आणि अचानक बाहेर पडले रेनॉल्टचे ‘सिक्रेट मॉडेल’ कमी किंमत शिवाय 400Km पेक्षा जास्त रेंज देणारी ईव्ही

ईव्ही च्या दुनियेत कुठलीही खास गोष्ठ जास्त दिवस लपवून राहत नाहीये हे मात्र रेनॉल्टला आज कळून चुकलंय, कारण रेनॉल्टची नवीन इलेक्ट्रिक कार – रेनॉल्ट 5 EV लाँचिंग आधीच सर्वाच्या समोर आली आहे. ह्या कारला लाँग रेंज, कमालीचा रंग , असंख्य आधुनिक फिचर्स आणि किफायतीशीर किंमत मिळाली असून रेनॉल्टची ही नवीन ईव्ही आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे , चला बघूया ह्या Upcoming Electric Car ची समूर्ण माहिती.

रेनॉल्टची नवीन ईव्हीचे Renault 5 EV असे नाव आहे, आणि ही ईव्ही ह्या वर्षी पार पडणाऱ्या जिनेवा मोटर शो मध्ये ग्लोबल डेब्यू करणार होती, पण डेब्यू होण्याआधीच या गाडीची माहिती आणि काही फोटो बाहेर पडल्याने रेनॉल्टसाठी काय ठरवलं आणि काय घडलं अशी परिस्तिथी झाली आहे. ही कार CMF-BEV प्लॅटफॉर्मवर बनवली असून हा प्लेटफॉर्म खास इलेक्ट्रिक वाहनासाठी आहे.

वाचा : सुझुकी साजरा करतेय ‘जश्न-ए-10 लाख’, सुझुकी टू-व्हीलरचे रेकॉर्ड ब्रेकिंग प्रोडक्शन

Renault 5 EV फीचर्स

रेनॉल्टच्या Renault 5 EV रिलीज झालेल्या प्रतिमेनुसार कारच्या आतल्या बाजूस, टेक-सॅव्ही इंटीरियर फिचर्समध्ये दोन डिस्प्ले डॅशबोर्डवर दिले गेले आहेत. स्पोर्टी 3-स्पोक स्टीयरिंग व्हील (स्टार्ट/स्टॉप बटण), चार्जिंग पोर्ट, टॉगल स्टाइल क्लायमेट कंट्रोल, गियर सिलेक्टर बटण, ग्लॉसी स्टीयरिंग माउंटेड कंट्रोल्स, इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक, ग्लॉसी ब्लॅक अलॉय व्हील्स यांचा समावेश आहे.

वाचा : ‘नाद करा पण टाटाचा कुठं’ ,नेक्सॉनने क्रॅश टेस्टिंगमध्ये सर्वांचा टाकलं मागे

रेनॉल्ट 5 ईव्ही डिझाइन

डिझाइन बाबतीत माहिती देता, चमकदार पिवळा रंगातली या ईव्हीला युरोपियन डिझाइन दिली गेली आहे. हेडलाइट्स क्वाड LED एलिमेंट्स , कॅमेरा शटर, LED DRL , फ्रंट फॅशिया मध्ये ‘रेनॉल्ट’ लोगो उठून दिसतो. चार्जिंग सिच्युएश बाबतीत माहिती देण्यासाठी ब्लैक ग्राफिक पॅनल बोनेटवर दिलेले आहे.

वाचा : टोयाटोची नवीन शक्कल, तुमची आवडती टोयोटा कारची होणार ‘होम-डिलीवर’

रेनॉल्ट 5 ईव्ही बॅटरी

या इलेक्ट्रिक कारच्या बॅटरी आणि रेंजबाबतीत माहिती देता, गाडीमध्ये दोन बॅटरी पॅक अनुक्रमे, 52kWh बॅटरी पॅक आणि 40 KWh बॅटरी पॅक दिली आहे. 40 KWh बॅटरी पॅक मधून 300 किमीची रेंज मिळते तर 52kWh बॅटरी पॅक मधून 400 किलोमीटरपेक्षा जास्त रेंज मिळते. या कारमधील इलेक्ट्रिक मोटर 135hp जनरेट करू शकते. या इलेक्ट्रिक Renault 5 EV हॅचबॅकमध्ये मल्टी-लिंक रीअर एक्सल आहे.

रेनॉल्ट अपकमिंग इलेक्ट्रिक कार किंमत

टाटा टियागो आणि सेट्रोएन eC3 स्पर्धा करणाऱ्या रेनॉल्ट 5 ईव्ही हॅचबॅकचे लाँचिंग 26 फेब्रुवारी 2024 रोजी जिनिव्हा मोटर शोमध्ये होणार आहे. या मॉडेलची किंमत 10 लाखापासून सुरू होऊ शकते.

Photo of author

Aishwarya Potdar

मला ऑटोमोबाइल फिल्डमधली माहिती वाचायला आणि या ब्लॉगच्या मदतीने तुमच्यापर्यंत सरळ, सोप्या मराठी भाषेत मांडायला खूप आवडते. २०१९ पासून मी ह्या क्षेत्रात वेगवेगळ्या ब्लॉगवर काम करत आहे. तुम्हाला ह्या पेजवर नवीन कार, इलेक्ट्रिक कार-बाईक आणि स्कूटर याचसोबत ऑटोमोबाईलमधील येणारे नवे अपडेट यांची संपूर्ण माहिती मिळेल.

Leave a Comment