टाटा मोटर्सच्या अपकमिंग फॅमिली कार 2025- Tata Motors upcoming cars

Published:

टाटा मोटर्सने आत्तापर्यंत एक से बढकर एक वाहने बाजारात आणलेले आहेत. ज्यामध्ये टाटा अल्ट्रोझ रेसर, टाटा नेक्सॉन, टियागो यांसारख्या बेस्ट फॅमिली कार्स यांचा समावेश आहे, पण ही झाली टाटाच्या 2024 पर्यंतच्या कारची यादी ; तुम्हाला जर टाटा मोटर्सचे अजून नव्याने येणाऱ्या वाहनांची माहिती हवी असेल तर सदर माहिती वाचा. या माहितीमध्ये तुम्हाला 2025 च्या या नवीन वर्षात टाटा मोटर्स कोणकोणते ICG आणि इलेक्ट्रिक अपकमिंग फॅमिली कार लॉन्च करणार आहे, त्या वाहनांची किंमत काय असणार आहे ? फीचर्स काय असणार आहेत? किती तारखेला लॉन्च करणार आहेत? याची संपूर्ण माहिती दिलेली आहे. Tata Motors upcoming cars 2025

2025 Upcoming Cars

Tata Sierra EV Price

टाटाच्या या इलेक्ट्रिक सियारा कारची किंमत 25 लाख ते 30 लाख दरम्यानची असून ही किंमत एक्स शोरूम आहे. या कारचे अनावरण 16 जानेवारी 2025 या दिवशी असून कारला ‘मे 2025’ मध्ये लॉन्च करण्यात येईल. या कारचे अनावरण 16 जानेवारी 2025 या दिवशी असून कारला मे 2025 मध्ये लॉन्च करण्यात येईल

टाटा सियारा ईव्ही लेटेस्ट अपडेट

लेटेस्ट अपडेट मध्ये ही कार टाटा सियारा ईव्ही भारत मोबिलिटी एक्सपो 2025 मध्ये सादर करण्यात येईल, शिवाय या कारचे ICE इंजिन मॉडल 2025 मध्ये लॉन्च केली जाईल, टाटा मोटर्स ने 2024 मध्ये अनेक वाहने लॉन्च केले आहेत, त्यामधलीच टाटा सियारा ईव्ही एक मॉडल आहे. या कारला टाटाच्या हॅरियर आणि सफारी सारखेच 2.0 लिटरचे डिझेल इंजिन मिळू शकते शिवाय नवीन T-GDi टर्बो-पेट्रोल इंजिनमध्ये सुद्धा ही कार उपलब्ध आहे. या एसयूव्हीमध्ये ऍडव्हान्स फीचर्स दिले गेले असून तिची किंमत 25 लाख पासून सुरू होत आहे.

Tata Avinya Price

टाटा अवन्या ही कार 2025 दरम्यान लॉन्च होणार असून या कारची किंमत साधारण 30 लाख ते 60 लाख दरम्यान असेल, या कारमध्ये ऍडव्हान्स फीचर्स दिलेले आहेत, ज्यामध्ये पॅरामिक सनरूफ, दोन-स्पोक, फ्लोटिंग इन्स्ट्रुमेंट कन्सोल, फ्लॅट बॉटम स्टेरिंग व्हील आणि डॅशबोर्ड सोबत इतर फिचर्स दिले गेले आहेत. या मॉडेलमध्ये किमान 500 किलोमीटरचा बॅटरी पॅक दिला जाऊ शकतो जो फक्त 30 मिनिटापेक्षा कमी वेळेत चार्ज होऊ शकतो.

Tata Harrier EV Price

टाटा हरियर ईव्हीचं 2025, 15 जानेवारी रोजी अनावरण होईल आणि मार्च 2025 मध्ये ही कार लाँच होऊ शकते, या कारच्या लेटेस्ट अपडेट मध्ये ह्या कारला ऑल विल ड्राईव्हचा –  AWD ऑप्शन मिळणार आहे. ही इलेक्ट्रिक कार ऑटोमॅटिक असून साधारण 24 लाखापासून या कारची किंमत सुरू होणार आहे ही 5 सीटर असेल जिला टाटा कर्वसारखे आधुनिक ग्रील दिले जाणार आहेत.

Photo of author

Aishwarya Potdar

मला ऑटोमोबाइल फिल्डमधली माहिती वाचायला आणि या ब्लॉगच्या मदतीने तुमच्यापर्यंत सरळ, सोप्या मराठी भाषेत मांडायला खूप आवडते. २०१९ पासून मी ह्या क्षेत्रात वेगवेगळ्या ब्लॉगवर काम करत आहे. तुम्हाला ह्या पेजवर नवीन कार, इलेक्ट्रिक कार-बाईक आणि स्कूटर याचसोबत ऑटोमोबाईलमधील येणारे नवे अपडेट यांची संपूर्ण माहिती मिळेल.

Leave a Comment