साधारणरित्या एखादी कार चाचणी दरम्यान बऱ्याच वेळा ही महामार्गावर किंवा खराब रस्त्यावर धावताना दिसत असते, पण Tata Harrier EV ही कार मात्र नुकतीच रेसट्रॅकवर धावताना दिसलेली आहे आणि नाविन्य याच गोष्टीचा वाटतं की अशी कोणते फीचर्स किंवा अशा कोणत्या गोष्टी या कारमध्ये असतील ज्या कारणामुळे या कारला रेसट्रॅकवर टेस्ट केलं जातंय. चला जाणून घेऊया आगामी Harrier EV ची संपूर्ण माहिती. Why was Tata Harrier EV driven on a racetrack?
टाटा हॅरियर ईव्ही स्पायड रेसट्रॅक
टाटाकडे एक असामान्य अशी ईव्ही आर्किटेक्चरची कार्यक्षमता आहे , ज्यामध्ये टाटा कारच्या चेसिसमध्ये खालच्या बाजूला बॅटरी पॅक (फ्लोअर-माउंट केलेल्या बॅटरी पॅक ) बसवू शकतो, याचा फायदा म्हणजे वाहनाला गुरुत्वाकर्षणाचे केंद्र कमी मिळते, परिणामी वाहन चांगली रेंज मिळते आणि संतुलित ड्राईव्ह करू शकते. हॅरियर ईव्हीची तुलना Mahindra XEV 9e Price सोबत केली जाऊ शकते, महिंद्राच्या या गाडीमध्ये सुमारे 268 PS आणि 380 NM टॉर्क तयार करणारी बॅटरी दिली गेलेली आहे, शिवाय यामध्ये एकच मोटर दिलेली आहे जी मागच्या चाकांना पॉवर देते. या कारची डिझाईन चालू Harrier ICE असणाऱ्यासारखीच असेल, बंद ग्रील सोबत डिझाईन मध्ये कट्स आणि नवीन फाशिया असेल, आणि 19 इंचाचे येरोडायनामिक अलॉय व्हील्स असतील.
हेपण वाचा: Tata Motors Rewire: Scrap your Vehicle Online टाटा मोटर्स रिवायर
हॅरियर ईव्ही परफॉर्मन्स
पण महिंद्राच्या या गाडीच्या तुलनेत हॅरियर ईव्हीमध्ये ड्युअल मोटर AWD लेआउट असू शकते. आता जेव्हा टाटा हरियर इवी ही रस्त्यावर धावण्याऐवजी रेस कोर्समध्ये धावताना दिसते तेव्हा बऱ्याच जणांच्या अपेक्षा सुद्धा वाढतात. टाटा हरिअर टीव्हीच्या बॅटरी ची माहिती देता यामध्ये 60 60 kWh लिक्विड-कूल्ड लिथियम-आयन बॅटरी पैक आहे, जो एकदा चार्ज केल्यावर सुमारे पाचशे किलोमीटर पर्यंत येतो याच सोबत या कारमध्ये ऑल व्हील ड्राईव्ह सोबत आणि डीसी फास्ट चार्जिंग सपोर्ट सुद्धा मिळतो ज्यामुळे फक्त 40 मिनिटात गाडी 80 टक्के पर्यंत चार्ज होते.