Tata Punch 2024 Facelift – जे नको होत तेच झाल

टाटा पंच फेसलिफ्ट येणार म्हटल्यावर पंच ईव्ही सारखी डिजाइन आणि इंटीरियर असणार या आशेवर ग्राहक बसले होते पण कंपनीने जुनीच डिजाइन ठेऊन थोडे फिचर्स सामील केले आहेत आणि न्यू टाटा पंच म्हणून लाँच केले. ना कनेक्टेड डीआरएल, ना नव्या स्टाइल चे स्टेरिंग.

Published:

न्यू पंच म्हणत टाटा मोटर्स ने ग्राहकाना तोच माल फ्रेश करुन दिलाय अस वाटतंय. काय झालाय नवीन लाँच झालेल्या टाटा पंच बाबत? मायलेज किती मिळणार आहे, कोणते फिचर्स सामील झालेत आणि डिजाइन मध्ये काय बदल झालाय बघूयात.

2024 टाटा पंच फेसलिफ्ट लाँच

टाटा मोटर्स ची सर्वात फेमस मिनी एसयुव्ही पंच चे 2024 मॉडल छोट्या अपडेट सह लाँच झाली.

  • Adventure, Adventure Rhythm, Adventure S, Adventure+ S
  • Pure, Pure (O),
  • Accomplished+, Accomplished+ S
  • Creative+ and Creative+ S

महाराष्ट्रातील किंमत

फाइनली न्यू टाटा पंच लाँच झाली आहे. या गाडीची स्टार्टिंग प्राइस 6 लाख १3 हजार रुपयानंपासून सुरु होते आणि टॉप वेरियंट 9 लाख 45 हजारांपर्यंत जाते शिवाय तुम्हाला कंपनी १८ हजारांचे बेनेफिट्स सुद्धा देणार आहे. गाडीत टोटल 10 वेरिएंट्स दिले जातील ते पुढील प्रमाणे –

2024 टाटा पंच नवीन फिचर्स सामिल

पंच मध्ये आता १०.२५ इंच इन्फोटेनमेंट सिस्टम दिली जाणार आहे ही स्क्रीन wireless Android Auto and Apple CarPlay सपोर्ट करते. wireless charger, rear AC vents and a USB Type-C charging port सुद्धा आता पंच मध्ये दिला जाईल.

फ्रंट साठी मध्य भाग हँड्रेस्ट विद ग्रैंड कन्सोल सह अपडेट करण्यात आला आहे. या आधीच्या पंच मध्ये टॉप वेरिएंट साठी सन रूफ राखीव होते परंतु आता Adventure या लोअर ट्रिम मध्ये देखील सन रूफ मिळणार आहे.

इंजिन पॉवर, ट्रांसमिशन आणि मायलेज

या व्यतिरिक्त टाटा मोटर्स ने डिजाईन किंवा इंजिन मध्ये काही बदल केलेला नाहीये

टाटा पंच मध्ये 1.2L NA पेट्रोल इंजिन सह येते हे तेच पूर्वीचे इंजिन आहे, 5 स्पीड मैन्युअल किंवा AMT ट्रांसमिशन चा ऑप्शन नुसत्या पेट्रोल वेरिएंट सह उपलब्स आहे परंतु तुम्ही सीएनजी व्हेरिएंट घेत आहात तर फक्त मॅन्युअल ट्रांसमिशन दिले आहे.. टियागो आणि टिगोर सारखे सीएनजी AMT व्हेरिएंट अजून लाँच केलं नाही. ब्रांड सध्या नेक्सॉन सीएनजी च्या लाँच साठी रेडी होत आहे.

1.2 लिटर 3 सिलेंडर revtron इंजिन पेट्रोल मध्ये 87.8 पीएस आणि सीएनजी मध्ये 73.5 पीएस पॉवर तसेच पेट्रोल मध्ये 115 nm आणि सीएनजी मध्ये 103 nm टॉर्क प्रोड्यूस करते.

नव्या पंच मध्ये पेट्रोल ला 20 kmpl आणि सीएनजी मोड ला 27 kmkg च क्लेम माइलेज मिळेल. 37 लिटर पेट्रोल आणि 8 – 9 kg सीएनजी बसेल इतका टँक दिला जाईल. बाकी बूट स्पेस 210 लिटर, 187 एमएम ग्राउंड क्लिअरन्स, 15 इंच टायर, वॉइस असिस्टेड सन रूफ मिळेल, लांबी रुंदी उंची सेम असेल.

काही व्हेरिएंट नवीन तर काही डिस्कंटीन्यू

ब्रांड ने Pure Rhythm ही ट्रिम discontinue केली असून त्या जागी Pure (O) ऑफर होत आहे ज्यामध्ये central locking, all-power windows, electric adjustable ORVMs, and wheel covers दिले आहेत

  • Adventure S and Adventure + S हे नवे सन रूफ असणारे व्हेरिएंट ऑफर केले जाणार आहेत ज्यामध्ये armrest विद ग्रैंड कन्सोल आणि rear AC vents दिले आहेत.
  • Accomplished हे व्हेरिएंट आता बंद केलं आणि त्या जागी Accomplished + हे व्हेरिएंट मिळेल ज्यामध्ये 10.25 इंच टच स्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आणि इतर थोडे फार अपडेट दिले आहेत.
  • Creative व्हेरिएंट मध्ये आता Creative + आणि Creative + S या दोन ट्रिम्सचा समावेश केला आहे. या ट्रिम्स मध्ये तंत्रज्ञान अपग्रेडस दिले असून टाइप-सी पोर्ट, वायरलेस चार्जिंग पॅड यांसारखे प्रीमियम फिचर्स मिळतील.

टाटा पंच 2024 मध्ये फेसलिफ्ट न करता फक्त फिचर्स अपडेट करण्यात आले त्यामुळं तुम्ही नाराज आहात का? कमेंट करा.

Photo of author

Ajinkya Sid

२०१० पासून ब्लॉग लिखाण करणारा अजिंक्य सध्या एक मराठी युट्युबर असून त्याला ऑटो मोबाइल क्षेत्रातील माहिती लिहिण्याची आवड आहे.

Leave a Comment