2025 च्या नवीन वर्षात ह्युंडाईची क्रेटा इलेक्ट्रिक बुकिंगसाठी ओपन झालेली आहे फक्त 25,000 ही गाडी आता तुम्हाला बुक करता येते, याबाबतीत सविस्तर माहितीचा लेख तुम्हाला या पेजवर मिळेलच पण आता हुंडाई क्रेटा इलेक्ट्रिक बाबतीत अधिक माहिती अधिक माहिती बाहेर पडलेली आहे. तुम्हाला सुद्धा हुंडाई क्रेटाच्या बुकिंगसोबत या इलेक्ट्रिक क्रेटामधले कलर ऑप्शन्स आणि व्हेरियंट्स जाणून घ्यायचे असतील, तर सदर माहिती संपूर्णपणे वाचा.
हुंडाईने क्रेटा इलेक्ट्रिक बुकिंग
हुंडाईने क्रेटा इलेक्ट्रिकसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन माध्यमाद्वारे क्रेटा इलेक्ट्रिकचे बुकिंग सुरू केलेले आहेत फक्त 25,000 रुपयांची टोकन अमाऊंटवरून या इलेक्ट्रिक क्रेटाचे बुकिंग तुम्ही काही मिनिटातच करू शकता आणि आता या इलेक्ट्रिक क्रेटाचे रंग पर्याय आणि ट्रीम सुद्धा बाहेर पडलेले आहेत.
हेपण वाचा: नव्या वर्षासाठी Hyundai Creta च Electric वर्जन
इलेक्ट्रिक क्रेटा भारतीय बाजारपेठेत पाच ट्रिममध्ये उपलब्ध
इलेक्ट्रिक क्रेटा भारतीय बाजारपेठेत पाच ट्रिममध्ये उपलब्ध होणार आहे; एक्झिक्यूटिव्ह , स्मार्ट (O), प्रीमियम आणि एक्सलन्स या पाच वेरियंट्समध्ये क्रेटा तुम्हाला खरेदी करता येऊ शकते. इलेक्ट्रिक क्रेटामध्ये पाच व्हेरियंट्सला वेगवेगळे असे दोन बॅटरी पॅक पुरवलेले आहेत; एक्झिक्युटिव्ह, स्मार्ट, स्मार्ट (ओ), प्रीमियम या वेरिएंट्सला 42 kWh चा बॅटरी पैक मिळतो, तर स्मार्ट (O) आणि एक्सलन्स या व्हेरिनेट्सला 51.4 kWh चा पर्याय मिळतो.
इलेक्ट्रिक क्रेटा भारतीय बाजारपेठेत या रंगांमधून उपलब्ध
इलेक्ट्रिक क्रेटा ही ॲटलस व्हाइट, ॲबिस ब्लॅक पर्ल, फायरी रेड पर्ल, स्टाररी नाईट आणि क्रेटा इलेक्ट्रिक, ओशन ब्लू शेड या रंगातून उपलब्ध असेल, यात शिवाय तीन मॅट कलर ऑप्शन जसे; रोबस्ट एमराल्ड मॅट, टायटन ग्रे मॅट आणि खास ओशन ब्लू मॅटऑप्शन सुद्धा दिले जाणार आहेत शिवाय यामध्ये ॲटलस व्हाईट आणि ओशन ब्लूसह ब्लॅक रूफसोबत ड्युअल-टोन पर्याय सुद्धा मिळतो.
17 जानेवारी 2025 ला लॉन्च होणारी eSUV ही बऱ्याच जणांच्या वेटिंग लिस्ट मध्ये आहे, इलेक्ट्रिक क्रेटाचे इंटेरियर आणि एक्सटेरियर दोन्हीही डोळ्याचे पारणे फेडणारे आहेत. ॲडव्हान्स फीचर्समध्ये LED 10.2 इंचाची स्क्रीन, ब्लाइंड-स्पॉट मॉनिटरिंग, बोस ऑडिओ, लेव्हल-2 ADAS, 360-डिग्री कॅमेरा आणि फ्रंट व्हेंटिलेटेड सीट्स यांसारख्या इतर ऍडव्हान्स फीचर्स सुद्धा समावेश ह्युंडाईच्या पहिल्या इलेक्ट्रिक कारमध्ये आहे. या इलेक्ट्रिक क्रेटामध्ये दोन बॅटरी पॅक दिलेले आहेत, त्यातील मोठा म्हणजे 51.4 kWh बॅटरी पॅक एका चार्जवर 473 किलोमीटर इतकी रेंज पार करू शकतो.