नव्या वर्षातच सलग तीन दिवस पेट्रोल डिझेल बंद, आजच भरुन घ्या गाडीत पेट्रोल-डिझेल, वाचा कारण

येत्या नव्या वर्षात बरेच जण बाहेर फिरायला जायच प्लानिंग करताय? मग सगळ्यात आधी बाकी कोणतीही तयारी, पैकिंग करण्याआधी आजच्या रात्रीतच गाडी पेट्रोल-डिझेलने फुल्ल करा, कारण ह्या २०२४ ची सुरवात होतानाच नेमकं, संपूर्ण राज्यभरातले पेट्रोल-डिझेल पुरवठा करणाऱ्या ट्रॅंकर चालकाने संप पुकारला असून, हा संप जवळजवळ सलग तीन दिवस सुरु राहणार आहे.

‘नव्या वर्षाच्या सुरवातीलाच BPCL,HPCL आणि इंडियन ऑइल यासारखे मोठे पेट्रोल-डिझेल स्टेशन सलग तीन दिवस बंद राहणार असून प्रवास करणाऱ्यांची गैरसोय न व्हावी, म्हणून आजच्याच रात्रीच्या आधी पेट्रोल-डिझेल गाडीत फुल्ल भरून घेण्याचे आवाहन केले आहे.’

वाचा: नवीन बजाज चेतक २०२४ लाँच होणार, मिळणार १२६ किमी रेंज, जास्त टॉपस्पीड आणि फास्ट चार्जिंग

‘या’ कायद्यामुळे पेट्रोल पंप होणार तीन दिवस बंद..!

राज्य सरकार ने अपघातासंबंधित नवा कायदा केला आहे, ज्यात ‘१० वर्षाची शिक्षा आणि सात लाख ‘ इतका दंड आहे, भारतात जास्तीत जास्त अपघात हे मोठ्या टँकर अथवा ट्रकमुळे घडतात. आणि बऱ्यापैकी ट्रक-टॅंकर हे इंधनाची दळणवळण करणारे असतात. म्हणूनच या कायदाबाबतीत इंधनाचा पुरवठा करणाऱ्या ट्रक टॅंकर चालकांच अस म्हणणं आहे की ,” आम्ही अपघात जाणीवपूर्वक किंवा मुद्दाम करत नाही, तर अपघात होतात, अश्या प्रकारचे कायदे ट्रक चालकासाठी अन्यायकारक आहेत. त्यामुळे आम्हाला हा कायदा मान्य नसल्याकारणे उद्यापासून सलग तीन दिवस आम्ही इंधन पुरवठा संप पुकारत आहोत.”

वाचा: या स्मार्टफोन कंपनीने बनवली टेस्लापेक्षा ऍडव्हान्स कार, 800 किमी रेंज आणि 265 चे टॉपस्पीड

ईव्हीच्या तुलनेत इंधन गाड्यांना देतात ‘यामुळे’ पसंदी

आजही जितकी लोक इलेक्ट्रिक वाहनाना प्राधान्य देत आहेत तितकीच लोक पेट्रोल डिझेल च्या गाड्यांना आवडीने वापरतात, कारण बऱ्याच जणांच्या मते ईव्ही पेक्षा  इंधन गाडी सोयीची, ठराविक वेळेसाठी चार्ज करण्याऐवजी पटकन पेट्रोल पंपावर जाऊन इंधन भरुन पुढचा प्रवास करायला सोप्पा..! पण तरीही राज्य सरकार वाढणारे प्रदूषण, ग्लोबल वॉर्मिंग मुळे इंधनाच्या गाड्यांऐवजी इलेक्ट्रीक कार,स्कूटर अथवा बाईक विकत घेण्यास प्रोत्साहन देत आहे. इंधनाच्या गाड्याच्या तुलनेत लोकानी ईव्ही वापरावी म्हणून गाडी खरेदी करताना सबसीडी देत आहे, जागोजागी चार्जिंग स्टेशन बनवत आहेत.

वाचा: ह्युंदाईच्या फॅमिलीमध्ये दीपिका पदुकोणची एंट्री, Thar पेक्षा अधिक पॉपुलर नव्या ह्युंदाई क्रेटाचे दीपिकाहस्ते अनावरण

Photo of author

Aishwarya Potdar

मला ऑटोमोबाइल फिल्डमधली माहिती वाचायला आणि या ब्लॉगच्या मदतीने तुमच्यापर्यंत सरळ, सोप्या मराठी भाषेत मांडायला खूप आवडते. २०१९ पासून मी ह्या क्षेत्रात वेगवेगळ्या ब्लॉगवर काम करत आहे. तुम्हाला ह्या पेजवर नवीन कार, इलेक्ट्रिक कार-बाईक आणि स्कूटर याचसोबत ऑटोमोबाईलमधील येणारे नवे अपडेट यांची संपूर्ण माहिती मिळेल.

Leave a Comment