येणाऱ्या सणासुदीच्या हंगामापर्यंत मारुती सुझुकी एरिना डीलर्स वर “ऑक्टोबर 2023” साठी जवळपास संपूर्ण रेंजवर ₹६८,००० पर्यंतचा डिस्काउंट आणि ऑफर्स देत आहेत. ग्राहक ब्रेझा, अल्टो के10, सेलेरियो, एस प्रेसो, वॅगन आर, डिझायर आणि स्विफ्ट यांसारख्या मॉडेल्सवर एक्सचेंज बोनस, कॅश डिस्काउंट आणि कॉर्पोरेट बेनिफिट्सचा लाभ घेऊ शकतात.
जाणून घेऊया कोणत्या मॉडेल्स आणि कार्स वर किती डिस्काउंट आणि कोणत्या ऑफर्स या सणासुदूंच्या काळासाठी उपलब्ध आहेत.
मारुती सुझुकी वॅगन आर – ५८ हजार रुपयांपर्यंत बचत
👉🏻 कार, टू-व्हिलर्सच्या माहिती आणि ऑफर्ससाठी जॉईन करा व्हाट्सऍप ग्रुप
मारुती सुझुकी वॅगन आर च्या 1.0-लिटर आणि 1.2-लिटर पेट्रोलच्या सर्व पेट्रोल व्हेरिएंट्सवर 46,000 रुपयांपर्यंत सूट देत आहे, तसेच मॅन्युअल ट्रान्समिशन आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन गिअरबॉक्स दोन्हीही साठी हि ऑफर उपलब्ध असेल. दरम्यान सर्वात मागणी असलेल्या सीएनजी व्हेरिएंट साठी ग्राहक 58,000 रुपयांपर्यंत डिस्काउंट चा लाभ घेऊ शकतात.
मारुती सुझुकी स्विफ्ट – ४७ हजार रुपयांपर्यंत बचत
स्विफ्टच्या पेट्रोल सह मॅन्युअल ट्रान्समिशन आणि ऑटोमॅटिक व्हेरिएंटसाठी 42 हजार आणि LXi पेट्रोल सह मॅन्युअल ट्रान्समिशन मॉडेल वर ४७ हजार रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. सीएनजी स्विफ्ट साठी कंपनीने ३३ हजार रुपयांचा डिस्काउंट जाहीर केला आहे.
मारुती सुझुकी सेलेरियो – ६० हजार रुपयांपर्यंत बचत
वॅगन आर प्रमाणेच १ लिटर पेट्रोल ने सुसज्ज असणाऱ्या सेलेरिओ मध्ये ५ स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन चा पर्याय उपलब्द आहे, हि गाडी पेट्रोल आणि पेट्रोल प्लस सीएनजी या इंधन प्रकारांसह मिळते. नुसते पेट्रोलमॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन गेअरबॉक्स असणाऱ्या सेलेरिओ वर ५१ हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट आणि बोनस मिळवू शकता तर सीएनजी मॉडेल साठी कंपनीने ६० हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट आणि बोनस देण्याची घोषणा केली आहे.
मारुती सुझुकी ब्रेझ्झा – ४५ हजार रुपयांपर्यंत बचत
मारुती सुझुकी ब्रेझ्झा या मॉडेल साठी ४५ हजार रुपत्यांपर्यंत डिस्काउंट देत आहे. जर १.५ लिटर नुसते पेट्रोल इंजिन मॅन्युअल किंवा ऑटोमॅटिक ट्रान्समिशन सह घेण्याचा विचार केला तर ४५ हजार रुपये इतका डिस्काउंट मिळू शकतो आणि सीएनजी मॉडेल घ्यायचा विचार केला आहे तर त्यासाठी २० हजार रुपयांपर्यंत अरेना शोरूम्स वर डिस्काउंट आणि बोनस ऑफर केला जात आहे.
मारुती सुझुकी डिझायर – १७ हजार रुपयांपर्यंत बचत
मारुतीची एकमेव कॉम्पॅक्ट सेडान असलेली डिझायर स्विफ्ट प्रमाणेच इंजिन आणि गेअरबॉक्सचे पर्यायात उपलब्ध आहे. ऑक्टोबर २०२३ महिन्यात डिझायर वर १७ हजार रुपया पर्यंत डिस्काउंट मिळत आहे. यामध्ये मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन सह पेट्रोल इंजिन मॉडेल साठी १७ हजार रुपये डिस्काउंट दिला जात आहे. सीएनजी मॉडेल साठी कंपनीने कोणतीही स्कीम किंवा एक्सचेंज बोनस दिलेला नाही.
मारुती सुझुकी एस प्रेसो – ६० हजार रुपयांपर्यंत बचत
एस प्रेसो या मायक्रो एसयूव्ही साठी कंपनीने सर्वात जास्त ६० हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट जाहीर केला आहे. यामध्ये सीएनजी मॉडेल साठी ६० हजार रुपये तर नुसत्या पेट्रोल सह मॅन्युअल किंवा ऑटोमॅटिक ट्रान्समिशन गेअरबॉक्स मॉडेल साठी ५१ हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट आणि बोनस जाहीर केला आहे. एस प्रेसोचा यूएसपी म्हणजे मिनी-एसयूव्ही लुक्स आणि हाय ग्राउंड क्लिअरन्स. केबिन.
मारुती सुझुकी अल्टो के १० – ६० हजार रुपयांपर्यंत बचत
एस प्रेसो प्रमाणेच अल्टो के १० मध्ये ६० हजार रुपयांपर्यंतचा बोनस आणि डिस्काउंट दिला जात आहे. ओकसारटोबीर मध्ये या गाडीच्या सीएनजी व्हेरिएंट वर ६० हजार रुपये तर नुसत्या पेट्रोल सह येणाऱ्या मॅन्युअल किंवा ऑटोमॅटिक ट्रान्समिशन गेअरबॉक्स च्या मॉडेल वर ५३ हजार रुपयां पर्यंतचा डिस्काउंट दिला जात आहे.
या व्यतिरिक्त मारुती एर्टिगा आणि इको या वाहनांवर कोणत्याही प्रकारचा बोनस ऑक्टोबर २०२३ साठी ऑफर करण्यात आलेला नाही.
Disclaimer – ऑफर्स, डिस्कॉउंट्स आणि बोनस वेगवेगळ्या शोरूम मध्ये वेगवेगळा असू शकतो. योग्य ऑफर्स जाणून घेण्यासाठी जवळच्या अरेना डिलरशिपला संपर्क साधा.