बजाज ऑटो ने बंद केली लोकप्रिय चेतक इलेक्ट्रिक स्कूटर, जाणून घ्या कारण

बजाज ऑटो ने त्यांची लोकप्रिय चेतक स्कूटरचे इलेक्ट्रिक मॉडेल बंद केले असून कंपनीने ई चेतक च्या चाहत्यांना झटका दिला आहे. सध्या बजाज इलेक्ट्रिक चेतक भारतीय बाजारपेठेत चांगले परफॉर्मन्स करत असली कंपनीने हा निर्णय का घेतला याचे मुख्य कारण जाणून घेऊया.

बजाज चेतक प्रीमियम मॉडेल का बंद केले?

बजाज चेतक या लोकप्रिय स्कूटर चे इलेक्ट्रिक व्हर्जन २०१९ मध्ये कंपनीने लाँच केले होते. लाँच झाल्या पासून या गाडीला प्रत्येकाने पसंत केले, ग्राहकांच्या फीडबॅक नुसार कंपनीने गाडीत अपडेट करत नेहमीच फेसलिफ्ट काही महिन्यांच्या अंतरावर लाँच केले आहे. कंपनीने नुकतेच अर्बन २०२४ हे मॉडेल लाँच केले आणि हे मॉडेल मार्केट मध्ये उतरावताच कंपनीने चेतक चे प्रीमियम मॉडेल बंद केले आहे. प्रीमियम हे मॉडेल सर्वात लोकप्रिय असून यामध्ये अनेक फीचर्स दिले गेले होते. सध्याच्या मॉडेल पेक्षा पप्रीमियम मध्ये जास्त वॅट चा ऑन बोर्ड चार्जर होता ज्याने  चार्जिंग टाईम कमी होता, पुढे डिस्क ब्रेक दिला असल्याने ब्रेक देखील उत्तम होता पण अर्बन मॉडेल मध्ये हे फीचर्स दिले नाहीत. मग हा विचार येतो कि कंपनीने नक्की बजाज चेतक प्रीमियम मॉडेल का बंद केले?

जसे कि मी तुम्हाला सांगितले कंपनी नेहमीच ग्राहकांचा फीडबॅक घेते त्यानुसार ग्राहकांच्या रेंज, टॉपस्पीड आणि डिस्प्ले बाबत खूप तक्रारी होत्या. चेतक प्रीमियम मध्ये डिस्प्ले खूप अंधुक आहे आणि उन्हात काहीच दिसत नाही, टॉप स्पीड गाडीचे फक्त ६३ किमी प्रति तास आहे आणि रेंज फक्त १०८ किमी मिळते अश्या ग्राहकांच्या प्रमुख तक्रारी होत्या. या तक्रारींना गांभीर्याने घेऊन बजाज ने कलर डिस्प्ले अर्बन मॉडेल मध्ये दिला आहे आणि रेंज वाढवण्यासाठी ऑन बोर्ड चार्जर काहून वजन कमी केले ज्यामुळे ११३ किमी रेंज मिळणार आहे. टॉप स्पीड वाढवून आता ७३ किमी इतकी मिळणार आहे. बाकीचे सर्व फीचर्स बजाज चेतक अर्बन २०२४ मध्ये मिळणार आहेत.

नवीन बजाज चेतक प्रीमियम २०२४ मॉडेल लाँच होणार?

बजाज ऑटो त्यांच्या चेतक या इलेक्ट्रिक स्कूटर चे प्रीमियमचे नेक्स्ट व्हर्जन २०२४ मध्ये लाँच करणार आहे ज्यामध्ये पूर्वी पेक्षा जास्त रेंज, कलर डिस्प्ले, उत्तम टॉप स्पीड आणि फास्ट चार्जिंग मिळणार आहे या व्यतिरिक्त ग्राहकांना अतिरिक्त फीचर्स देखील अपडेट झालेले पाहायला मिळणार आहे. या आगामी बजाज चेतक प्रीमियम २०२४ मॉडेल मध्ये खास फीचर्स देखील ऍड केले जाऊ शकतात जे साध्याच लाँच झालेल्या अर्बन मॉडेल मध्ये नाहीयेत.

वाचा – अनलिमिटेड रेंज देणारी मेड इन पुणे ई-स्कूटर लाँच, पहा काय आहे खास

बजाज चेतकचे स्वस्त मॉडेल येणार

काही महिन्यांपूर्वी आमच्या टीम ने बजाज चेतक बीएलडीसी वर्जनचे व्हिडिओज कॅमेऱ्यात कैद केले होते त्यानुसार कंपनी १ लाख रुपयांच्या आत नवीन चेतक लाँच करणार आहे ज्यामध्ये बीएलडीसी हब मोटर दिली जाणार आहे ज्याने सर्व फीचर्स मिळून देखील कमी किंमत ग्राहकांना मोजावी लागणार आहे. हे मॉडेल २०२४ च्या तिमाही मध्ये लाँच होऊ शकते. मॉडेल बाजारात दाखल होताच ऑटो हेल्पर युट्युब चॅनेलवर अपलोड केला जाईल.

 

Photo of author

Ajinkya Sidwadkar

२०१० पासून ब्लॉग लिखाण करणारा अजिंक्य सध्या एक मराठी युट्युबर असून त्याला ऑटो मोबाइल क्षेत्रातील माहिती लिहिण्याची आवड आहे.

Leave a Comment