लो-मेंटेनेंन्सच्या कार शोधताय? कमी किंमतीसोबत कमी देखभाल खर्च असणाऱ्या कारची यादी

Best car to buy with low maintenance

तुम्ही अशी कार शोधत आहात का जी  सर्वात कमी देखभाल खर्चासह कार किंवा चांगल्या मायलेजसोबत लो-मेंटेनन्स सुद्धा असेल तर तुम्ही अगदी योग्य माहिती वाचत आहात. चांगली कार खरेदी करताना आपल्यापैकी बरेच जण नंतरच्या येणाऱ्या खर्चामुळे कार-खरेदीचा पश्चाताप व्यक्त करतात, म्हणूनच तुम्ही जर कार खरेदी करण्याचा विचारात असाल तर सदर माहिती वाचा. या माहितीमध्ये सर्वोत्तम कमी देखभालीचा खर्च असणाऱ्या टॉप 5 कार, ज्यातील एक कार लो-मेंटेनेंन्स SUV सुद्धा आहे. (लो-बजेट, लो-मेंटेनेंन्स कार)

फोर्ड फिगो

कमी देखभालीसह खरेदी करण्यासाठी सर्वोत्तम कार मधील पहिली कार फोर्ड फिगो आहे. 5 लाख ते रु.8.37 लाख या किंमतीमध्ये मिळणारी फोर्ड फिगो ही हॅचबॅक कार असून यातील इंजिन – 1.5 लिटरचे डिझेल आहे. ह्या कारच्या इंधन टाकीची क्षमता 40 लिटरची आहे.  174 मिमी इतका ग्राउंड क्लीयरन्स असणारी कार देखभालीमध्ये अगदी कमी खर्च करते. EBD सह ABS आणि 6 एअरबॅग्ज सोबत आराम, एडवांस्ड फिचर्स- स्पेसिफिकेशन असणारी आणि परवडणाऱ्या किंमतीमध्ये तुम्ही जर एखादी कार शोधत असाल तर फोर्ड फिगो हा कार पर्याय तुमच्यासाठी उत्तमच ठरू शकतो.

मारुती सुझुकी अल्टो 800

मारुतीच्या इतर सेजमेंटमधली कमीत कमी मेंटेनन्स असलेली सर्वोत्तम कार म्हणजे मारुती सुझुकी अल्टो 800 आहे. या कारची किंमत रु.3.39 लाख ते रु.5.03 लाख इतकी आहे.  यातील CNG व्हेरिएंट 26.8 किमी/किलो इतके मायलेज देते तर पेट्रोल व्हेरिएंट मायलेज 22.03 किमी प्रति आहे. या कारचा ग्राउंड क्लीयरन्स 160 मिमी इतका आहे. एअरबॅग्ज, एंटी-लॉक ब्रैकिंग सिस्टम, एयर कंडीशन, चाइल्ड सेफ्टी लॉक, इलेक्ट्रॉनिक ब्रेकफोर्स डिस्ट्रीब्यूशन, सीट बेल्ट वार्निंग,  इंजन इम्मोबिलाइज़र सारखे इतर एडवांस्ड फिचर्स या कारमध्ये मिळतात. या कारची रचना भारतातील रस्त्यांच्या हिशोबाने बनवली असून तुमची जर अफोर्डेबल कोस्टमध्ये लो-मेंटेनेंन्स कार शोधत असाल तर मारुती सुझुकी अल्टो 800 या पर्याय तुमच्यासाठी उत्तम ठरू शकतो.

रेनॉल्ट क्विड

कमी देखभालीसह सर्वोत्तम कार असणारी रेनॉल्ट क्विडची किंमत 4.70 – 6.45 लाख इतकी असून, ऑटोमॅटिक आणि मॅन्युअल ट्रांसमिशनचे पर्याय ह्या कारमध्ये मिळतात. Kwid चे ग्राउंड क्लीयरन्स 184mm आहे. डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, एडवांस्ड इंटरनेट फिचर्स आणि मागचा कॅमेरा सारखे अनेक फिचर्स या कारमध्ये मिळतात.

 टाटा टियागो

तुम्ही जर स्पोर्टी आणि आकर्षक लो मेंटेनेंन्स कार शोधत असाल तर 5.45 लाख ते रु.7.90 लाख किंमत असणारी टाटा टियागो तुमच्यासाठी बेस्ट कार ठरू शकते. ही कार मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक पर्यायासोबत पेट्रोल आणि सीएनजी वेरिएंट्समधून उपलब्ध आहे. या कारचा ग्राउंड क्लीयरन्स – 168 मिमी इतका आहे.  7 इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, फ्लॅट-बॉटम स्टिअरिंग व्हील, इंजिन स्टार्ट-स्टॉप बटण सारखे इतर अन्य फिचरसुद्धा या कारमध्ये आहेत. ग्लोबल NCAP क्रॅश टेस्टद्वारे 4 -स्टार सुरक्षा रेटिंग या कारसाठी मिळाले आहेत.

टाटा नेक्सॉन

टाटा नेक्सॉन ही कार कमी देखभाल खर्चासह लक्झरी कार असून ग्लोबल NCAP द्वारे भारतातील पहिली कार जिला 5-स्टार सेफ्टी रेटिंग मिळाले आहेत. 1.5 लिटरचे टर्बोचार्ज्ड रेव्होटोर्क इंजिन आणि 1.2 लिटरचे टर्बोचार्ज्ड रेव्होट्रॉन इंजिन असणाऱ्या ह्या कारमध्ये डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, TPMS, इंजिन क्रूझ कंट्रोल, एंटी-लॉक ब्रैकिंग सिस्टम , ऑटोमेटिक क्लाइमेट कंट्रोल, मल्टी फंक्शन स्टीयरिंग व्हील आणि इलेक्ट्रिक सनरूफ सारखे इतर एडवांस्ड फिचर्स आहेत. ह्या कारची किंमत 8 – 15.80 लाख रुपये इतकी आहे. कमी देखरेख suvsमध्ये या कारचे आवर्जून नाव घेतले जाते.

तुम्हाला पडलेले प्रश्न

1. कमी देखभालीसाठी कोणती कार सर्वोत्तम आहे?
  • वरील यादीप्रमाणे टाटा नेक्सॉन, टाटा टियागो, मारुती सुझुकी अल्टो 800, रेनॉल्ट क्विड आणि फोर्ड फिगो या कार कमी देखभालीचं खर्चाच्या आहेत.
2. कमी देखभाल असलेली सर्वात विश्वासाची कार कोणती आहे?
  • टाटा नेक्सॉन ही कार कमी देखभाल खर्चासह लक्झरी कार असून ग्लोबल NCAP द्वारे भारतातील पहिली कार जिला 5-स्टार सेफ्टी रेटिंग मिळाले आहेत.
3. कोणत्या कारचा देखभाल खर्च कमी आहे?
  • वरील यादीमध्ये  सर्वोत्तम कमी देखभालीचा खर्च असणाऱ्या टॉप 5 कार, ज्यातील एक कार लो-मेंटेनेंन्स SUV यांची संपूर्ण माहिती दिली आहे.
4. लो-बजेट, लो-मेंटेनेंन्स कार सुरक्षित असू शकते? 
  • नक्कीच टाटा नेक्सॉन ही कार कमी देखभाल खर्चासह लक्झरी कार असून ग्लोबल NCAP द्वारे भारतातील पहिली कार जिला 5-स्टार सेफ्टी रेटिंग मिळाले आहेत.
5. 5 लाखांच्या आतमध्ये लो-मेंटेनेंन्स कार खरेदी करू शकतो का?
  • नक्कीच रेनॉल्ट क्विड, मारुती सुझुकी अल्टो 800 आणि फोर्ड फिगो हे 5 लाखाच्या आतमधल्या किंमतीत मिळणारे लो-मेंटेनेंन्स पर्याय आहेत.
Photo of author

Ajinkya Sidwadkar

२०१० पासून ब्लॉग लिखाण करणारा अजिंक्य सध्या एक मराठी युट्युबर असून त्याला ऑटो मोबाइल क्षेत्रातील माहिती लिहिण्याची आवड आहे.

Leave a Comment