Hyundai Motor India Limited ची पहिली इलेक्ट्रिक SUV म्हणजेच Hyundai Creta Electric जी लवकरच लॉन्च होत आहे, या कारची बोल्ड आणि पिक्सल डिझाईन ज्यामुळे या इलेक्ट्रिक कारची सगळीकडे चर्चा चालू आहे, पण या कारमध्ये अशा ठळक पाच गोष्टींचा समावेश करण्यात आलेला आहे ज्यामुळे Hyundai creta EV ही इतर कारमध्ये उठून दिसते, चला जाणून घेऊया या कार मधले 5 फोकस पॉइंट. Hyundai Creta Electric: The Game-Changing points
5. हुंडाई क्रेटा इलेक्ट्रिक फीचर्स
हुंडाई क्रेटा इलेक्ट्रिकमध्ये प्रीमियम फीचर्सची भर देण्यात आलेली आहे, ड्युअल 10.25-इंच कर्व्हिलिनियर कॉकपिट , हाय रीसोल्युशन इन्फोटेनमेंट सिस्टम आणि डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर एकत्र देण्यात आलेले आहेत इन्फोटेक सिस्टीम मध्ये अँड्रॉइड ऑटोपले आणि ॲपल कार प्लेचा पर्याय मिळतो. व्हॉइस-ॲक्टिव्हेटेड ड्युअल-पेन पॅनोरामिक सनरूफ सुध्दा यामध्ये उपलब्ध आहे.
हेपण वाचा: नव्या वर्षासाठी Hyundai Creta च Electric वर्जन
4. हुंडाई क्रेटा इलेक्ट्रिक फोकस पॉइंट
हुंडाई क्रेटा इलेक्ट्रिक ही भारतामध्ये 4 व्हेरियंट्स मध्ये उपलब्ध असणार आहे ज्यातील एक्झिक्यूटिव्ह, स्मार्ट, प्रीमियम आणि एक्सलन्स हे वेरियंट्स ग्राहकांना विक्रीसाठी उपलब्ध असतील.. हुंडाई इलेक्ट्रिक क्रेटा मध्ये असणारे फोकस पॉइंट इलेक्ट्रिक ही एक बोल्ड आणि स्फूर्ती डिझाईन असणारी कार आहे ज्यामध्ये युनिक पिक्सलिटेड ग्राफिक असं पुढचा आणि मागचं डिझाईन केलेला आहे ज्यामध्ये सोबत लो रोलिंग रेजिस्टन्स टायर्स यांचा समावेश आहे.
3. हुंडाई क्रेटा मधले ॲडव्हान्स प्रीमियम फीचर्स
हुंडाई क्रेटा इलेक्ट्रिक मधले ऍडव्हान्स फीचर्स क्रेटा इलेक्ट्रिक मध्ये बोल्ड आणि इन्स्पायर अशी डिझाईन मिळते ज्यांच्यामध्ये इलेक्ट्रिक आणि ॲडव्हान्स प्रीमियम फीचर्स सुद्धा भर आहे ज्यात स्मार्टफोन आणि स्मार्ट वॉच एक्सेस करण्यासाठी डिजिटल की मिळते शिफ्ट बाय वायरचा पर्याय मिळतो जो कॉलम टाईप आणि आय पॅडल टेक्नॉलॉजी ड्रायव्हिंग इझी करण्यासाठी अतिशय गरजेचा असा ठरतो शिवाय वेहिकल टू वेहिकल लोड सारख्या एडवांस्ड फीचर्स सुद्धा या कारमध्ये समावेश आहे
2. इलेक्ट्रिक क्रेटामध्ये गेम-चेंजर सेफ्टी फीचर्सची भर
ह्युंडाईने क्रेटा इलेक्ट्रिक मध्ये प्रीमियम फीचर्स सोबत विचार लक्षात घेऊन सीटबेल्ट रिमाइंडर, 6 एअरबॅग, ABS, ब्लाइंडस्पॉट मॉनिटरिंग, लेव्हल-2 ADAS सूट, adaptive cruise control, avoiding forward-scarcity, 360-डिग्री कॅमेरा यांचा समावेश केला आहे.
1. 400 किमीपेक्षा अधिक रेंज देणारा बॅटरी पॅक
क्रेटा इलेक्ट्रिक मधले सर्वात महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे हुंडाई क्रेटाची बॅटरी आणि त्या बॅटरी मार्फत मिळणारी फास्टेस्ट आणि लोंगेस्ट रेंज बॅटरी पॅक, या इलेक्ट्रिक कार मध्ये 51.4 kWh चे वेरिएंट सुद्धा उपलब्ध आहे, ज्यामध्ये 171 PS ची मोटर मिळते, या मोटरद्वारे हे व्हेरियंट फक्त 7.9 सेकंदात 0-100 किलोमीटर ताशी वेग वाढवू शकते. यातील दोन्ही बॅटरीमधून विविध रेंज प्राप्त होते. 42 kWh च्या बॅटरी पैकमार्फत 390 किमी रेंज तर 51.4 kWh क्षमतेच्या बॅटरी पॅक मधून 473 किमी लॉन्ग रेंज या हुंडाई क्रेटा इलेक्ट्रिक कार मार्फत मिळते. हुंडाई क्रेटा इलेक्ट्रिक फक्त 58 मिनिटांमध्ये 10- 80% पर्यंत फास्ट चार्ज होऊ शकते त्याच दरम्यान जर तुम्ही या कारला 11 किलो 11kW वॉल बॉक्स होम फास्ट एसी चार्जर ने चार्ज केलं तर फक्त 4 तासांमध्ये 10- 80% चार्ज होऊ शकते.