Elevate Black Edition लॉंचसाठी सज्ज

Published:

कारमधल्या डार्क एडिशनकडे ग्राहकांचा वाढता कल बघता होंडाने त्यांच्या बेस्ट सेलर सेगमेंटमधल्या Honda Elevate ला डार्क एडिशन दिले आहे. ज्यामुळे ही होंडा एलिव्हेट आधीच्या तुलनेत अजूनच बोल्ड आणि प्रीमियम दिसते, ही नवीन होंडा एलिव्हेट ब्लॅक एडिशन लॉन्च होण्याआधीच चाचणी दरम्यान हेरली गेलेली आहे आणि त्यामध्ये अनेक गोष्टींवरून पडदा सुद्धा उघडला गेलेला आहे तुम्हाला सुद्धा नवीन होंडा एलिव्हेट ब्लॅक एडिशन बघण्याची- चालवण्याच्या आतुरता लागून राहिली असेल तर खालील माहिती संपूर्णपणे वाचा. Honda Cars India Limited.

Elevate Black Edition

सध्या मार्केटमध्ये विकली जाणारी होंडा एलिव्हेट ही सात मोनोटोन शेड्स शिवाय तीन ड्युअल टोन्स शेड्समध्ये विकली जाते, पण या सगळ्यांवर पारडं जड असणारी होंडा एलिवेटचं ब्लॅक एडिशन हे बोल्ड लूकमुळे आणि प्रीमियम फीचर्समुळे अनेकांचं मन जिंकून जाते.

Elevate Black Editionमध्ये मिळणार प्रायव्हसी

चाचणी दरम्यान पाहण्यात आलेल्या होंडा ब्लैक एडिशन एलिव्हेटचे अलॉय व्हील संपूर्णपणे काळ्या रंगातून दिसतात. होंडा एलिमेंट मध्ये प्रायव्हसी मेंटेन करण्यासाठी मागील विंड शील्ड सन रूप आणि खिडक्यांसाठी टिंटेड प्रायव्हसी ग्लास सुद्धा ऑफर केलेली आहे. डार्क एडिशनच्या बाहेर बाजूची माहिती देतात या गाडीच्या समोरचे हेडलाईट आणि मागचे टेल लाईट्स खूपच आकर्षक दिसतात.

हेपण वाचा: Hyundai Creta Electricचे सिक्रेट फीचर्स झाले रीव्हिल

Elevate Black Edition इंटिरियर

जिथे होंडा एलिव्हेटच्या इंटेरियर मध्ये ब्लॅक आणि ब्राऊन इंटेरियर मिळतो त्याच तुलनेत या एलेवेट ब्लॅक एडिशनला संपूर्ण इंटिरियर थीम ही काळ्या रंगातून मिळते.

होंडा एलिव्हेट ब्लॅक एडिशन इंजिन

चाचणी दरम्यान हेरण्यात आलेल्या होंडा एलिव्हेट ब्लॅक एडिशनमध्ये 119 bhp पीक पॉवर आणि 145 Nm टॉर्क जनरेट करणारं 1.5L NA पेट्रोल i-VTEC इंजिन दिले गेलेले आहे, हे इंजिन 6 स्पीड MT किंवा 6 स्पीड AMT शी जोडले जाईल.

Photo of author

Aishwarya Potdar

मला ऑटोमोबाइल फिल्डमधली माहिती वाचायला आणि या ब्लॉगच्या मदतीने तुमच्यापर्यंत सरळ, सोप्या मराठी भाषेत मांडायला खूप आवडते. २०१९ पासून मी ह्या क्षेत्रात वेगवेगळ्या ब्लॉगवर काम करत आहे. तुम्हाला ह्या पेजवर नवीन कार, इलेक्ट्रिक कार-बाईक आणि स्कूटर याचसोबत ऑटोमोबाईलमधील येणारे नवे अपडेट यांची संपूर्ण माहिती मिळेल.

Leave a Comment