इलेक्ट्रिक स्कूटर कशी मेंटेन करायची? स्कूटर मेंटेन करण्यासाठी सोप्या 5 टिप्स

Simple tips and hacks for electric scooter maintenance

तुम्ही इलेक्ट्रिक स्कूटर वापरताय का ? पण स्कूटर कशी मेंटेन करायची माहिती नाहीये का? सोशल मीडियावर माहिती शोधली की बॅटरी मेंटेन किंवा मोटर मेंटेनचीच माहिती मिळते का? मग तुम्ही अगदी योग्य पानावर आहात का या लेखात तुम्हाला तुमची कोणत्याही कंपनीची इलेक्ट्रिक स्कूटर कशी मेंटेन करायची? स्कूटरचे कोणते महत्त्वाचे पार्ट जपून वापरायचे? किंवा इलेक्ट्रिक स्कूटर दीर्घकाळ कशी टिकवून ठेवायची याची संपूर्ण माहिती मिळेल.

आजकाल पेट्रोल स्कूटरच्या तुलनेत इलेक्ट्रिक स्कूटरचे वापरकर्ते अधिक प्रमाणात आढळून येतात. तरीही काही जण या इलेक्ट्रिक स्कूटरची जास्त माहिती माहित नसल्याने स्कूटर विकत घेणं टाळतात, काहीना इलेक्ट्रिक स्कूटर मेंटेन करणं म्हणजे एखादा हत्ती पाळण्यासारखं वाटतं, म्हणूनच खालील माहितीमध्ये इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करताना कोणत्या गरजा कोणते मुद्दे लक्षात घेवून खरेदी केली पाहिजे याची माहिती दिली आहे.

इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये सर्वात महत्त्वाचे पार्ट्स कोणते 

 1. बॅटरी
 2. टायर्स
 3. ब्रेक आणि सस्पेन्शन
 4. लाइट्स

इलेक्ट्रिक स्कूटरची बॅटरी कशी मेंटेन करायची? 

कोणत्याही इलेक्ट्रिक स्कूटरच्या बॅटरीला आणि मोटरला ठराविक दिवसांची वॉरंटी मिळते, पण तुम्ही बॅटरी काही सोप्या टिप्सने लाँग-लस्टिंगसाठी वापरू शकता. इलेक्ट्रिक स्कूटरची बॅटरी कधीही ओली होता कामा नये. तुम्ही जर एखादी रायिड करून आला असाल तर अश्या घाईतच इलेक्ट्रिक बॅटरी कधीही चार्ज करू नये. ही इलेक्ट्रिक बॅटरी दीर्घकाळ टिकवण्यासाठी योग्य त्याच चार्जरने बॅटरी चार्ज करा. ओव्हरचार्ज टाळा. गरम ठिकाणी स्कूटर चार्ज करणं टाळा. खेळत्या हवेत नेहमी इलेक्ट्रिक स्कूटर चार्ज करा.

टायर्स कसे मेंटेन करायचे?

टायरमध्ये ठराविक हवेच प्रेशर मेंटेन करा. लांबचा पल्ला गाठताना मध्ये स्कूटरलासुद्धा विश्रांती द्या. दर महिन्याला बाहेर पडताना टायर प्रेशर तपासणी करा. जर स्कूटरचे सपाट टायर किंवा खराब झालेले चाके झाले असतील तर वेळीच मेंटेन करा. चांगल्या कंपनीचे- ब्रँडचे टायर वापरा.

ब्रेक आणि सस्पेन्शनची कशी काळजी घ्यायची?

प्रवास सुरू करण्याआधी ब्रेक आणि सस्पेन्शन चेक करुन जाणे. ब्रेक ऑईलिंग करणे. गाडीवर दिलेल्या प्रमाणापेक्षा अधिक ओझ वाहून नेणं टाळा. स्कूटरमधून अचानक तेल-गळती, खडबडीचा आवाज येणं अथवा स्कूटर वारंवार बंद पडायला लागली तर लवकरात लवकर सर्व्हिसिंग सेंटरमध्ये घेवून दुरुस्त करा.

इलेक्ट्रिक स्कूटरच्या लाइट्सची काळजी कशी घ्यावी? 

दररोज/प्रत्येक राइडपूर्वी लाइट्स चेक करूनच बाहेर पडायचे. (इंडिकेटर, टेलाईटस) स्वच्छ कापडणे पुसून घ्यायचे.

इलेक्ट्रिक स्कूटर मेंटेन करण्याचे फायदे

 1. बॅटरीचे आयुष्य वाढते 
 2. अचानक ब्रेकडाउन नाही
 3. चांगला परफॉर्मन्स
 4. कोणतीही घाण / धूळ जमा होत नाही
 5. टायर अधिक काळ टिकतात.
 6. रायिड सुरक्षित बनवते.
 7. पेट्रोल स्कूटरच्या तुलनेत इलेक्ट्रिक स्कूटरचा खर्च कमी असतो.
 8. राइडिंगचा अनुभव अधिक आनंददायी मिळतो.

तुम्हाला पडणारे प्रश्न 

इलेक्ट्रिक स्कूटर्सची देखभाल करणे सोपे आहे का?

हो.

इलेक्ट्रिक स्कूटर किती वेळा चार्ज करावी?

कोणतीही इलेक्ट्रिक स्कूटर 20% पेक्षा कमी होता कामा नये. 20% पेक्षा कमी चार्ज होण्याआधी स्कूटर कधीही चार्ज करू शकतो.

इलेक्ट्रिक स्कूटर रात्रभर चार्जिंगवर सोडणे योग्य आहे का?

अजिबात नाही. कोणत्याही इलेक्ट्रिक स्कूटरला चार्ज करण्यासाठी ठराविक कालावधी लागतो. तो कालावधी पूर्ण झाल्यावर त्वरित चार्जर स्कुटरपासून हटवणे गरजेचे आहे.

तुमच्या इलेक्ट्रिक स्कूटरची देखभाल कशी करावी?

वरील टिप्स आणि ट्रिक्सचा मदतीने तुम्ही तुमच्या इलेक्ट्रिक स्कूटरची देखभाल घेवू शकता.

मी माझी इलेक्ट्रिक स्कूटर चांगल्या स्थितीत कशी ठेवू?

खेळत्या हवेत नेहमी इलेक्ट्रिक स्कूटर चार्ज करा. चांगल्या कंपनीचे- ब्रँडचे टायर वापरा. नेहमी सर्व्हिसिंग करा.

स्कूटरच्या बॅटरीचे आरोग्य कसे राखायचे?

ओव्हरचार्ज टाळा. गरम ठिकाणी स्कूटर चार्ज करणं टाळा.

Photo of author

Ajinkya Sidwadkar

२०१० पासून ब्लॉग लिखाण करणारा अजिंक्य सध्या एक मराठी युट्युबर असून त्याला ऑटो मोबाइल क्षेत्रातील माहिती लिहिण्याची आवड आहे.

Leave a Comment