होंडा इलेक्ट्रिक ऍक्टिवा ‘या’ शहरांमध्ये डिलिव्हरीसाठी सज्ज – New Honda Activa Electric Deliveries

Published:

चेतक, एथर आणि ओला यांसारख्या इलेक्ट्रिक टू-व्हीलर मेकिंग कंपन्यानंतर आता आतुरता लागलेली आहे ती म्हणजे इलेक्ट्रिक ऍक्टिवाची. विद्युतीकरणाच पहिलं पाऊल म्हणून होंडा Electric Activa भारतामध्ये बनवलेली आहे . होंडाची पहिली इलेक्ट्रिक ऍक्टिवा स्कूटर आता भारतातल्या रस्त्यांवर धावण्यासाठी सज्ज झालेली आहे, तुम्ही भारतातल्या कोणत्याही शहरात-गावात असला तरीही इलेक्ट्रिक ऍक्टिवा तुमच्यापर्यंत कशी काय पोचू शकते थोडक्यात भारतातल्या अशा कोण-कोणत्या गावा शहरांमध्ये या बॅटरी स्लॅप होणाऱ्या इलेक्ट्रिकिक ऍक्टिवाला डिलिव्हर करण्यात येणार आहे ? सोबत या इलेक्ट्रिक स्कूटरमधल्या बॅटरी स्वॅपिंगसारख्या गेम चेंजिंग फीचरचा काय उपयोग होऊ शकतो याची सुद्धा माहिती आपण सदर लेखात जाणून घेणार आहोत.

Honda E-Activa : बॅटरी स्वॅपिंग स्टेशन

इतर फॅमिली इलेक्ट्रिक स्कूटरना टक्कर देणारी होंडाची इलेक्ट्रिक स्कूटर भारतातल्या हरएक शहरांमध्ये टप्प्या-टप्प्याने डिलिव्हरी साठी उपलब्ध होत आहे. लवकरच होंडा संपूर्ण भारतभर इलेक्ट्रिक ऍक्टिवा आणि QC1 इलेक्ट्रिक स्कूटर डिलिव्हर करणार आहे ज्या मधली QC1 इलेक्ट्रिक स्कूटर भारतातल्या कोणत्याही शहरांमध्ये आरामात उपलब्ध होईल तर इलेक्ट्रिक ऍक्टिवा ही जी डिलिव्हरी संपूर्ण भारतभर टप्प्याटप्प्याने केली जाईल यातील बहुचर्चित असणारी इलेक्ट्रिक ऍक्टिवा ही सुरुवातीच्या काळात दिल्ली मुंबई बेंगलोर यांसारख्या शहरांमध्ये डिलिव्हरी साठी उपलब्ध असणार आहे.

होंडा Electric Activa : बेंगलोर, मुंबई आणि दिल्ली

फेब्रुवारी 2024 पासून भारतामधल्या बेंगलोर शहरांमध्ये जवळजवळ 85 बॅटरी स्टार्टिंग स्टेशन्स आत्ताही कार्यरत आहेत, याच तुलनेत दिल्लीमध्ये फक्त 10 बॅटरी स्वॅपिंग स्टेशन दाखवले जात आहेत, जे बऱ्यापैकी दिल्लीच्या मध्यभागी आहेत. मुंबई मधल्या बॅटरी स्टार्टिंग स्टेशनची माहिती देता, होंडा लवकरच मुंबईमध्ये बॅटरी स्वॅपिंग इन्फ्रास्ट्रक्चर करण्याची तयारी दाखवत आहे, परिणामी मुंबईमध्ये होंडा इलेक्ट्रिक ऍक्टिवाची डिलिव्हरी मात्र बॅटरी पॅकिंगइन इन्फ्रास्ट्रक्चर नसल्यामुळे उशिरा म्हणजेच एप्रिल 2025 पासून सुरू होऊ शकते.

बॅटरी स्वॅपिंगचा ग्राहकांना फायदा होऊ शकतो का?

हो, ग्राहक यापुढे बॅटरीच्या एक्स्ट्रा चार्ज भरण्यासाठी ग्राह्य धरले जाणार नाहीत. बॅटरी वापरणाऱ्यांना फक्त इतर इंधनांच्या सारखेच म्हणजेच पेट्रोल सीएनजी डिझेलच्या वापराप्रमाणेच कमी तुलनेत शुल्क आकारले जातील एका दृष्टिकोनातून बॅटरी स्वॅपिंग ही कन्सेप्ट सुरक्षित सुद्धा आहे याचं कारण म्हणजे इलेक्ट्रिक स्कूटर वापर करताना या स्कूटर ची बॅटरी घरात चार्ज करण्याची रिस्क सुद्धा टाळता येईल आणि ज्या इलेक्ट्रिक स्कूटर वापर करताना बॅटरी चार्जिंग हा ऑप्शन अवलंबता येत नसेल त्यांना बॅटरी स्वॅपिंग म्हणजेच बॅटरीची अदलाबदल करण्याचा सोयीस्कर असा पर्याय सुद्धा निवडता येईल

बॅटरी स्वॅपिंगचा काय फरक पडू शकतो ?

तुम्ही जर इंधन असणारे वाहन म्हणजे पेट्रोल सीएनजी किंवा डिझेल वाहन चालवत असाल तर तुम्हाला माहितीच असेल की गाडीमधले इंधन संपल्यानंतर तुम्हाला ती गाडी इंधन स्टेशनपर्यंत जाऊन लाईनमध्ये थांबून ठराविक पेट्रोल, डिझेल किंवा सीएनजी सारखे इंधन भरावा लागतं, परिणामी तुमचा ‘वेळ, कष्ट आणि एनर्जी’ वाया जाते. पण बॅटरी स्वॅपिंग या कन्सेप्टमुळे तुमच्या गाडीमध्ये असणारी कमी बॅटरी किंवा संपलेली इलेक्ट्रिक बॅटरी हे तुम्ही केवळ सेकंदात एक्सचेंज करून फुल चार्ज करू शकता, यामध्ये तुम्हाला फक्त बॅटरीचे अदलाबदल करायचे आहे अगदी कमी वेळेमध्ये तुम्ही संपूर्णपणे चार्ज असणारी बॅटरी ची अदलाबदल करून तुम्ही तुमचा पुढचा प्रवास सोयीस्कर आणि आरामदायी करू शकता.

Photo of author

Aishwarya Potdar

मला ऑटोमोबाइल फिल्डमधली माहिती वाचायला आणि या ब्लॉगच्या मदतीने तुमच्यापर्यंत सरळ, सोप्या मराठी भाषेत मांडायला खूप आवडते. २०१९ पासून मी ह्या क्षेत्रात वेगवेगळ्या ब्लॉगवर काम करत आहे. तुम्हाला ह्या पेजवर नवीन कार, इलेक्ट्रिक कार-बाईक आणि स्कूटर याचसोबत ऑटोमोबाईलमधील येणारे नवे अपडेट यांची संपूर्ण माहिती मिळेल.

Leave a Comment