आली रे आली मारुतीची ‘ईव्ही’ आली, सुझुकी इलेक्ट्रिक कारची लाँचच्या अगोदर ‘सिक्रेट’ माहिती बाहेर

Maruti Suzuki Electric Car Launch: इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात मारुती सुझुकीच्या पहिल्या ब्रॅंड न्यू इलेक्ट्रिक कार Maruti Suzuki Project YY8 नाव रजिस्टर झाले आहे. आजपर्यंतच्या मारुती सुझुकीच्या इतिहासात इलेक्ट्रिक क्रांतीसाठी ही वाहन कंपनीने सज्ज झाली आहे. नवीन EV कार सोबत मारुती नवीन व्यवसायांसाठी सेवासुद्धा सुरू करत आहे; ज्याच नाव कार पूल सेवा आहे. तुम्हाला जर मारुती सुझुकीच्या नव्या इलेक्ट्रिक कार आणि मारुती सुझुकी पूलकर बद्दल जाणून घ्यायचं असेल तर खालील लेख संपूर्ण वाचा. Maruti Poolkar, Charge Hub, Smart Charge information

सुझुकीने 2031 पर्यंत 5 लाख EV ची विक्री आणि ह्या दहा वर्षात मारुती सुझुकीने सहा नवीन इलेक्ट्रिक कार सादर करण्याचे ध्येय ठेवले असून ह्या वर्षात मारुती सुझुकीच्या विविध प्रोजेक्टच्या हालचाली दिसून येत आहेत. ज्यामध्ये मारुती सुझुकी चार्जिंग स्टेशन, मारुती सुझुकी पूलकर आणि मारुतीच्या इलेक्ट्रिक वाहनाच्या आगमनाचा समावेश आहे.

वाचा: भारतात मारुती एर्टिगा हायब्रीड कधी येणार? हायवे कारला मिळतेय ईव्हीपेक्षा परवडेल असे मायलेज

मारुती सुझुकीचा प्रोजेक्ट YY8

बघता-बघता टाटा, ह्युंदाई , टेस्ला सारख्या बड्या बड्या इलेक्ट्रिक वाहनाच्या यादीत मारुती सुझुकी स्वतःच नाव कोरलं आहे. लवकरच YY8 नावाच्या मध्यम आकाराच्या इलेक्ट्रिक एसयूव्हीच्या सुझुकीमध्ये समावेश होत आहे. ग्राहक्यांच्या गरजा पुरवणारं आणि उत्कृष्ट सुविधा देणारं मारुती इलेक्ट्रिक कारच्या सेगमेंट मधलं हे आघाडीचे मॉडेल असू शकेल. फॉर-व्हील ड्राइव आणि टू-व्हील ड्राइव असणारी ही इलेक्ट्रिक कार 2024-25 दरम्यान लोणचं होऊ शकेल. मारुती सुझुकीचे YY8 टोयोटाच्या 40PL आर्किटेक्चरवर आधारित 27PL प्लॅटफॉर्मवरून घेतले आहे, ज्याची लांबी 4.2 मीटरपेक्षा जास्त आणि व्हीलबेस 2.7 मीटर असणार आहे.

वाचा: टोयाटोची नवीन शक्कल, तुमची आवडती टोयोटा कारची होणार ‘होम-डिलीवर’

मारुती सुझुकी YY8 बॅटरी आणि फीचर्स

मारुतीच्या पहिल्या इलेक्ट्रिक कार YY8 मध्ये 500km पेक्षा जास्त रेंज देणारा बॅटरी पैक पुरवण्यात येणार आहे. ऑटोमैटिक ट्रांसमिशन असणारी मारुतीची इलेक्ट्रिक कार 48 kWh बॅटरी पॅक आणि 59 kWh बॅटरी पॅक या दोन वेगवेगळ्या व्हर्जनमध्ये रिलीज होऊ शकते. ही इलेक्ट्रिक कार ५ सीटर आहे. YY8 मध्ये दिलेल्या 48 kWh बॅटरी पॅक व्हेरियंटची रेंज 400 किमी तर 59 kWh बॅटरी पॅक व्हेरियंटची रेंज 500 किमी असणार आहे.

हि इलेक्ट्रिक कार परवडणारी आणि सुलभतेची असावी म्हणून मारुती टोयोटाच्या मदतीने भारतात लिथियम-आयन बॅटरी पॅक तयार करत आहे. शिवाय यासाठी लागणारं उत्पादन स्थानिक पातळीवर तयार करत आहे.

वाचा: ‘स्वस्तात मस्त’ टाटाची Altroz Racer, टाटाची डायरेक्ट ह्युंदाईशी टक्कर

मारुती सुझुकी YY8 किंमत

मारुतीच्या YY8 संबंधित जास्त काही माहिती बाहेर पडली नसली तरी , YY8 बेस व्हेरिएंटची किंमत 13 लाख रुपये असण्याची शक्यता मांडली जातेय.

मारुती सुझुकी पूलकर म्हणजे काय?

मारुती सुझुकी नव्या इलेक्ट्रिक वाहनक्षेत्रासोबत ‘मारुती सुझुकी पूलकर’ या कारपूलसारख्या नवीन क्षेत्रात पाऊल टाकत आहे, मारुती सुझुकी पूलकर च्या मदतीने भारतातल्या शहरांमधील वाहतूक कोंडी आणि प्रदूषण पातळी कमी करण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान मिळू शकते. याआधी बऱ्याच खाजगी स्टार्टअप ने  अश्या प्रकारच्या सेवा सुरु केल्या आहेत. पण खुद्द मारुती कंपनीची मारुती सुझुकी पूलकर सेवा असल्याने हि सेवा उपभोगणार्यांमध्ये सुझुकीबद्दल अधिक विश्वास वाढणार आहे.

मारुती सुझुकीचे स्मार्ट चार्ज आणि चार्ज हब

इलेक्ट्रिक वाहनांचा होणार वापर लक्षात घेऊन, मारुती सुझुकी ईव्ही चार्जिंग स्टेशन सुद्धा बनवत आहेत, आणि या चार्जिंग सोल्यूशन्ससाठी या कंपनीने ‘मारुती सुझुकी स्मार्ट चार्ज’ आणि ‘मारुती सुझुकी चार्ज हब’ नावांचे रजिस्ट्रेशन सुद्धा केलेलं आहे. वापरकर्त्यांच्या गरज लक्षात घेऊन हे मारुती चार्जिंग स्टेशन संपूर्ण भारतातल्या सार्वजनिक ठिकाणी उपलब्ध होणार आहेत.

Photo of author

Aishwarya Potdar

मला ऑटोमोबाइल फिल्डमधली माहिती वाचायला आणि या ब्लॉगच्या मदतीने तुमच्यापर्यंत सरळ, सोप्या मराठी भाषेत मांडायला खूप आवडते. २०१९ पासून मी ह्या क्षेत्रात वेगवेगळ्या ब्लॉगवर काम करत आहे. तुम्हाला ह्या पेजवर नवीन कार, इलेक्ट्रिक कार-बाईक आणि स्कूटर याचसोबत ऑटोमोबाईलमधील येणारे नवे अपडेट यांची संपूर्ण माहिती मिळेल.

Leave a Comment