भारतातील केरळमध्ये रेनॉल्ट डस्टर 2025 चे पहिले स्पेशल बघायला मिळालेले आहेत ज्यामध्ये ही एसयूव्ही ची रस्त्यावर टेस्ट करत असताना दिसून आलेली आहे. 2025 मध्ये लॉन्च होणारी 5 सीटर रेनॉल्ट व्हेरियंट आणि 2026 साठी अपेक्षित असणारी 7 सीटर रेनॉल्टचे व्हेरिएंट लॉन्च होणार आहे. चला जाणून घेऊया रेनॉल्ट डस्टर 2025 चा गेम चेंजर लुक आणि फीचर्स.
नवीन डस्टर डिझाइन आणि इंटीरियर
रेनॉल्ट ची न्यू जनरेशन डस्टर ही तुर्की मध्ये बनवली गेलेली असून ही जो लॉन्चिंग सुद्धा तुर्की मध्ये झालेला आहे ग्लोबल वर्जन मध्ये या कारला दुहेरी इंधन म्हणजेच गॅसोलीन आणि एलपीजी यात सोबत स्ट्रॉंग हायब्रीड आणि माइल हायब्रीड या पर्यायामधून उपलब्ध केले होते, ज्यामध्ये 17 इंचाची चाके, एलईडी लाईट्स आणि 10.1 इंचाची इन्फोटेनमेंट सिस्टीम सोबत 7 इंचाचा डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर यांचा समावेश होता.
प्रत्येक भारतीयाला आवडेल असा लुक आणि फीचर्स या गाडीमध्ये देण्यात आलेला आहेत या गाडीची खासियत म्हणजे बाहेरील बाजूची मस्क्युलर आणि मजबूत आहे. भारतीय बाजारपेठेतल्या ट्रायबर, क्विड यांसारख्या वाहनांच्या स्पर्धेत रेनॉल्टने ओल्ड लुक असणाऱ्या मूळ रेनॉल्ट डस्टर ला पुन्हा नव्याने सादर केलेला आहे.