‘छप्पड फाडके’ कार सेल, मालामाल झाल्या या कार कंपन्या Car Sales

Published:

भारतामध्ये डिसेंबर 2024 मध्ये सुमारे साडेतीन लाख प्रवासीकार विकला गेलेले आहेत 2023 डिसेंबर च्या तुलनेत ही कार विक्रीची वाढ जवळपास 11 टक्क्याने वाढलेले आहे. Car Sales 2024-25

डिसेंबर हा महिना म्हटलं की कारवर भरपूर डिस्काउंट आणि वर्षाअखेरच्या ऑफर्स मुबलक प्रमाणात मिळतात, तुम्हाला सुद्धा जर या नवीन वर्षात डिसेंबर 2024 मध्ये अशा कोणत्या कार कंपनी आहेत ज्यांनी मागील वर्षाच्या तुलनेत यंदा अधिक कार विकलेल्या?आहेत सोबतच अशा कंपन्या ज्यांच्या कार विक्रीमध्ये घट झालेली आहे ? याची माहिती जाणून घ्यायची असेल तर खालील माहिती वाचा.

मारुतीचा ब्रेक आऊट Car Sales

एअर टू एअर कार सेलमध्ये मारुती सुझुकी चे नाव अव्वल येते , मारुती सुझुकी ने डिसेंबर 2023 मध्ये 1,04,788 वाहनांची विक्री केलेली होती तर त्याच तुलनेत डिसेंबर 2024 मध्ये 1,30,115 युनिट्स विकले, जवळपास मागील वर्षापेक्षा यंदा 24.18 टक्क्यांनी मारुती सुझुकीने त्यांच्या वाहनांचा खप केलेला आहे.

हेपण वाचा: ह्युंदाई क्रेटा इलेक्ट्रिक कलर ऑप्शन्स, व्हेरिएंट तपशील – बुकिंग

तर त्याच तुलनेत मंथ-टू-मंथ कार सेलमध्ये मारुती सुझुकीने नोव्हेंबर 2024 मध्ये 1,41,312 वाहने विकलेली पण डिसेंबर 2024 मध्ये हा खप जवळजवळ 7.9% ने खाली उतरला म्हणजेच डिसेंबर २०२४ मध्ये या कंपनीने 1,30,115 वाहने विकले. यामध्ये मारुती सुझुकीचे हॅचबॅग , व्हॅन आणि युटीलिटी वाहनात विक्री वाढ झालेली आहे, पण Sedan विभागात मात्र विक्रीत घट झालेली आहे.

टाटाची 1.73 % वाहन विक्रीत वाढ

त्यानंतर भारतामध्ये सर्वात जास्त विक्री करणारे वाहन कंपनी म्हणजे टाटा मोटर्स. टाटा मोटर्स ने डिसेंबर 2023 मध्ये 43,471 युनिटची वाहन विक्री केली होती तर डिसेंबर 2024 दरम्यान 750 वाहने अधिक विकून 1.73 टक्क्यांनी वाहन विक्रीत वाढ केलेली आहे.

महिंद्राची 17.78% जास्त वाहन विक्री

महिंद्रा कार कंपनीच्या बाबतीत महिंद्राने डिसेंबर 2023 मध्ये 35, 171 युनिट्स विकले तर त्याच तुलनेत डिसेंबर 2024 मध्ये 41,424 युनिट्स विकले जवळपास 2023 डिसेंबर महिन्याच्या तुलनेत डिसेंबर 2024 मध्ये महिंद्राने 17.78% ज्याद्याच्या वाहनांची विक्री केलेली आहे.

एमजी मोटर्स आणि रेनॉल्ट इंडियाने 800पेक्षा अधिक वाहने विकली

एमजी मोटर्सने डिसेंबर 2023 मध्ये 4400 वाहने विकले तर डिसेंबर 2024 मध्ये ह्याच वाहन विक्रीचा आकडा जवळपास 70.82 टक्क्यांनी वाढला म्हणजेच डिसेंबर 2024 मध्ये एमजी मोटर्सने 7516 वाहने विकली. रेनॉल्ट इंडियाने डिसेंबर 2023 मध्ये 1988 वाहने विकले तर त्याच तुलनेत डिसेंबर 2024 मध्ये 893 वाहने जादा विकली म्हणजेच रेनॉल्ट ने 2024 मध्ये 2,881 वाहने जादा विकली

Photo of author

Aishwarya Potdar

मला ऑटोमोबाइल फिल्डमधली माहिती वाचायला आणि या ब्लॉगच्या मदतीने तुमच्यापर्यंत सरळ, सोप्या मराठी भाषेत मांडायला खूप आवडते. २०१९ पासून मी ह्या क्षेत्रात वेगवेगळ्या ब्लॉगवर काम करत आहे. तुम्हाला ह्या पेजवर नवीन कार, इलेक्ट्रिक कार-बाईक आणि स्कूटर याचसोबत ऑटोमोबाईलमधील येणारे नवे अपडेट यांची संपूर्ण माहिती मिळेल.

Leave a Comment