आता 8 लाखात टाटा नेक्सॉन तुमच्या घरात, अश्या प्रकारे करा पटकनं बुकिंग

टाटा नेक्सॉन घ्यायचा विचार करताय? मग तुमच्यासाठी हीच ती कार खरेदीची वेळ आहे,कारण नेक्सॉनचे एंट्री लेव्हलचे व्हेरिएंट आता चक्क 8 लाखात मिळतेय. हो अगदी योग्य माहिती वाचत आहात. जिकडे महिंद्रा नवीन Mahindra 3XO ला लाँच करण्याच्या तयारीत होतं, तिकडे टाटा नेक्सॉनच्या इतर वेरिएंट्समध्ये आता एका नव्या व्हेरिएंटची entry झाली आहे. तुम्ही जर best SUV in india शोधत असाल तर ही tata top selling कार जी अगदी 10 लाखाच्या आतमधल्या किंमतीत मिळत आहे, तिचा विचार करू शकता. चला जाणून घेवूया या नव्या nexon व्हेरिएंट आणि tata nexon milage ची संपूर्ण माहिती.

टाटा नेक्सॉनचे नवे बेस व्हेरिएंट

टाटाच्या  नेक्सॉनला कॉम्पैक्ट एसयुव्हीला बेस स्पेक स्मार्ट (O) हे नवीन व्हेरिएंट मिळाले असून, ह्याची टाकी पेट्रोलची असणार आहे. ह्याला एंट्री लेव्हलचे व्हेरिएंट अस ओळखलं जात आहे. हे व्हेरिएंट पेट्रोल आणि डिझेल या प्रकारातून आहे. यातील नेक्सॉन पेट्रोल व्हेरिएंटची किंमत 7.99 लाख रुपये इतकी आहे तर नेक्सॉन डिझेल व्हेरिएंटची किंमत 9.99 लाख रुपये इतकी आहे. थोडक्यात डिझेल नेक्सॉनच्या किंमतीमध्ये कमालीची अशी 1.10 लाख रुपयांची घट झाली आहे. यासोबत डिझेल वर धावणाऱ्या नेक्सॉन स्मार्ट प्लस ( किंमत- 9.99 लाख) आणि स्मार्ट-प्लस-एस (किंमत-10.59 लाख) हे वेरिएंटससुद्धा उपलब्ध झाले आहेत.

वाचा: भारतातील बेस्ट-सेलर ठरली टाटाची ही कार, मारुतीच्या कारला सुद्धा टाकले मागे, जाणून घ्या संपूर्ण माहिती

नेक्सॉन व्हेरिएंट किंमत 
डिझेल नेक्सॉन Smart+  9.99 लाख
डिझेल नेक्सॉन Smart+ S10.59 लाख
पेट्रोल नेक्सॉन Smart+8.89 लाख
पेट्रोल नेक्सॉन  Smart+ S9.39 लाख

 

वाचा: टाटाच्या या ५ गाड्यांच्या विक्रीने बाजारात खळबळ, सर्वात जास्त विकली जाणारी टाटाची ही कार, जाणून घ्या फिचर्स आणि किंमत

ग्लोबल NCAP द्वारे 5 स्टार रेटिंग मिळालेल्या नेक्सॉनच्या या नव्या बेस वेरिएंटमध्ये 1497 cc चे इंजिन असून ह्या कारमध्ये फ्रंट व्हील ड्राइव हा पर्याय मिळतो. नव्या डिझेल नेक्सॉनमध्ये ऑटो हेडलँप, इलेक्ट्रिक सनरूफ ज्याला वॉइस अक्टिव्हेशनची जोड आहे, रेन सेन्सिंग वायपर, शार्क फिन अँटेना, रिव्हर्स कॅमेरा, मल्टी-फँक्शनल स्टिअरिंग व्हील, स्पीकर याचशिवाय 7 इंचाची टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टम सारखे फिचर्स देण्यात आले आहेत.  सुरक्षेसाठी कारमध्ये चाइल्ड सेफ्टी लॉक, सेंट्रल लॉकिंग,ट्रॅक्शन कंट्रोल, हिल असिस्ट, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल आणि एयरबॅग्स सारख्या फिचर्सचा समावेश आहे.

वाचा: टाटा टियागो ईव्हीला मिळाला नवा अपडेट, या दोन फिचर्सचा समावेश शिवाय टाटा टियागो ईव्हीवर मिळतोय डिस्काउंट

टाटा नेक्सॉन मायलेज

ह्या कारचे पेट्रोल व्हेरिएंट एका लिटरमध्ये 17 किमी इतके मायलेज देते तर डिझेल व्हेरिएंट 23 किमी इतके मायलेज देते. तुम्हाला जर ह्या कारचे बुकिंग करायचे असेल तर त्वरित तुम्ही ह्या ऑफरचा लाभ घेण्यासाठी तुमच्या जवळच्या टाटा शोरूममध्ये भेट देऊ शकता. 

Photo of author

Aishwarya Potdar

मला ऑटोमोबाइल फिल्डमधली माहिती वाचायला आणि या ब्लॉगच्या मदतीने तुमच्यापर्यंत सरळ, सोप्या मराठी भाषेत मांडायला खूप आवडते. २०१९ पासून मी ह्या क्षेत्रात वेगवेगळ्या ब्लॉगवर काम करत आहे. तुम्हाला ह्या पेजवर नवीन कार, इलेक्ट्रिक कार-बाईक आणि स्कूटर याचसोबत ऑटोमोबाईलमधील येणारे नवे अपडेट यांची संपूर्ण माहिती मिळेल.

Leave a Comment