MG ची जगातील सर्वात लहान आणि स्वस्त SUV होणार लाँच, जाणून घ्या किंमत, रेंज आणि संपूर्ण माहिती

New MG Electric Car Baojun Yep: इलेक्ट्रिक वाहनक्षेत्रात, MG Motor ने चांगलाच जम बसवला आहे, ह्या सणासुदीच्या काळात एमजी लवकरच तिसऱ्या इलेक्ट्रिक वाहनाला घेऊन येत आहे; याआधी एमजी ची Comet EV आणि ZS EV बाजारपेठेत उपलब्ध होती पण आता एमजीची हि तिसरी इलेक्ट्रिक कार ‘बाओजुन येप’ असणार आहे. भारतात लॉन्च केल्यावर, एमजी मोटरची बाओजुन येप eSUV हि कार टाटा नेक्सॉन ईव्ही आणि महिंद्रा XUV400 ला टक्कर देईल. खालील माहितीमध्ये आपण Baojun Yep, बाओजुन येप पॉवरट्रेन आणि MG ची तिसरी इलेक्ट्रिक कार लॉन्च कधी होणार याबाबदल माहिती घेणार आहोत.

वाचा: टाटा मोटर्सची हवा, टाटाच्या पंच आणि नेक्सॉनची रेकॉर्ड-ब्रेक विक्री

एमजी मोटर्स-बाओजुन येप ईव्ही

वाहन बाजारपेठेत एमजी मोटरला प्रीमियम आणि सुसज्ज वाहनांच्या लाइनअपमुले ओळखले जाते. याआधी एमजी कॉमेट आणि झेडएस ईव्ही ह्या दोन एमजी इलेक्ट्रिक कारना प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे, याच कारणास्तव एमजी ब्रँड भारतासाठी Baojun Yep eSUV वाहनबाजारात आणण्याचा विचारात आहे. हि कार कंपनी आता वुलिंग एअर ईव्ही प्लॅटफॉर्मवर आधारित बाओजुन येप ईएसयूव्ही लवकरच लाँच करू शकते. एमजी मोटर्स नेहमीच इलेक्ट्रिक वाहने लाँच करून पर्यावरणाविषयी जागरूकता दाखवत आला आहे. MG आपले तिसरे इलेक्ट्रिक वाहन सणासुदीचा हंगामात भारतीय बाजारपेठेत सादर करण्याच्या तयारीत आहे.

वाचा: Ola ने लाँच केली स्वस्तात 200 किमी रेंज देणारी इलेक्ट्रिक स्कूटर

बाओजुन येप एसयूव्ही ‘या’ ग्रुपचे प्रॉडक्ट आहे

बऱ्याच जणांना माहिती नसेल कि बाओजुन येप ईएसयूव्ही हे SAIC ग्रुप  जागतिक पोर्टफोलिओचे प्रॉडक्ट आहे. हि इलेक्ट्रिक कार तिच्या डिझाईनसाठी  आणि परवडणाऱ्या किंमतीसाठी पॉप्युलर आहे. SAIC ग्रुप कंपनी बाओजुन, आयएम, मॅक्सस, एमजी, रायझिंग, रोवे (SGMW अंतर्गत) स्वतःच्या ब्रँडिंग अंतर्गत वाहनांचेप्रोडक्शन आणि सेलिंग करते.

वाचा: रॉयल एन्फिल्डचे वर्चस्व संपणार! बुलेट संपवायला आली हि तुफान गाडी

बाओजुन येपची संपूर्ण माहिती

बाओजुन येप इलेक्ट्रिक कार आहे, ज्यामध्ये आयर्नव फॉस्पेट बॅटरी वापरली आहे,हि इलेक्ट्रिक कार मागील एक्सलवरअसणाऱ्या इलेक्ट्रिक मोटरमार्फत,  ज्यातून 67 HP आणि 140 NM इतका कमाल टॉर्कजनरेट होतो. या कारचा टॉप स्पीड 100 किमी/तास आहे. हि कार एका चार्जवर सुमारे 300 किलोमीटर पर्यंत रेंज देते. बाओजुन येप कारचा व्हीलबेस 2.1 मीटर, लांबी 3.4 मीटर, उंची 1.7 मीटर इतकी आहे .

या एसयूव्हीमध्ये एलईडी हेडलाइट्स दिले गेले आहेत, फ्रंट फॅसिआ आणि  डिफेंडर-स्टायिल्ड बॉडी जिमनी आणि मिनी लँड रोव्हर सारखी आहे .इंटरनॅशनल मार्केटमध्ये हि इलेक्ट्रिक कार पाच-दरवाजे आणि तीन-दरवाजा मध्ये उपलब्ध आहे.

बाओजुन येप इलेक्ट्रिक एसयूव्ही किंमत

बाओजुन येप इ-एसयूव्हीला चार्ज करण्यासाठी AC चार्जिंग आणि DC फास्ट चार्जिंग वापरले जाऊ शकते. या कारच्या बेस मॉडेलची किंमत रु. 9.8 – 10.7 लाख तर टॉप-स्पेक मॉडेलची किंमत रु. 12.3 लाख पेक्षा कमी असू शकते.

अपकमिंग एमजी इलेक्ट्रिक एसयूव्ही

एमजी मोटर इंडिया 2024 च्या सणासुदीच्या हंगामात नवीन इलेक्ट्रिक वाहन लाँच होणार आहे. 2023 ऑटो एक्स्पोमधील शोकेसदरम्यान सादर केलेल्या  वाहनांमध्ये MG4 इलेक्ट्रिक हॅचबॅक जी 452 किमी पर्यंत रेंज देते, MG5 इलेक्ट्रिक इस्टेट कार जी 250 मैलांपर्यंतरेंज देते आणि Mifa 9 इलेक्ट्रिक MPV जी 440 किमी पर्यंत रेंज देते, ह्या तीन कारचा समावेश होता आणि आता ह्या इव्ही कार नंतर एमजी भारतात बाओजुन येप eSUV लाँच करण्याची दाट शक्यता आहे. ह्या कारची खासियत आकर्षक डिझाइन आणि किफायतशीर किमती असल्याने बाओजुन येप सर्वांचं लक्ष वेधून घेते.

Photo of author

Aishwarya Potdar

मला ऑटोमोबाइल फिल्डमधली माहिती वाचायला आणि या ब्लॉगच्या मदतीने तुमच्यापर्यंत सरळ, सोप्या मराठी भाषेत मांडायला खूप आवडते. २०१९ पासून मी ह्या क्षेत्रात वेगवेगळ्या ब्लॉगवर काम करत आहे. तुम्हाला ह्या पेजवर नवीन कार, इलेक्ट्रिक कार-बाईक आणि स्कूटर याचसोबत ऑटोमोबाईलमधील येणारे नवे अपडेट यांची संपूर्ण माहिती मिळेल.

Leave a Comment