हा उपक्रम तूर्तास 26 राज्यांतील 130 डीलरशिपकडे उपलब्ध असणार आहे.

वाचा: टाटा मोटर्सची हवा, टाटाच्या पंच आणि नेक्सॉनची रेकॉर्ड-ब्रेक विक्री

टोयोटा नवीन कार डिलिव्हरी सोल्यूशनचे फायदे

  1. कारची घरपोच डिलिव्हरीने ग्राहकांचे समाधान
  2. डोरस्टेप डिलिव्हरी सेवा ग्राहकांसाठी विनाखर्च पर्याय असेल.
  3. कार वितरण प्रक्रिया सुव्यवस्थित होण्यास मदत
  4. ग्राहकांपर्यंत वाहनांची सुरक्षित डिलिव्हरी

वाचा: हिरोची सर्वात ‘प्रीमियम बाईक’ झाली लॉन्च,जाणून घ्या मॅवरिक 440 ऑफर, फिचर्स आणि बुकिंग

बेस्ट 5 टोयोटा कार

  • टोयोटा लँड क्रूझर: 2.1 Cr
  • टोयोटा Rumion : 10.29 – 13.68 Lakhs
  • टोयोटा अर्बन क्रूझर Hyryder: 11.14 – 20.19 Lakhs
  • टोयोटा फॉर्च्युनर : 33.43 – 51.44 Lakhs
  • टोयोटा इनोव्हा क्रिस्टा : 19.99 – 26.3 Lakhs
Photo of author

Aishwarya Potdar

मला ऑटोमोबाइल फिल्डमधली माहिती वाचायला आणि या ब्लॉगच्या मदतीने तुमच्यापर्यंत सरळ, सोप्या मराठी भाषेत मांडायला खूप आवडते. २०१९ पासून मी ह्या क्षेत्रात वेगवेगळ्या ब्लॉगवर काम करत आहे. तुम्हाला ह्या पेजवर नवीन कार, इलेक्ट्रिक कार-बाईक आणि स्कूटर याचसोबत ऑटोमोबाईलमधील येणारे नवे अपडेट यांची संपूर्ण माहिती मिळेल.

Leave a Comment