जानेवारी 2025 साठी Hyundai Discounts, खास दोन लाखापर्यंत ऑफर

Published:

ह्युंडाईची इलेक्ट्रिक क्रेटा लॉन्च झाल्यानंतर या कंपनीने त्यांच्या आयसीई पोर्टफोलिओवर दोन लाखापर्यंत डिस्काउंट देणे चालू केलेला आहे तुम्ही जर हुंडाईची कार घेण्यासाठी इच्छुक असाल तर खालील माहिती वाचा ज्या माहितीमुळे तुम्हाला तुमच्या आवडती कार विकत घेण्यासाठी कमी पैसे मोजावे लागतील. Hyundai Discounts

क्रेटा इलेक्ट्रिक लॉन्च झाल्यापासून ह्युंडाईचा या वर्षात धमाकेदार अशी एन्ट्री झालेली आहे, या कंपनीची ही पहिली इलेक्ट्रिक कार असून चर्चेचा केंद्रबिंदू असणारी क्रेटा इलेक्ट्रिक ही ऍडव्हान्स फीचर्स ने आणि सेफ्टीने बेस्ट आहे. इलेक्ट्रिक क्रेटा नंतर ह्युंदाई कार कंपनीने MY25 आणि MY124 या दोन्ही वाहनांवर भरगोस अशी सवलत चालू केल आहे. चला एकदा संपूर्ण माहिती बघूया.

1. हुंडाई Exter वर 15K पर्यंत डिस्काउंट

भारतामध्ये सध्या सर्वात विकल्या जाणाऱ्या टाटा पंचला टक्कर देणाऱ्या ह्युंडाई एक्स्टरच्या हुंडाई EX आणि EX (O) पेट्रोल वेरिएंटवर जरी सवलत मिळत नसली तरी इतर पेट्रोल आणि सीएनजी वेरियंटवर सवलत मिळत आहे, यामध्ये पेट्रोलवरील 10,000 रुपयांचा आणि सीएनजी वेरियंटवर 5,000 रुपयांचा एकसमान एक्सचेंज बोनस मिळणार आहे , थोडक्यात ह्युंडाई एक्स्टरवर एकूण 15,000 रुपयांचा डिस्काउंट मिळणार आहे.

2. Hyundai Aura – 23K पर्यंत डिस्काउंट

MY25 Aura वर सुद्धा जवळपास 23,000 रुपयांपर्यंत डिस्काउंट मिळणार आहे, 5,000 रुपयांची रोख सूट तर इतर सीएनजी आणि पेट्रोल वेरिएंट (MT -AT ) यांच्यावर 10,000 रुपयांची रोख सवलत, 10,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 3,000 रुपयांची कार्पोरेट सुट मिळणार आहे.

3. Grand i10 NIOS – 23K पर्यंत डिस्काउंट

हुंडाई ग्रांड आय टेन NIOS वर 23,000 रुपयांचा डिस्काउंटमिळणार आहे, यामध्ये 10,000 रुपयांची रोख सवलत, 10,000 रुपयांचा एक्सचेंज आणि 3,000 रुपयांच्या कार्पोरेट ऑफर्स लागू आहेत, सर्व पेट्रोल एमटी व्हेरिएंट्स (MT), पेट्रोल एएमटी वेरियन्स (AMT)आणि सीएनजी व्हेरिएंट्स (CNG) वर ऑफर मिळणार आहेत.

 4. i20 – रु. 25K पर्यंत सूट

हुंडाई आय ट्वेन्टी MT व्हेरिएंटवर 15,000 रुपयांची आणि iVT व्हेरिएंटवर 15,000 रुपयांची रोख सवलत मिळणार आहे, दोन गिअर बॉक्सपर्यायवर 10,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस सुद्धा दिला जात आहे, एकूण MT सोबत 25,000 रुपयांचा आणि iVT सोबत 20,000 रुपयांचा एकूण बोनस या कारच्या खरेदीवर मिळणार आहे.

5. Verna वर 30K पर्यंत सूट

हुंडाई Verna च्या सर्व वेरियंटवर 15,000 रुपयांची रोख सुट, 10,000 रुपयांची एक्सचेंज सवलत आणि 5,000 रुपयांची कार्पोरेट सूट मिळणार आहे, Verna या कारवर एकूण 30,000 रुपयांची सूट मिळणार आहे.

6. हुंडाई वेन्यू वर 25,000 रुपयांचा डिस्काउंट

वेन्यू मधले टर्बो एमटी आणि डीसीटी या वेरियंटवर 15,000 रुपयांची रोख सवलत आहे सोबत 1.2 lt NA पेट्रोलवर वेरिएंट वर 10,000 रुपयांची सूट मिळणार आहे, थोडक्यात Venue वर 25,000 पर्यंत डिस्काउंट मिळणार आहे.

हेपण वाचा: ‘छप्पड फाडके’ कार सेल, मालामाल झाल्या या कार कंपन्या Car Sales

7. MY24 Grand i10 NIOS वर 68K रुपयांचा डिस्काउंट

ह्युंडाईचा बेस एरा वेरिएंट Grand i10 NIOS – MY24 वर 20,000 रुपयांची सवलत मिळणार आहे, CNG वेरिएंटवर रु. 25,000 आणि NA पेट्रोल (MT आणि AMT) वेरिएंटवर रु. 45,000 रोख सवलत मिळत आहे. Grand i10 NIOS वर 20,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 3,000 रुपयांचा कार्पोरेट बोनस मिळत आहे.

 8. वेर्ना (MY24) वर रु. 75K पर्यंत सूट

MY24 Verna वेरीएंट्स वर 35,000 रुपयांची रोख सवलत आणि 20,000 रुपयांचा एक्सचेंज आणि कार्पोरेट बोनस , एकूण हुंडाई MY24 Verna वर 75,000 रुपयांची सवलत मिळत आहे.

9. प्री-फेसलिफ्ट अल्काझारवर 60K पर्यंत सूट

MY24 Alcazar (प्री-फेसलिफ्ट) वर  30,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि  30,000 रुपयांची रोख सवलत लागू पडत आहे, एकूण अल्काझार वर 60,000 रुपयांपर्यंत डिस्काउंट लागू झालेला आहे.

10. MY24 टक्सनवर 45K पर्यंत सूट

MY24 Tucson डिझेल व्हेरिएंट वर 20,000 रुपयांची रोख सुट आणि 25,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस मिळत आहे.

Photo of author

Aishwarya Potdar

मला ऑटोमोबाइल फिल्डमधली माहिती वाचायला आणि या ब्लॉगच्या मदतीने तुमच्यापर्यंत सरळ, सोप्या मराठी भाषेत मांडायला खूप आवडते. २०१९ पासून मी ह्या क्षेत्रात वेगवेगळ्या ब्लॉगवर काम करत आहे. तुम्हाला ह्या पेजवर नवीन कार, इलेक्ट्रिक कार-बाईक आणि स्कूटर याचसोबत ऑटोमोबाईलमधील येणारे नवे अपडेट यांची संपूर्ण माहिती मिळेल.

Leave a Comment