‘साऊथच्या अभिनेत्याची महागडी कार’ नागा चैतन्यची नवीन पोर्श कार, जाणून घ्या सर्व माहिती

तेलुगू अभिनेता नागा चैतन्य नेहमीच त्याच्या चित्रपटांमुळे कधी त्याच्या खासगी आयुष्यामुळे तर कधी त्याच्या टॅटूमुळे चर्चेत असतो, मात्र आता हा दाक्षिणात्य अभिनेता त्याच्या नव्या कारमुळे चर्चेत आहे. नागा चैतन्यच्या कार कलेक्शनमध्ये सिल्व्हर पोर्श 911 GT3 RS चा समावेश झाला आहे, ज्याची किंमत 3 कोटींहून अधिक आहे. सध्या या पोर्श कारची भारतभर चर्चा होत आहे, चला तर मग जाणून घेऊया या दक्षिण भारतीय प्रसिद्ध अभिनेत्याच्या कारची संपूर्ण माहिती.

वाचा: हल्ल्यापासून वाचण्यासाठी सलमान खानने खरेदी केली, ही 4 करोडची बुलेटप्रुफ कार.

नागा चैत्यना लक्झरी कार कलेक्शन

साउथ इंडस्ट्रीमध्ये कस्टडी, लव-स्टोरी तर बॉलिवूड मध्ये आमिर खानसोबत लाल सिंग चढ्ढा सारखे चित्रपट करणारा ऑल राउंडर अभिनेता नागा चैत्यना हा कार-प्रेमी आहे हे त्याच्याकडे असणाऱ्या कारच्या कलेक्शनवरून दिसून येतच, 2 करोड किंमतीची रेंज रोव्हर, BMW, 4 करोडची फरारी आणि 2 करोडची निसान GTR सारख्या अनेक आलिशान कारचा मालक हा अभिनेता आहे. पण आत्ता नागा चैत्यनाच्या ह्या बेस्ट कार कलेक्शन मध्ये अश्या स्पोर्टकार पोर्श ची भर पडली आहे, जिने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे.  नुकतचे नागाने ह्या कारची राईडचा अनुभव घेताना एक व्हिडीओ शेअर केला आहे, चला जाणून घेवूया या कारचे फिचर्स-स्पेसिफिकेशन्स आणि संपूर्ण माहिती.

वाचा: टाटा नेक्सॉन ईव्हीवर मिळतोय 2.30 लाखापर्यंत भरघोस डिस्काउंट आणि एक्सचेंज बोनससुद्धा, ही घ्या माहिती

नागा चैतन्यची नवीन पोर्श 911 GT3 RS

नागाने 4.15 करोडची ही पोर्श 911 GT3 RS चंदेरी रंगातून विकत घेतली आहे. हे व्हेरिएंट पेट्रोलचे असून एका लीटरच्या पेट्रोलमध्ये 7.4 किमी इतके मायलेज मिळते. कारची फ्युएल टँक  64 लिटरची आहे. चंदेरी म्हणजेच silver रंगासोबत ही कार अजून 4 रंगात उपलब्ध आहे; ब्लॅक,यैलो, रेड आणि व्हाइट. या स्पोर्ट कारचा टॉप-स्पीड 296 किमी प्रति तास इतका आहे. ह्या कारमध्ये असणारे पेट्रोल-इंजिन 6 सिलेंडरसोबत 3996cc चे आहे. कारमध्ये ऑटोमॅटिक, 7 गेअर आणि स्पोर्ट मोडचा पर्याय मिळतो.

ह्या कारमध्ये 2 दरवाजे दिले असून एका रांगेमध्ये दोन प्रवासी आरामात या कारमधून प्रवास करू शकतात. अजूनपर्यंत या कारची NCAP test करण्यात आली नसली तरी सेफ्टीसाठी या कारमध्ये 7 एयरबॅग्स, लॉक- सिक्युरिटी, ABS-EBD सारखे अनेक महत्त्वपूर्ण एडवांस्ड फिचर्स या कारमध्ये देण्यात आले आहेत. कारमध्ये असणाऱ्या बॅटरीची 3 वर्षाची किंवा 60000 किमी वॉरंटी आहे. मनोरंजनासाठी कारमध्ये 10.9 इंचाचा टचस्क्रीन डिस्प्ले जत  स्मार्ट कनेक्टिविटीचा पर्याय मिळतो, 6 स्पीकर्स, वॉइस कमांड सारखे फिचर्स मिळतात.

Photo of author

Aishwarya Potdar

मला ऑटोमोबाइल फिल्डमधली माहिती वाचायला आणि या ब्लॉगच्या मदतीने तुमच्यापर्यंत सरळ, सोप्या मराठी भाषेत मांडायला खूप आवडते. २०१९ पासून मी ह्या क्षेत्रात वेगवेगळ्या ब्लॉगवर काम करत आहे. तुम्हाला ह्या पेजवर नवीन कार, इलेक्ट्रिक कार-बाईक आणि स्कूटर याचसोबत ऑटोमोबाईलमधील येणारे नवे अपडेट यांची संपूर्ण माहिती मिळेल.

Leave a Comment