वाचा तुमच्या शहरातील महिंद्रा XUV 3XO ची किंमत

Mahindra XUV 3XO

महिंद्राची 3 एक्सओ सध्या अतिशय ट्रेंडमध्ये आहे, ह्या कारने महिंद्राचे बरेच रेकॉर्ड ब्रेक केले आहेत, लाँच झाल्या झाल्या XUV 3XO ह्या गाडीसाठी तब्बल 50 हजारापेक्षाही अधिक बुकिंग झाल्या आहेत. या कारची किंमत 7.49 रुपये ते 15.49 इतकी आहे, ही किंमत महिंद्राची 3 एक्सओ व्हेरिएंटवर अवलंबून आहे. तुम्ही जर महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, लातूर, बीड, नागपूर, मुंबई, रायगड, रत्नागिरी, मुंबई, सोलापूर, बारामती किंवा इतर या शहरांमध्ये राहत असाल आणि तुम्हाला जर तुमच्या शहरामधील या कारची किंमत जाणून घ्यायची असेल तर खालील माहितीमध्ये XUV 3XO च्या किंमतीची संपूर्ण माहिती मिळेल, शिवाय असे कोणते फिचर्स- स्पेसिफिकेशन ह्या कारमध्ये आहेत, ज्यामुळे ह्या कारसाठी रेकॉर्ड-ब्रेक बुकिंग झाले आहेत, याची माहिती सदर लेखात मिळेल.

Screenshot 2024 05 31 at 17.10.01

सदर किमती प्रत्येक शहरात बदलू शकतात.

महिंद्रा XUV 3XO फिचर्स आणि स्पेसिफिकेशन

महिंद्रा 3xO कार मध्ये तीन इंजिन पर्याय मिळतात, 1.2 लिटरचे पेट्रोल इंजिन जे 109 bhp पॉवर आणि 200 Nm इतका टॉर्क तयार करत, 1.2 लीटरचे टर्बो-पेट्रोल इंजिन 129 bhp पॉवर आणि 230 Nm इतका टॉर्क जनरेट करत तर 1.5 लीटरचे डिझेल इंजिन 115 bhp पॉवर आणि 300 Nm इतका टॉर्क तयार करत. 6 स्पीड मॅन्युअल सोबत ही कार एका लिटरमध्ये 20.1 किलोमीटरचे मायलेज देऊ शकते. सोबत कारमध्ये मोठे पॅरानोमिक सनरूफ, हारमान कार्डनची ऑडियो सिस्टिम, तुमच्याकडून मिळणारी कमांड ऐकण्यासाठी आणि अमलात आणण्यासाठी अड्रेनॉक्स, क्लायमेट कंट्रोल, प्रोजेक्टर हेडलँप्स, ट्विन एचडी इन्फोटेन्मेंट क्लस्टर- डिजिटल क्लस्टर, इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक, रिअर वायपर आणि रेन सेन्सिंग वायपर, ब्लाइंड स्पॉट मॉनिटर, हिल डिसेंट असिस्टसारखे फिचर्स मिळाले आहेत. या कारच्या रंगातून सायट्रीन येलो, डिप फॉरेस्ट, ड्युन बीज, गैलेक्सी ग्रे, एव्हरेस्ट व्हाइट, नेब्यूला ब्लू, स्थेल्थ ब्लॅक, टैंगो रेड यासोबत ड्युअल टोनचा पर्याय मिळतो. किलेस एंट्री आणि इलेक्ट्रॉनिक बूट ओपनिंग असणाऱ्या XUV 3XO च्या सीट्स वेंटिलेट आहेत. या कारचे 8 वेगवेगळ्या रंगातून एकूण 9 वेरिएंट्स बाजारात उपलब्ध झाले आहेत.

Photo of author

Ajinkya Sidwadkar

२०१० पासून ब्लॉग लिखाण करणारा अजिंक्य सध्या एक मराठी युट्युबर असून त्याला ऑटो मोबाइल क्षेत्रातील माहिती लिहिण्याची आवड आहे.

Leave a Comment