टाटा नेक्सॉन i-CNG ला मिळणार ‘भरपूर बूटस्पेस’, भारतातील पहिली टर्बो सीएनजी कार

आत्तापर्यतच्या टाटाच्या इतर गाड्यांमध्ये टाटा नेक्सॉन ही अशी SUV आहे , ज्या गाडीला पेट्रोल, डिझेल, इलेक्ट्रिक आणि आता पेट्रोलसह i-CNG व्हेरिएंट्स चा पर्याय मिळाला आहे. ह्या गाडीची खासियत असणार आहे, या गाडीची ‘बट स्पेस’, जी  तब्बल 230 लिटर्स ची असणार आहे. बऱ्याच जणांची अशी तक्रार असते कि, ‘सीएनजी गाडीत CNG सिलिंडर मुळे हवी तशी जागा मिळत नाही ‘,पण टाटाने ह्या प्रॉब्लम वर कायमचं सोलुशन काढलंय, या मोठ्या बूट स्पेस असणाऱ्या टाटा नेक्सॉन i-CNG ला लॉन्च करून..!

यंदा टाटा नव्या गाड्या लॉन्च करायला हयगय काय करत नाहीये..! टाटाच्या लागोपाठ ‘एक से बढकर एक’ गाड्या बाजारात धुमाकूळ घालतायेत. टाटाने नेक्सॉन SUV चे पेट्रोल, डिझेल आणि इलेक्ट्रिक व्हेरियंट लॉन्च करून मार्केट tight केलं तर होतंच; पण भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो 2024 मध्ये टाटाने नेक्सॉन चे i-CNG version लॉन्च करून सारख्या कंपन्यांच्या तोंडच पाणी पळवलंय, थोड्या दिवसातच आपल्याला नेक्सॉन सीएनजी रोडवर ऐटीत पळताना दिसणार आहे.

टाटा नेक्सॉन i-CNG खासियत

लोकप्रिय नेक्सॉन चे नवीन व्हेरिएंट्स टाटा सोबत वापरकर्त्यासाठी खूप खास असणार आहे; याच कारण i-CNG पॉवरट्रेन चा ऑप्शन मिळणारी टाटांची  आणि भारतातील पहिली टर्बोचार्ज कॉम्पॅक्ट एसयूव्ही वाहन असणार आहे आणि दुसरी गोष्ट या गाडीत सीएनजी सिलिंडर असूनदेखील मिळणार मोठी आणि specious अशी 230 litres ची बूटस्पेस. नेक्सॉन CNG मध्ये  फॅक्टरी-फिटेड CNG सिलेंडरना स्पेअर व्हील बूटच्या खाली ठेवलं आहे, ज्यामुळे गाडीत कमाल अशी मोठी जागा मिळत आहे.

वाचा: नव्या ‘यामाहा निओ इलेक्ट्रिक स्कूटरला’ मिळणार, Ola आणि Ather सारखी खासियत

टाटा नेक्सॉन फीचर्स

नेक्सॉन CNG मध्ये तुम्हाला एकटे चांगले plus- pointed फीचर्स मिळणार आहेत ज्यामध्ये, मॉड्युलर फ्युएल फिल्टर, लीक डिटेक्शन फेल्युअर ,लीकेज-प्रूफ मटेरियल, थर्मल इक्वेंट प्रोटेक्शन,मायक्रो स्विच,  सिंगल ऍडवान्सड ECU, गाडी डायरेक्ट स्टार्ट होईल असा CNG मोड, इंधन दरम्यान वापरात येणारे ऑटो स्विच यांचा समावेश असणार आहे. 

वाचा: हिरो मेवरिक 440: हंटर 350 ची छुट्टी करायला, हिरोची ‘क्रूझर बाईक’ लाँच

iCNG कार विकत घेण्याचे फायदे

i-CNG हि एक अशी टर्म आहे, जिच्यामुळे गाडी थेट CNG मोडमध्ये कार सुरू होते, पण इतर CNG गाड्यांच्या तुलनेत हा पर्याय मिळत नाही.

  • iCNG कार मध्ये काही कारणास्तव गॅस गळती झाल्यास automatic सीएनजी मोडचा वरून पेट्रोल मोडवर बदल होतो, गाडीत बसणाऱ्या प्रवाश्यांचा अधिक सुरक्षा मिळण्यासाठी CNG सिलेंडरमधून गॅस वातावरणात गॅस सोडला जातो,ज्यामुळे प्रवाश्यांची योग्य प्रकारे सुरक्षा राखली जाते.
  • नवीन i-CNG कार मध्ये तडजोड न केलेली boot space मिळते.
  • नवीन i-CNG  मध्ये सेफेटी वैशिष्ट्ये आणि प्रीमियम फीचर्स मिळतात.

नेक्सॉन iCNG किंमत

नेक्सॉन iCNG बाबतीत इतर माहिती जरी बाहेर नसली तरी साधारण ५० लाख रुपये इतकी या वाहनांची किंमत असण्याची शक्यता मांडली जातेय. टाटाच्या सेगमेंट्स मधल्या इतर गाड्या जसं टाटा Tiago NRG iCNG ची किंमत 7.65 लाख ते 8.10 लाख इतकी आहे तर टाटा टियागो iCNG ची किंमत 6.55 लाख ते 8.20 लाख रुपये आहे.

वाचा: महाराष्ट्रात पेट्रोल,डिझेल,सीएनजी(CNG) दर(LIVE):आजचा भाव 31 जानेवारी 2024

टाटा नेक्सॉन iCNG च्या सोबतीला लॉन्च होणार टाटा नेक्सॉन EV डार्क एडिशन

भारत मोबिलिटी शोमध्ये टाटा मोटर्स ने हॅरियर ईव्ही, कर्व्ह आणि अल्ट्रोझ रेसरया वाहनाच्या कॉन्सेप्ट देखील डिस्प्ले मध्ये दाखवल्या आणि आता टाटा नेक्सॉन च्या iCNG मॉडेलसोबत टाटा नेक्सॉन EV डार्क एडिशन लॉन्च करून मार्केट दणकून टाकायच्या तयारीत दिसतंय कारण लवकरचं लॉंच होणार आहे नेक्सॉन EV Dark- नेक्सॉन ईव्ही डार्क

शब्दातच दडल्याप्रमाणे नेक्सॉन ईव्ही डार्क मध्ये सर्व घटक काळ्या रंगाचे bold आणि डार्क घटक मिळणार आहेत, black interior,black exterior आणि black alloys सोबत लाल कॉन्ट्रास्ट स्टिचिंग या गाडीत मिळणार आहे. लवकरच या गाडी बाबतीतली संपूर्ण माहिती तुमच्यासोबत शेअर केली जाईल.

Photo of author

Aishwarya Potdar

मला ऑटोमोबाइल फिल्डमधली माहिती वाचायला आणि या ब्लॉगच्या मदतीने तुमच्यापर्यंत सरळ, सोप्या मराठी भाषेत मांडायला खूप आवडते. २०१९ पासून मी ह्या क्षेत्रात वेगवेगळ्या ब्लॉगवर काम करत आहे. तुम्हाला ह्या पेजवर नवीन कार, इलेक्ट्रिक कार-बाईक आणि स्कूटर याचसोबत ऑटोमोबाईलमधील येणारे नवे अपडेट यांची संपूर्ण माहिती मिळेल.

Leave a Comment