मारुती सुझुकीच्या टॉप सेलिंग आणि टॉप फिचर्स मारुती डिझायर- New Dzire या कारला – Global NCAP (ग्लोबल एनकॅप) कडून फाईव्ह स्टार रेटिंग मिळालेले आहेत, यानंतर मारुती डिझायर ही मारुती कंपनीची पहिली 5 स्टार सेफ्टी रेटिंग असणारी कार म्हणून चर्चेत आलेली आहे. याआधी मारुती सुझुकीच्या इतर वाहनांना क्रॅश टेस्टमध्ये 4 स्टार पर्यंत रेटिंग मिळालेले आहेत पण आता डिझायर कार ही मारुती सुझुकीची पहिली फाईव्ह ठरली आहे. चला मारुतीच्या या फाइव स्टार सेफ्टी असणाऱ्या डिझायरचे रेटिंग सविस्तर जाणूया.
Five Star Rated Maruti Desire – 5 स्टार रेटेड न्यू मारुती डिझायर
मारुतीची अपकमिंग डिझायरची क्रॅश टेस्ट ग्लोबल एनकॅपद्वारे झाली होती, ज्यामध्ये या कारला 5 स्टार रेटिंग सुद्धा मिळालेले आहेत. Global NCAP द्वारे मारुतीच्या पहिल्या फाईव्ह स्टार सेफ्टी रेटिंग मिळालेल्या कारला अडल्ट सेफ्टी मध्ये 34 गुणांपैकी 31. 24 गुण मिळालेले आहेत, चाइल्ड सेफ्टी मध्ये 49 गुणांपैकी 39.20 गुण मिळालेले आहेत, थोडक्यात क्रॅस्टेस्ट एजन्सी कडून अडल्ट साठी फाईव्ह स्टार आणि चाइल्ड म्हणजेच बालकांच्या सुरक्षितेसाठी फोर स्टार रेटिंग मिळालेले आहेत.
‘या’ कारणामुळे मिळाले डिझायरला 5 स्टार सेफ्टी रेटिंग
मारुती डिझायरच्या सुरक्षा वैशिष्ट्यांमध्ये ESC -इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी सिस्टीम आणि पादचारी सुरक्षा वैशिष्ट्ये यांचा समावेश आहे. या कारमध्ये सर्व सीटसाठी थ्री पॉईंट सीट बेल्ट हे सेफ्टी फीचर सुद्धा दिले गेलेले आहेत, ज्यामुळे अपघाताच्या वेळी संपूर्ण डोक्याचे रक्षण होते, सोबत या नवीन पिढीच्या डिझायर मॉडेल मध्ये सर्व प्रवाशांच्या सेफ्टी साठी सहा एअर बॅग यांचा समावेश सुद्धा केलेला आहे. तुम्हाला या कारच्या लॉन्चिंग ची तारीख जाणून घ्यायची असेल तर पुढील माहिती वाचा.
‘या’ तारखेला लॉन्च होणार मारुती डिझायरचे 5वे जनरेशन
मारुती सुझुकीचे हे पहिले पहिले 5 स्टार रेटिंग मिळालेले तगडे वाहन थोडक्यात मारुती डिझायरचे 5वे जनरेशन मॉडेल 11 नोव्हेंबर रोजी भारतीय बाजारपेठेमध्ये लॉन्च होणार आहे. मारुती डिझायर मध्ये 1.2 लिटर आणि 3 लिटर सिलेंडरचा पेट्रोल इंजिन सोबत CNG पर्यायामध्ये उपलब्ध होणार आहे.