मारुती सुझुकीची नवीन SUV फ्रोंक्स किती सुरक्षित? क्रॅश चाचणी व्हिडिओ जारी केला, सत्य उघड

Maruti Suzuki Fronx Crash Test Rating – सोशल मीडियावर सध्या फ्रोंक्स या गाडीच्या क्रॅश टेस्टचा विडिओ खूप वायरल होत असून मारुतीची हि पहिली ५ स्टार सेफटी रेटिंग मिळवणारी गाडी आहे का असा प्रश्न सर्वाना पडला आहे. या लेखात जाणून घेऊया मारुतीने जारी केलेल्या क्रॅश चाचणी व्हिडिओ च्या मागचे सत्य.

फ्रोंक्स क्रॅश चाचणी व्हिडिओचे सत्य

देशातील अग्रगण्य ऑटो मेकर मारुती सुझुकीने दावा केला आहे कि भारतीय बाजारात गाडी लाँच करण्याआधी त्यांच्या प्रत्येक गाडीचे ५० वेळा क्रॅश टेस्ट केले जाते. ऑटोमोबाइल निर्माता मारुति सुजुकी ने नुकतेच त्यांच्या फ्रोंक्स एसयूवीच्या क्रॅश टेस्ट चे इंटर्नल फुटेज सोशल मीडिया वर शेअर केले असून कंपनी त्यांचे वाहन लाँच करण्याआधी कसे सावधानीपूर्वक गाडीची चाचणी घेते हे या विडिओच्या माध्यमातून समोर येते.

maruti fronx crash tested

फ्रोंक्स क्रॅश चाचणीचा समोर आलेला विडिओ हा ग्लोबल किंवा भारत एनकॅप ने जरी केला नसून खुद्द मारुती सुझुकी इंडिया ने अपलोड केला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून मारुतीला हे सांगायचे आहे कि त्यांचे प्रत्येक कारचे मॉडेल अनेक वेळा टेस्ट करून ते भारतीय रस्त्यांवर सुरक्षित आहे हे सुनिश्चित केले जाते.  या मूल्यमापनांमध्ये एअरबॅगची डिप्लॉयमेंट आणि परिणामकारकता, सीट्सला अपघातात होणारे नुकसान आणि आतील पार्टस वर होणारे परिणाम यासह विविध घटकांचे काळजीपूर्वक मूल्यांकन केले जाते.

maruti fronx crash tested new

कंपनी क्रॅश टेस्ट घेत असताना डमी पुतळ्यांना गाडीत बसून रिअल रोड ऍक्सीडेन्ट सारखी परिस्तिती निर्माण करून अपघातादरम्यान वाहन आपल्या प्रवाशांचे संरक्षण कसे करते याचे अचूक मूल्यांकन करते. क्रॅश टेस्ट घेत असताना गाडीच्या समोरील बाजूस आणि साईडने इम्पॅक्ट दिला जातो आणि सेन्सर्स च्या माध्यमातून डेटा गोळा केला जातो. कंपनी हे गाडीचे क्रंपल झोन किती फोर्स अब्जॉर्ब करते आणि सेफटी झोन प्रवाश्यांचे किती संरक्षण करते करिता या ५० टेस्ट केल्या जातात.

वाचा – मारुतीच्या या स्मार्ट हायब्रीड गाडीने घेतला पेट, रिअल-इस्टेट व्यावसायिकाचा जागीच मृत्यू

वाचा – Maruti Suzuki Price Hike: २०२४ पासून होणार मारुती सुझुकीच्या गाड्यांच्या किंमतीत वाढ…!

भारत NCAP मध्ये फ्रोंक्सला ५ स्टार रेटिंग मिळणार?

फ्रोंक्स क्रॅश चाचणी व्हिडिओ समोर आल्यानंतर कंपनी त्या गाडीच्या सेफटी बाबत शुअर असल्याचे समजते. कंपनीने त्यांची जिमनी, फ्रोंक्स, ग्रँड व्हिटारा, बलेनो आणि ब्रेझ्झा हि वाहन भारत NCAP मध्ये क्रॅश टेस्ट साठी पाठवणार असल्याचं कळत आहे. मारुती सुझुकी इंडिया ने इतर कोणत्याही गाडीचा इंटर्नल क्रॅश टेस्ट विडिओ न शेअर करता फ्रोंक्स या गाडीचा केला आहे त्यामुळे फ्रोंक्स क्रॅश टेस्ट मध्ये ५ स्टार रेटिंग मिळवणारी पहिली गाडी बनू शकते. सध्या तरी ऑफिशिअल यावर काहीही स्टेटमेंट किंवा माहिती समोर आलेली नाही त्यामुळे आगामी BNCAP मध्ये टेस्ट होणाऱ्या फ्रोंक्स वर सर्वांचे लक्ष असणार आहे. गाडीचा मराठी भाषेत रिव्हिव बघण्यासाठी आमचा यूट्यूब चॅनेल सब्सक्राईब करा.

Photo of author

Ajinkya Sidwadkar

२०१० पासून ब्लॉग लिखाण करणारा अजिंक्य सध्या एक मराठी युट्युबर असून त्याला ऑटो मोबाइल क्षेत्रातील माहिती लिहिण्याची आवड आहे.

Leave a Comment