टाटा ने लाँच केली ही लोकप्रिय ऑटोमॅटिक सीएनजी कार, १ किलो मध्ये धावते 28 kmpl किमत फक्त

भारतीय कार मार्केट मध्ये सीएनजी वाहनांची मागणी जबरदस्त आहे पण ग्राहक ड्राइविंग कम्फर्ट साठी सीएनजी ईंधनसह आटोमेटिक ट्रांसमिशनची मागणी करत होते. बजारपेठेतील हा गॅप बघून संधीचे सोन, टाटा मोटर्स ने केलेल या ठिकाणी पहायला मिळत आहे. टाटा मोटर्स ने त्यांच्या टिआगो आणि टीगोर या कार्स नुकत्याच सीएनजी प्लस आटोमेटिक गियरबॉक्स सह लॉन्च केल्या आहेत. टाटा टिआगो या ऑटोमॅटिक सीएनजी कार ची किंमत रु.7.90 लाखांपासून सुरु होते. टिगोर या ऑटोमॅटिक सीएनजी कार ची किंमत रु.8.85 लाखांपासून सुरु होते. दोन्ही व्हेरिएंट मध्ये कंपनीने 28 किलोमीटर प्रति किलो सीएनजी साठी मायलेज क्लेम केले आहे. आजच्या या विडिओ मध्ये जाणून घेउया टिआगो आणि टीगोर च्या ऑटोमॅटिक सीएनजी व्हेरिएंट ची सर्व माहिती. 

Tata Tiago CNG AMT & NRG CNG AMT

Tata Tiago CNG AMT NRG CNG AMT

व्हेरिएंट आणि इंजिन

टिआगो च्या XT, XZ+ आणि XZ NRG या तीन व्हेरिएंट्स मध्ये सीएनजी ऑटोमॅटिक गेअरबॉक्स पर्याय दिला जाणार आहे. तीन हि व्हेरिएंट मध्ये सेम 1.2 लीटर रेव्ट्रॉन थ्री सिलेंडर पेट्रोल इंजिन दिले जाईल जे पेट्रोल मोड मध्ये  3300 RPM वर 113 Nm आणि सीएनजी मोड मध्ये 3500 RPM वर 95 Nm टॉर्क जनरेट करते. या इंजिन सोबत आता 5 स्पीड ऑटोमॅटिक टॉर्क कन्व्हर्टर ट्रान्समिशन दिले जाईल. या गाडीत कंपनीने 35 लिटर पेट्रोल टॅंक आणि 8 ते 8.50 किलो  कॅपॅसिटी असणारा सीएनजी टॅंक दिला आहे. ऑटोमॅटिक ट्रान्समिशन सह कंपनीने सीएनजी मोड मध्ये 28.06 प्रति किलो मायलेज क्लेम केले आहे. 

डायमेन्शन्स

डायमेन्शन्स मध्ये काही बदल केलेला नाही. टिआगो पेक्षा टिआगो एनर्जी लांबीला 37 mm ने जास्त आहे आणि ग्राउंड क्लिअरन्स मध्ये टिआगोला 168 mm तर एनर्जी मध्ये 177 mm दिला आहे. या गाडीमध्ये टॉप मॉडेल मध्ये देखील अलॉय व्हील दिले जात नाहीत. हायपर स्टाईल स्टील व्हील दिले जातात. टाटा मोटर्स ने गाडीच्या सस्पेन्शनला रि-ट्युन केले आहे. 

  • Tiago iCNG – लांबी 3765 mm x रुंदी 1677 mm x उंची 1535 mm | व्हीलबेस – 2400 mm | ग्राउंड क्लिअरन्स – 168 mm | व्हील साईज – ड्युअल टोन हायपरस्टाईल – 175/65 R14
  • Tiago NRG iCNG – लांबी 3802 mm x रुंदी 1677 mm x उंची 1537 mm | व्हीलबेस – 2400 mm | ग्राउंड क्लिअरन्स – 177 mm । ड्युअल टोन हायपरस्टाईल – 175/65 R14

फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

टिआगो मध्ये 7 इंच हरमन टच स्क्रीन आणि त्या सोबत 4 स्पिकर्स आणि 4 ट्विटर्स पेअर केले आहेत, यामध्ये Apple CarPlay आणि  Android Auto चालते. Steering Mounted Audio & Phone Controls दिले आहेत. 2.5 इंच इंटस्ट्रुमेन्ट पॅनल दिला आहे. टॉप XZ+ मध्ये ऑटोमॅटिक आणि बाकी व्हेरिएंट मध्ये मॅन्युअल एसी दिला आहे. इलेक्ट्रिक ORVMs, हाईट अडजस्टेबल ड्रायव्हर सीट, एलईडी डीआरएल्स आणिऑटोमॅटिक प्रोजेक्टर हेडलॅम्प, टाईप सी चार्जिंग पोर्ट असे फीचर्स गाडीत दिले आहेत.  

सेफटी फीचर्स

2 फ्रंट एअर बॅग, 3 पॉईंट सीटबेल्ट, रिअर पार्किंग सेन्सर्स, स्पीड डिपेंडेंट ऑटो डोर लॉक, रिअर पार्किंग कॅमेरा आणि सेन्सर्स, टीपीएमएस, ब्रेकिंग साठी एबीएस, इबीडी विथ कॉर्नर स्टॅबिलिटी कंट्रोल असे फीचर्स दिले आहेत. टाटा टिआगो हे टिगोरचे हैच बॅक व्हर्जन असल्याने तीच 4 स्टार सेफटी हि गाडी देखील कॅरी करते. 

प्राईज 

टिआगो सीएनजी एएमटी  XTA, NRG XZA आणि XZA+ व्हेरिएंट मॅनुअल सीएनजी च्या तुलनेने रु.55,000 रुपयांनी महाग आहे. टिआगो XTA ऑटोमॅटिक ची एक्स-शोरूम किंमत 7 लाख 90 हजार रुपये, NRG XZA ची एक्स-शोरूम किंमत 8 लाख 80 हजार रुपये आणि XZA+ व्हेरिएंट ची किंमत 8 लाख 80 हजार रुपये आहे. 

Ex-showroom Price
VariantCNG ManualCNG AMT
Tiago XTARs 7.35 lakhRs 7.90 lakh
Tiago NRG XZARs 8.25 lakhRs 8.80 lakh
Tiago XZA+Rs 8.25 lakhRs 8.80 lakh

Tata Tigor CNG AMT

Tata Tigor CNG AMT

व्हेरिएंट आणि इंजिन

टिगोरच्या फक्त XZ आणि XZ+ या दोनच व्हेरिएंट मध्ये  सीएनजी ऑटोमॅटिक गेअरबॉक्स पर्याय दिला आहे. या गाडीत टियागोचे सेम 1.2 लीटर रेव्ट्रॉन थ्री सिलेंडर पेट्रोल इंजिन दिले जाईल जे पेट्रोल मोड मध्ये  3300 RPM वर 113 Nm आणि सीएनजी मोड मध्ये 3500 RPM वर 95 Nm टॉर्क जनरेट करते. या इंजिन सोबत आता 5 स्पीड ऑटोमॅटिक टॉर्क कन्व्हर्टर ट्रान्समिशन दिले जाईल. या गाडीत कंपनीने 35 लिटर पेट्रोल टॅंक आणि 8 ते 9 किलो  कॅपॅसिटी असणारा सीएनजी टॅंक दिला आहे. ऑटोमॅटिक ट्रान्समिशन सह कंपनीने सीएनजी मोड मध्ये 28.06 प्रति किलो मायलेज क्लेम केले आहे. 

डायमेन्शन्स

टिआगो प्रमाणेच या गाडीच्या डायमेन्शन्स मध्ये देखील काही बदल केलेला नाही. टिगोरमध्ये 2450 एमएम व्हील बेस दिला आहे जो टिआगो पेक्षा जास्त आहे त्यामुळे केबिन मध्ये थोडा जास्त स्पेस मिळेल, 165 एमएम ग्राउंड क्लिअरन्स दिला आहे जो टिआगो पेक्षा कमी आहे आणि 175/5 आर 14 इंच हायपर स्टाईल व्हील रिम दिले आहेत यात देखील अलॉय व्हील दिले जात नाहीत. 

  • Tiago iCNG – लांबी 3993 mm x रुंदी 1677 mm x उंची 1532mm | व्हीलबेस – 2450mm | ग्राउंड क्लिअरन्स – 165 mm | व्हील साईज – ड्युअल टोन हायपरस्टाईल – 175/65 R14

फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

टिगोरऑटोमॅटिक सीएनजी व्हेरिएंट मध्ये Premium Piano Black Finish ORVMs, Front Fog Lamps, R14 Hyperstyle Wheels,  LED DRLs, Projector Headlamps विथ ऑटो फंगशन्स, रेन सेन्सिंग वायपर्स,  Premium Leatherette Seats  ऑपशन, Rear Power Outlet, 7 इंच हरमन टच स्क्रीन आणि त्या सोबत 4 स्पिकर्स आणि 2 व 4 ऑपशन मध्ये  ट्विटर्स पेअर केले आहेत, यामध्ये Apple CarPlay™ & Android Auto™  चालते. Steering Mounted Audio & Phone Controls दिले आहेत. फुल डिजिटल इंटस्ट्रुमेन्ट पॅनल दिला आहे. Tinted Glass, Cooled Glove Box, Push Button Start with Keyless Entry असे कन्विनिएंट फीचर्स दिले आहेत.

सेफटी फीचर्स

Day & Night IRVM, 2 फ्रंट एअर बॅग, 3पॉईंट सीटबेल्ट, रिअर पार्किंग सेन्सर्स, स्पीड डिपेंडेंट ऑटो डोर लॉक, रिअर पार्किंग कॅमेरा आणि सेन्सर्स, टीपीएमएस, ब्रेकिंग साठी एबीएस, इबीडी विथ कॉर्नर स्टॅबिलिटी कंट्रोल असे फीचर्स दिले आहेत. टाटा टिगोरला ग्लोबल एनकॅप मध्ये 4 स्टार सेफटी मिळाली आहे. 

प्राईज

टाटा टिगो रXZA आणि XZA+ सीएनजी च्या मॅन्युअल ट्रान्समिशन आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन मध्ये 60 हजार रुपयांची वाढ आहे. XZA च्या CNG AMT व्हेरिएंट ची एक्स-शोरूम किंमत 8 लाख 85 हजार रुपये आणि XZA+ ची किंमत 9 लाख 55 हजार रुपये आहे.

Ex-showroom Price
VariantCNG ManualCNG AMT
Tigor XZARs 8.25 lakhRs 8.85 lakh
Tigor XZA+Rs 8.95 lakhRs 9.55 lakh

 

वाचा – Tata Punch EV Prices: पंच ईव्ही सर्व मॉडेल्सच्या महाराष्ट्रातील ऑन रोड किमती (फेब्रुवारी)

Last Words

सध्या मार्केट मध्ये टाटा मोटर्स च एकमेव कंपनी आहे जी सीएनजी मध्ये ऑटोमॅटिक ट्रान्समिशन पर्याय देत आहे. मॅन्युअल साठी ग्राहकांकडे दुसरे पर्याय असले तरी ऑटोमॅटिक मध्ये टाटा मोटर्स हा एकच पर्याय असणार आहे. जय महाराष्ट्र

Photo of author

Ajinkya Sidwadkar

२०१० पासून ब्लॉग लिखाण करणारा अजिंक्य सध्या एक मराठी युट्युबर असून त्याला ऑटो मोबाइल क्षेत्रातील माहिती लिहिण्याची आवड आहे.

Leave a Comment