नव्या वर्षासाठी Hyundai Creta च Electric वर्जन

Published:

ह्युंडाईची बेस्ट सेलर क्रेटा एसयूव्हीचे इलेक्ट्रिक व्हर्जन म्हणजेच Creta EV लवकरच भारतीय रस्त्यांवर धावताना दिसणार आहे, या गाडीला 17 जानेवारी 2025 मध्ये भारत मोबिलिटी एक्सपो दरम्यान लॉन्च करण्यात येणार आहे. Tata Curvv .ev आणि MG ZS EV या दोन गाड्यांना टक्कर देणाऱ्या क्रेटा एसयूव्हीच्या इलेक्ट्रिक व्हर्जन बाबतीत तुम्हाला जर संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर सदर माहिती वाचा.

Hyundai Creta Electric ची संपूर्ण माहिती

ह्युंडाई क्रेटा ईव्हीची क्रेटा ICE मॉडेल प्रमाणेच डिझाईन आणि स्टाइलिंग केलेली आहे, यामध्ये 45 किलोवॅटचा बॅटरी पॅक असणार आहे, जो फ्रंट माउंट इलेक्ट्रिक मोटरला पॉवर देईल. ही मोटर 138 hp इतकी पॉवर आणि 255 Nm टॉर्क इतका जनरेट करते.

ह्युंडाई Creta EV बाहेरून कशी असेल?

डिझायनिंगच्या बाबतीत, क्रेटा इलेक्ट्रिक ही ICE मॉडेल सारखी जरी असली, तरी यातील इलेक्ट्रिक फिक्चर्स हे संपूर्णपणे नवीन आणि वेगळे तयार आहेत; ज्यामध्ये आपल्याला सुधारित बंपर मिळतो सोबत क्लोज-ऑफ फ्रंट लोखंडी ग्रील, एरोडायनामिक अलॉय व्हील्स, फ्रंट माउंट चार्जिंग पोर्ट आणि कनेक्टेड एलईडी टेल- लॅंप्स यांचा समावेश आहे पुढच्या बाजूच्या लाइटिंग सेटअपमध्ये एलईडी लाईट्स आणि टर्न इंडिकेटर्स मिळू शकतात.

असे असतील ह्युंडाई Creta EV च्या आतील फीचर्स

ह्युंडाईचा या नव्या ईव्हीच्या केबिनची माहिती देता, 10.25 इंचाचा डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले आणि 10.25 इंचाचा टच स्क्रीन इन्फोटेनमेंट, बोस साऊंड सिस्टिम, व्हॉइस-ॲक्टिव्हेटेड पॅनोरमिक सनरूफ शिवाय आणि व्हेंटिलेटेड पावर फ्रंट सीट्स, सिग्नेचर फॉर-डॉट स्टेरिंग व्हील, लेव्हल 2 ADAS, वायरलेस स्मार्टफोन चार्जिंग आणि 360 डिग्री कॅमेरा यांसारख्या प्रीमियम फीचर्स समावेश आहे.

ह्युंडाई क्रेटा ईव्ही सेफ्टी फीचर्स

ह्युंडाई क्रेटा ईव्हीच्या सेफ्टी फीचर्समध्ये, ऍडव्हान्स ड्रायव्हर असिस्टंट सिस्टीम आणि ऍडॉप्टीव्ह क्रूज कंट्रोल आणि फॉरवर्ड कॉलिजन वॉर्निंग आणि ब्लाइंड स्पोर्ट डिटेक्शन याच सोबत ऑटोमॅटिक इमर्जन्सी ब्रेकिंग सिस्टीम यांसारख्या ऍडव्हान्स फीचर्स समावेश असणार आहे. ही कार 6 एअर बॅग आणि पावर्ड टेल गेटने सुसज्ज असणार आहे.

Photo of author

Aishwarya Potdar

मला ऑटोमोबाइल फिल्डमधली माहिती वाचायला आणि या ब्लॉगच्या मदतीने तुमच्यापर्यंत सरळ, सोप्या मराठी भाषेत मांडायला खूप आवडते. २०१९ पासून मी ह्या क्षेत्रात वेगवेगळ्या ब्लॉगवर काम करत आहे. तुम्हाला ह्या पेजवर नवीन कार, इलेक्ट्रिक कार-बाईक आणि स्कूटर याचसोबत ऑटोमोबाईलमधील येणारे नवे अपडेट यांची संपूर्ण माहिती मिळेल.

Leave a Comment