फेसलिफ्ट व्हर्जनमध्ये BMW ला मिळाले डिझाइन अपडेट्स आणि टेक्नोलॉजी अपडेट्स

Published:

BMW iX हा BMW iX ब्रँड फ्लेक्स इलेक्ट्रिक SUV मधला प्रकार आहे, जो अतिशय शक्तिशाली आहे, इंटेरियर्स प्रीमियम आहेत, ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीने भरपूर असणारी ही शानदार कार फेसलिफ्ट वर्जनमध्ये आता उपलब्ध होत आहे; xDrive45, xDrive60 आणि शक्तिशाली M70 xDrive. चला पाहूया या BMW iX facelift ची माहिती. BMW iX Facelift with Styling and Performance Updates

1. डिझाइन अपडेट्स आणि नवीन रंग पर्याय

BMW च्या डिझाईन अपडेट्समध्ये नवीन एलिमेंट्सचा समावेश करण्यात आलेला आहे, ज्यामध्ये आधुनिक ग्रील आणि हेडलाइट्स मिळतात, गाडीच्या पुढच्या बाजूमध्ये एक नवीन बोल्ड ग्रिल आणि आकर्षक हेडलाइट्स दिलेले आहेत, ज्यामुळे गाडीचा लुक अधिक डायनामिक आणि फ्युचरिस्टिक कुठून दिसतो, शिवाय या कारला नवीन रंग पर्याय सुद्धा ऑफर करण्यात आलेले आहे. नव्याने लक्षात येणारी गोष्ट म्हणजे यामधील एकात्मिक डिफ्युजर सोबत असणारा नवीन बंपर आहे.

या फेसलिफ्टमध्ये पुढच्या आणि मागील प्रवाशांसाठी आणि हरमन गार्डन साऊंड सिस्टिम पुरवण्यात आलेले आहे शिवाय ऑटोमॅटिक सॉफ्ट-क्लोज डोअर्स, पॅरामिक ग्लास रूफ, हाय पॉवर्स बॉवर्स आणि विल्किन्स डायमंड सराउंड साउंड सिस्टम मिळते.

हेपण वाचा: Tata Car Discounts – सणसुदीच्या मुहूर्तावर टाटा कार्स वर मिळतोय 3 लाख रुपयांचा डिस्काऊंट

2. BMW iX फेसलिफ्ट: पॉवरट्रेन

या फेसलिफ्टचे इंटिरियर सुद्धा. बदललेले आहेत जिथे जुन्या मॉडेलमध्ये टू-स्पोक स्टेरिंग विल पंचकोनी आकाराचे मिळायचे त्या ठिकाणी नवीन गोल आकाराचे फ्री स्पॉक्स स्टेरिंग व्हील मिळते. या नवीन iX च्या (xDrive45, xDrive60, M70) तिन्ही प्रकारांमध्ये AWD- ऑल व्हील ड्राइवचा पर्याय सोबत ड्युअल मोटर सुद्धा दिले गेलेले आहे. यातील एंट्री-स्पेक xDrive45 ला 402hp आणि 700Nm टॉर्क जनरेट करणारा नवीन 94.8kWh बॅटरी पॅक मिळतो, मिड-रेंज xDrive60 मध्ये मोठी 109.1kWh बॅटरी मिळते, जी 536hp आणि 765Nm टॉर्क जनरेट करते. आणि M70 प्रकार, 108.9kWh ची बॅटरी पॅक मिळतो, जो 650bhp आणि 1,100Nm इतका टॉर्क जनरेट करतो.

3. BMW iX फेसलिफ्ट कधी लॉन्च होणार?

यामधील वेगवेगळे बॅटरी बॅक वेगवेगळे रेंज पुरवतात, xDrive60 एका चार्जवर 701 किमी प्रवास करू शकते तर xDrive45 ने 602 किमी प्रवास त्याच दरम्यान M70 ही एका चार्जर 600 किमीचा पल्ला गाठू शकते. ह्या फेसलिफ्टला इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवर लॉन्च केल्यानंतर भारतामध्ये सुद्धा लॉन्च करण्याची अपेक्षा केली जाते, सध्या भारतामध्ये बीएमडब्ल्यू xDrive 50 वेरिएंटमध्ये उपलब्ध आहे, xDrive 50 ची किंमत 1.39 कोटी रुपये एक्स-शोरूम इतकी आहे.

Photo of author

Aishwarya Potdar

मला ऑटोमोबाइल फिल्डमधली माहिती वाचायला आणि या ब्लॉगच्या मदतीने तुमच्यापर्यंत सरळ, सोप्या मराठी भाषेत मांडायला खूप आवडते. २०१९ पासून मी ह्या क्षेत्रात वेगवेगळ्या ब्लॉगवर काम करत आहे. तुम्हाला ह्या पेजवर नवीन कार, इलेक्ट्रिक कार-बाईक आणि स्कूटर याचसोबत ऑटोमोबाईलमधील येणारे नवे अपडेट यांची संपूर्ण माहिती मिळेल.

Leave a Comment