टाटा मोटर्सने सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारी , भरपूर सेफ्टी आणि फीचर्स असणारी कार लॉन्च केलेली होती; टाटा पंच. टाटा पंच (ICE + EV) सेफ्टी मध्ये फाईव्ह स्टार क्रॅश रेटिंग सुद्धा मिळाले होते आता या कंपनीने 2024 मध्ये रेकॉर्ड ब्रेक अशी विक्री केलेली आहे ,भारतामध्ये इतर कार विक्रेत्यांच्या तुलनेत टाटा मोटर्सने फक्त त्यांच्या पंचला सर्वाधिक विकून टॉप कार सेलिंग च्या पहिल्या जागेवर नेऊन ठेवल आहे. Tata Punch Becomes No 1 in 2024
टाटा पंच : टॉप सेलिंग कार
याआधी भारतामध्ये टॉप सेलिंग कार कंपनी म्हणून मारुती सुझुकीकडे पाहिले जायचे पण आता 2024 च्या वर्षात टाटा मोटर्सने मारुती सुझुकीच्या जवळपास 40 वर्षाच्या कार्याला पूर्णविराम दिलेला आहे आणि आता टाटा मोटर्सने टॉप सेलर Nexon सोबत पंचला सुद्धा टॉप सेलिंग लिस्ट मध्ये आणले.
हेपण वाचा: Tata Punch 2024 Facelift
मारुती सुझुकी: Tata नंतरची टॉप सेलिंग कार कंपनी
2024 मध्ये मारुती सुझुकी ने त्यांच्या दोन गाड्यांची सर्वाधिक जास्त विक्री करून सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या कारच्या यादीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर नाव मिळवलं होतं, या दोन गाड्यांमध्ये WagonR च्या 1,90,855 आवृत्ती विकल्या आणि Ertiga जिच्या 1,90,101 आवृत्ती विकल्या होत्या. चार नंबरची टॉप कार सेलिंग कंपनी सुद्धा मारुती सुझुकीचा आहे, चौथा नंबरला मारुती सुझुकीची ब्रेझ्झा या मॉडेलचे जवळपास 1,86,919 आवृत्या विकल्या गेल्या होत्या. या यादीमध्ये पाच नंबरला असणारी कंपनी म्हणजे हुंडाई. हुंडाईची बेस्ट सेलर क्रेटा हिच्या जवळपास 1,86,919 आवृत्ती विकल्या गेल्या.
Tata Punch (ICE + EV) 2024 मध्ये नंबर 1
टाटा मोटर्स ने पंच आयसीई आणि इलेक्ट्रिक या दोन्हीचे मिळून जानेवारी ते मार्च या तिन्ही महिन्यापर्यंत 53,963 मॉडेल्स विकले होते. यानंतर एप्रिल ते जून पर्यंत तीन महिन्यांमध्ये 56,339 मॉडेल्स, जुलै ते सप्टेंबर पर्यंत तीन महिन्यात 45,475 मॉडेल्स आणि ऑक्टोंबर ते डिसेंबर पर्यंतच्या महिन्यात 46,248 मॉडेल्स विकले होते. एकूण वर्षभरात टाटा मोटर्सने 2,02,025 मॉडेल विकून पंचला भारतामध्ये टॉप सेलिंग कार म्हणून घोषित केले होते.