Kia Syros X लाइन 2025 ही प्रीमियर SUV सहा ट्रिम मध्ये लॉन्च होत आहे, पण या कार मध्ये वैशिष्ट्य असणारी गोष्ट म्हणजे या कारला मिळालेला स्टिल्थी गडद रंग. Sonet X Line प्रमाणेच या सायरस एक्स लाईन ला रंग मिळालेले आहेत ही कार 2025 मधल्या सणासुदीच्या काळात लॉन्च होणार असून या कार कडून तुम्ही काय काय अपेक्षा करू शकता, चला जाणून घेऊया याची संपूर्ण माहिती. Kia Syros X Line Stealthy Colours
Kia Syros X लाइन 2025
Syros X Line साठी नवीन अलॉय व्हिल्स मिळणार आहेत, शिवाय 30 इंचाचा ट्रिनिटी डिस्प्ले, वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि एप्पल कार प्ले, पुढच्या आणि मागच्या बाजूचे हवेशीर सीट्स, मागच्या बाजूला स्लाइडिंग आणि रिक्लेइंग सीट्स, पावर ड्रायव्हर सीट्स आणि लेव्हल-2 ADAS यांसारखी वैशिष्ट्ये मिळणार आहेत. ही 4m SUV अनेक ट्रिम स्तरांमध्ये लॉन्च केली जाईल – HTK, HTK (O), HTK+, HTX, HTX+ आणि HTX+ (O) याप्रमाणे. पॉवरट्रेंनच्या बाबतीत माहिती देता, 1.0L GDI टर्बो पेट्रोल इंजिन 7-स्पीड DCT किंवा 1.5L टर्बो डिझेल इंजिन 6-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक गिअरबॉक्सशी जोडलेले इंजिन यामध्ये मिळत आहे.
हेपण वाचा : टाईट बजेट, नो प्रॉब्लेम..! कमी किमतीत 2025 Tata Nexon चं नवीन अपडेट लॉन्च शिवाय सनरूफसुद्धा..!
किआ सिरोस एक्स लाइन नवीन रंग
चालू सायरोसला फ्रॉस्ट ब्लू, स्पार्कलिंग सिल्व्हर, ग्रॅव्हिटी ग्रे, इम्पीरियल ब्लू, इंटेन्स रेड, प्युटर ऑलिव्ह, ग्लेशियर व्हाइट पर्ल आणि अरोरा ब्लॅक पर्ल मिळतात आणि आता Kia Syros X Line Aurora Black Pearl आणि Matte Graphite हेसुद्धा रंग मिळनार आहेत. या कारमध्ये ६ एअरबॅग्ज, इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक, हिल-होल्ड असिस्ट, ABS, EBD आणि इतर शेननिगन्ससह रडार-आधारित लेव्हल-2 ADAS मिळतात सारखे सेफ्टी फीचर्ससुद्धा मिळत असून Kia Syros ची डिलिव्हरी फेब्रुवारी 2025 मध्ये सुरू होईल.