Kylaq हे नाव वाचून मला एक गंमत आठवली. सातारा – पंढरपूर या भागात काय लका हा शब्द खूप प्रचलित आहे. तिकडे आपण त्यांचा एखादी मनाविरुध गोष्ट केली की ते लगेच म्हणतात काय लका त्यामुळ ते ” Kylaq – काय लका ” जुळल्यासारखं वाटलं बर असो.
आता च्या घडीला मार्केट मधे सब कॉम्पैक्ट SUV या कॅटेगरीत खूप कॉम्पिटिशन आहे. टाटा, महिंद्रा, सुझुकी सारख्या मोठ्या प्लेसर्स मधे खूप चढाओढ पाहायला मिळते आहे आणि कारण पण तस आहे. भारतीय ग्राहक स्मॉल कॉर्स ना बाय बाय करून सब कंपट SUV घेण्यास प्राधान्य देतात. मागच्या महिन्याच्या ऑक्टोबर 2024 चा चा car सेल्स. रिपोर्ट पहिला तर ब्रेझा 16 हजार +, नेक्सॉन 14 हजार + आणि 3X0 9 हजार + विकल्या गेल्या आहेत. म्हणजे इतका जबरदस्त सेल या केटेगरी मधे आहे. आता यात स्कोडा Kylaq ने एंट्री केली आहे ज्यामुळे ही कॅटरगरी सॅचुरेट होण्याऐवजी एक्सपांड होईल कारण लोकांकडे अनेक ऑप्शन आहेत.
पण Kylaq मध्ये ग्राहक खेचायचे गुण आहेत का? बघुयात.
कलर्स –
Kylaq मध्ये एकूण सहा रंग दिले आहेत यामधे लावा ब्लू, टोर्नेडो रेड, कार्बन स्टील, ब्रिलियंट सिल्वर आणि कैंडी व्हाइट यांच्या सह एक नवा ऑलिव गोल्ड कलर ऑप्शन या मधे जोडला आहे.
डायमेन्शन्स –
Kylaq ची लांबी 3995 mm रुंदी 1783 mm आणि उंची 1619 mm आणि व्हील बेस 2566 mm मिळतो.. ग्राउंड क्लीयरेंस 189 mm दिला आहे.. Kylaq ची मेन USP आहे बूट स्पेस – 446 Litres बूट स्पेस ऑफर केला आहे..
डिझाईन & फिचर्स –
Kylaq एक मिनी कुशाक दिसते. Kylaq ची फ्रंट ग्रिल आणि मागचा भाग बराच सा मिळता जुळता आहे. या गाडीत डायमंड कट 17 इंच अलॉय व्हील्स मिळतात. इंटीरियर मधे 10 इंच इन्फोटेनमेंट स्क्रीन दिली आहे, एम्बिएंट लाइटिंग, 6 स्पीकर्स, डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर, सनरूफ, ऑटो एसी, टिल्ट एंड टेलिस्कोपिक एडजस्टबल स्टीरिंग, ऑटो डिमिंग IRVM, क्रुझ कंट्रोल, व्हेंटिलेटेड सिट्स, वायरलेस फ़ोन चार्जर, रिअर एससी वेंट्स, तीन एडजस्टबल हेड्रेस्ट यांसारखे फीचर्स दिले आहेत.
सेफ्टी –
सेफ्टी च्या दृष्टीने यामधे 6 एअरबॅग्स, ABS + EBD, ट्रैक्शन कंट्रोल, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल,ISOFIX चाइल्ड सीट माउंटिंग पॉइंट, ऑटो हेडलॅम्प & वायपर यांसारखे फीचर्स दिले आहेत.. स्कोडा ची हिस्ट्री पाहता ही गाडी BNCAP मध्ये ५ स्टार सेफ्टी रेटिंग मिळवेल.
इंजिन –
Kylaq मधे 1.0 लीटर TSI पेट्रोल इंजिन सोबत 6 स्पीड मॅन्युअल आणि 6 स्पीड ऑटोमैटिक गिअरबॉक्स ऑप्शन दिला आहे. हे इंजिन 114 बीएचपी आणि 178 एनएम टॉर्क प्रोड्यूस करते. गाडीचा परफॉरमेंस हा पंची आणि स्पोर्टी असेल. गाडी 0 ते 100 चे टॉप स्पीड अवघ्या 10.5 सेकंदात अचिव्ह करते.
वेरिएंट्स –
स्कोडा हा ब्रांड ग्राहकांना जास्त कंफ्यूज करत नाही सरळ सोट ऑप्शन ठेवतो त्यामुळे Kylaq मधे अवघे 4 वेरिएंट्स आहेत ज्यामध्ये क्लासिक, सिग्नेचर, सिग्नेचर + आणि प्रेस्टीज अशे वेरिएंट्स आहेत. जी 7.89 लाख रुपये किमत कंपनीने सांगितली आहे ती क्लासिक मॉडल ची आहे. इतर वेरिएंट च्या किमती जाहीर झाल्या नाहीत.
प्रतिस्पर्धी कार्स –
सध्या टॉप सेलिंग असलेली ब्रेझा 8.34 लाखां पासून सुरू होते तर सेकंड टॉप सेलिंग टाटा नेक्सॉन 8 लाखांपासून सुरू होते.. किया सोनेट आणि ह्युंदाई वेन्यू सुद्धा महाग आहे तर XUV 3XO 7.79 लाखांपासून सुरू होते. या मानाने जर्मन ब्रांडची Kylaq 7.89 लाखांपासून सुरू होते त्यामुळे प्राइस एक मोठा पॉजिटिव पॉइंट या गाडीचा असेल.
स्कोडा आणि महिंद्राची भारतात लवकरच पार्टनरशिप होणार आहे त्यामुळे ही गाडी महिंद्रा च्या अंडर येईल ज्याने पोर्टफोलियो तर वाढेलच पण महिंद्रा ग्राहकांची नस ओळखते ज्याने ही गाडी लोक घेतील अशी योजना कंपनी नक्कीच आखेल. जर Kylaq ची किंमत पहिली तर महिंद्रा ने 3×0 प्रमाणेच ठेवली आहे जी इतर गाड्यांपेक्षा स्वस्त आहे त्यामुळे गाडीचे टॉप मॉडल सुद्धा कमी किमतीत मिळेल.
जय महाराष्ट्र.