ह्युंदाईची Staria प्रीमियम मिनी व्हॅन, हुबेहूक किया कर्निवलच..!

Published:

किया कार्निवलसारखी दिसणारी आणि प्रीमियम मिनी व्हॅन Hyundai Staria MPV  मुंबईच्या रस्त्यांवर धावताना दिसलेली आहे, चला जाणून घेऊया आंतरराष्ट्रीय पातळीवर लोकप्रिय असणाऱ्या या कार बद्दल संपूर्ण माहिती. Hyundai Staria MPV Spotted In India

किया कार्निवल सारखीच लुक असणारी आणि 5.3 मीटर लांब असणारी ह्युंदाई स्टारिया एमपीव्ही लक्झरी कार ही ह्युंडाईच्या लाईन मधली लोकप्रिय अशी कार आहे, जी बहुदा खाजगी आयातीसाठीच बनलेली आहे.

Hyundai Staria: प्रीमियम आणि लक्झरीयस व्हॅन

ह्युंदाई स्टारिया बहुदा खाजगी आयातीसाठीच बनलेली आहे, कारमध्ये प्रीमियम इंटेरियर आणि अनेक ॲडव्हान्स फीचर्स दिलेले आहेत, ही व्हेन लक्झरी मॅन डिझेल आणि हायब्रीड पॉवरट्रेन या दोन पर्यायांमध्ये उपलब्ध आहेत. हुंडाईने नुकतेच 2024 या वर्षात स्टारियाला एक नवीन अपडेट दिलेले आहेत; ज्यामध्ये चालू असणाऱ्या स्टारियाच्या 3.5L V6 पेट्रोल आणि 2.2L टर्बो डिझेल इंजिन सोबत एक हायब्रीड पॉवरट्रेनचा पर्याय सुद्धा दिला गेलेला आहे. हे हायब्रीड वेरियंट 1.6 लिटर टर्बो पेट्रोल इंजिनला इलेक्ट्रिक मोटर सोबत जोडते, ज्यामुळे 242 बीएचपी इतकी पावर आणि 367 इतका टॉर्क तयार होतो. ही प्रीमियम व्हॅन एका लिटरच्या इंधनात 13 किलोमीटर पर्यंत प्रवास करते. स्टारियाची डिझाईन अतिशय आकर्षक असा आहे खिडक्यांना असणारी मोठी काच आणि स्लाईड होणारे मागचे दरवाजे ही व्हॅन प्रीमियम असल्याची ओळख करून देतात.

हेपण वाचा: टाटा मोटर्सच्या अपकमिंग फॅमिली कार 2025- Tata Motors upcoming cars

स्टारिया भारतीयांसाठी उपलब्ध होईल का?

हुंडाई स्टारिया या भारतात लॉन्च होण्याची हुंडाई कडून काही माहिती बाहेर पडली नसली तरी तुम्हाला जर स्टारिया आवडली असेल तर हिच्याशी मिळते-जुळते असे मॉडेल सध्या भारताच्या रस्त्यांवर धावत आहे ज्याच नाव आहे; किया कार्निवल. हुंडाई स्टारिया आणि किया कार्निवल हे दोन्ही N3 प्लॅटफॉर्मवर बांधण्यात आलेले आहेत, ज्यामध्ये फ्रंट व्हील ड्राईव्ह आणि ऑल ड्राईव्हचा पर्याय मिळतो. स्टारिया 7 सीटर लाउंज इंस्पिरेशन ट्रिम असून स्टारियासाठी किया कार्निवल हा पर्याय उत्तम ठरू शकतो.

Photo of author

Aishwarya Potdar

मला ऑटोमोबाइल फिल्डमधली माहिती वाचायला आणि या ब्लॉगच्या मदतीने तुमच्यापर्यंत सरळ, सोप्या मराठी भाषेत मांडायला खूप आवडते. २०१९ पासून मी ह्या क्षेत्रात वेगवेगळ्या ब्लॉगवर काम करत आहे. तुम्हाला ह्या पेजवर नवीन कार, इलेक्ट्रिक कार-बाईक आणि स्कूटर याचसोबत ऑटोमोबाईलमधील येणारे नवे अपडेट यांची संपूर्ण माहिती मिळेल.

Leave a Comment