जुनी थार विसरा आता येणार पॉवरफूल महिंद्रा थार 5-डोअर, लवकरच होणार लाँच – हे आहेत फीचर्स

गेल्या अनेक दिवसापासून  लोकप्रिय ऑफ-रोड एसयूव्ही Mahindra च्या महिंद्रा थार 5-डोर चे स्पायशॉट्स बघायला मिळत आहेत, हि महिंद्राची नवीन थार 2024 च्या जूनमध्ये लाँच होण्याची शक्यता आहे. थारची चाचणी करताना मिळालेल्या काही स्पायशॉट्स मधून ह्या गाडीच्या इंटिरियर बाबतीत काही सुधारणा निदर्शनास आल्या, ज्यामुळे गाडी अधिकच आकर्षित दिसून येतेय.

‘या’ नावांमुळे होतेय गाडीची चर्चा

खरतर या गाडीची चर्चा तिच्या हटके आणि बदलत असणाऱ्या नावांमुळे होतेय , महिंद्रा कंपनीने या गाडीसाठी आत्ता पर्यंत  जवळपास 7 नाव रेडमार्क केली आहेत, ज्यात अर्मदा, कल्ट, रेक्स, रॉक्सएक्स, सवाना, ग्लेडियस आणि सेंचुरियन यांचा समावेश आहे, पण या सगळ्यांमध्ये थार आरमाडा या संबंधित काही नाव या गाडीला दिले जाऊ शकते कारण 1993 मध्ये Mahindra Armada ही कंपनीची सर्वात लोकप्रिय SUV लाँच करण्यात आली होती.

ठर

Thar 5-door मध्ये नवीन काय आहे?

फोटोंमधून अनोखी स्टाइलिंग आणि डिझाइन ही स्टॅंडर्ड थारशी मिळतीजुळती असल्याचे स्पष्ठ दिसत आहे, ह्या सनरूफ SUV गाडीच्या चाचणीदरम्यान मिळालेल्या फोटोंमध्ये डॅशबोर्डच्या संबंधित काही बदल दिसून आले, ज्यामध्ये मोठ्या आकाराने असणारी टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम युनिट जे साधारण 10.25 इंच असण्याची शक्यता आहे. या गाडीमधला युसर्स इंटरफेस सुधारित होण्याची अपेक्षा आहे. नवीन 5-दरवाजा थार मध्ये नवीन इन्स्ट्रुमेंट क्लस्टर ज्यात मोठा MID आहे जो हुबेहूब Scorpio N ची नक्कल करतो. थारच्या या मोठ्या टचस्क्रीनमध्ये काही बदल करण्यात आले आहेत, जसे की HVAC कंट्रोल, AC व्हेंट्स, टॉगल स्विचेस आणि फिसिकल्स बटन्स, कोणत्याही suv मध्ये बसल्यावर गाडीकडून असणारी महत्वाची अपेक्षा आराम, ह्या गोष्टी लक्षात ठेऊन Thar 5-doorच्या फ्रंटसीटमध्ये आरामदायी आर्मरेस्ट देण्यात आले आहे. यामध्ये महत्वाचं अपग्रेड आहे ते डॅशकॅम आणि सनरूफशी निगडित आहे.

वाचा: Honda Activa Electric Scooter जानेवारी मध्ये होणार लाँच, पहा रेंज आणि टॉपस्पीड

महिंद्रा 5-डोअर थार: स्पेसिफिशन्स

स्टँडर्ड थारच्या तुलनेत ही महिंद्रा ५डोर थार लांबीला बऱ्यापैकीमोठी असणार आहे, ज्याचा थेट परिणाम ऑफ रोडिंग कॅपबिलिटीवर होऊ शकतो. गाडीच वजन जास्त असल्याने सस्पेशनसेटअप मध्ये बदल होऊ शकतो.
दोन पॉवरट्रेन इंजिन पर्याय असणाऱ्या थारमध्ये 150 HP च पेट्रोल इंजिन ज्याची क्षमता 2.0 लिटरची आहे आणि 130 Hp ची डिझेल इंजिन ज्याची क्षमता 2.3 लिटर आहे. 6 स्पीड मॅन्युअल सोबत 6 स्पीड टॉर्क कन्व्हर्टरऑटोमॅटिक ट्रांसमिशन ऑप्शन उपलब्ध आहेत.

वाचा: बजाज ऑटो ने बंद केली लोकप्रिय चेतक इलेक्ट्रिक स्कूटर, जाणून घ्या कारण

महिंद्रा थार 5-डोर: किंमत

मोठ्या आकाराची सोबत नवीन अपडेट घेऊन आलेली महिंद्रा 5-दरवाजा थार 6 लाख ते 20 लाख रुपयांच्या किंमतीत लॉन्च होऊ शकते.  हि किंमत सध्याच्या थार किंमतच्या तुलनेत आधिक असून सध्याच्या महिंद्रा थारची किंमत रु. 10.98 लाख (RWD) किमतीमध्ये उपलब्ध आहे, याचंच टॉप-स्पेक डिझेल AT 4WD मॉडेल रु. 16.94 लाख रुपयाला विकलं जात.

तुम्हाला पडलेले प्रश्न 

थार ची  मूळ किंमत काय आहे?

महिंद्रा थारची किंमत रु. पासून सुरू होती. 10.98 लाख किंमतीपासून सुरु होणारी महिंद्रा थारच्या टॉप मॉडेलची किंमत रु. १६.९४ लाख इतकी आहे. या गाडीचं बेस मॉडेल AX Opt 4-Str हार्ड टॉप डिझेल RWD आहे आणि टॉप मॉडेल Mahindra Thar LX 4-Str हार्ड टॉप डिझेल AT हे आहे.

महिंद्रा थार मध्ये किती लोक बसू शकतात?

या गाडीमध्ये ६ लोक आरामात प्रवास करू शकतात.

महिंद्रा थारबद्दल काय खास आहे?

महिंद्रा थारबद्दल काय खास आहे?

महिंद्रा थार एक 7 सीटरची किंमत काय आहे?

4 सीटर SUV महिंद्रा थारची किंमत 10.98 – 16.94 लाख आहे.
 

महिंद्रा थार एक 4×4 आहे?

हो,  प्रभावीशाली  ग्राउंड क्लीयरन्स सोबत यातील चारही चाकांना इंजिन पॉवर मिळते.

Photo of author

Aishwarya Potdar

मला ऑटोमोबाइल फिल्डमधली माहिती वाचायला आणि या ब्लॉगच्या मदतीने तुमच्यापर्यंत सरळ, सोप्या मराठी भाषेत मांडायला खूप आवडते. २०१९ पासून मी ह्या क्षेत्रात वेगवेगळ्या ब्लॉगवर काम करत आहे. तुम्हाला ह्या पेजवर नवीन कार, इलेक्ट्रिक कार-बाईक आणि स्कूटर याचसोबत ऑटोमोबाईलमधील येणारे नवे अपडेट यांची संपूर्ण माहिती मिळेल.

Leave a Comment