दीपिका-शाहरुख़च्या ह्युंदाई क्रेटा टीझरमुळे हँग झालं इंटरनेट , लॉन्चिंगच्या आधीच झाले हजारांच्यावर बुकिंग्स

नुकताच ह्युंदाई क्रेटा फेसलिफ्टचा नवीन टीझर आऊट झाला आहे ,जवळ-जवळ लाखो करोडोंमध्ये ह्या टीझरचे व्ह्यूज गेले आहेत, तुम्हालासुद्धा टिझर पाहून ही ह्युंदाईची नवीन क्रेटा विकत घेण्याचा विचार मनात येतोय का ? हा विचार सत्यात उतरवण्यासाठी ह्युंदाईने त्यांच्या ह्या नव्या The new Hyundai CRETA booking सुरू केलं आहे.

  • नवीन ह्युंदाई क्रेटा
  • काय आहे या द न्यू ह्युंदाई क्रेटा टीझरमध्ये?
  • नवीन ह्युंदाई क्रेटा लाँचिंग आधीच बुकिंग सुरू

ह्युंदाईची बहुचर्चित SUV द न्यू ह्युंदाई क्रेटाची अधिकृत लाँचिंग होण्यापूर्वीच, या गाडीची बुकिंग प्रक्रिया चालू होणार आहे,नव्या वर्षाच्या 16 जानेवारी 2024 रोजी, लॉन्च होणार असून, टॉप अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि लोकप्रिय अभिनेता SRK म्हणजेच शाहरुख खान द्वारे प्रदर्शित झालेला टिझर पाहून प्रेक्षकवर्ग या SUV बद्दल, अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आणि नवीन क्रेटाच बुकिंग करण्यासाठी उत्सुक झालं आहे.

The new Hyundai CRETA booking

काय आहे या ह्युंदाईच्या टीझरमध्ये?

सध्या सोशल मीडिया वर प्रचंड चर्चेत असणारा व्हिडीओ आहे तो म्हणजे क्रेटा फेसलिफ्ट टीझर, हा व्हिडीओ आपली राष्ट्रभाषा हिंदीमध्ये बनवला आहे. X म्हणजेच ट्विटर आणि Hyundai India या प्लेटफॉर्म वर व्हायरल होणाऱ्या टीझर व्हिडिओमध्ये, एका ऑफिसमधून दीपिका दिसते जिथे तिचा एक सहकारी येतो; ज्याच्या हातामध्ये टॅब असतो. सहकारी दीपिकाला टॅबकडे दर्शवून सांगतो की, ‘गेम मध्ये एकच राजा आहे’. टॅब मध्ये दिसणारा व्यक्ती हा दुसरा तिसरा कोणी नसून ‘रोमांसकिंग शाहरुख खान’ आहे. दीपिका टॅब मध्ये दिसणाऱ्या व्यक्तीकडे बघून म्हणते की, ‘राजा तू कुठे आहेस?’

यानंतरचा सीन थेट एका प्रयोगशाळेतला दाखवला आहे, जिथ राजा म्हणजे किंग शाह रुख खान गॅजेटवर काम करताना म्हणतो , ‘अब मज़ा आयेगा’ आणि त्यानंतर लगेच “लवकरच येत आहे” अश्या वाक्याचा उल्लेख होतो, व्हिडिओत काही ‘इंटरेस्टिंग सस्पेंस’ ठेवला आहे.

या गाडीमध्ये 1.5-लीटर पेट्रोल आणि डिझेल इंजिनसह 1.5-लिटर टर्बो-पेट्रोल इंजिन असून याबाबदल अधिक माहितीसाठी येथे क्लीक करा.

Hyundai Creta चे फेसलिफ्ट बुकिंग

तुम्ही ह्युंदाईची नवीन SUV कार घेण्यास इच्छुक असाल तर तुम्ही तुमच्या जवळच्या Hyundai डिलरजवळ जाऊन बुकिंग अमाउंट म्हणजेच टोकन रक्कम  रुपये भरून Hyundai Creta चे फेसलिफ्ट बुकिंग 25,000 रुपये भरून करू शकता, किंवा तुम्ही बाहेर कुठेही न जाता घरबसल्या एका क्लिकवर सुद्धा बुकिंग करू शकता, ज्यासाठी तुम्ही फक्त तुमच्या मोबाईल किंवा अन्य डिवाईसच्या मदतीने hyundai च्या मेन वेबसाइटवरून सोप्या पद्धतीने बुकिंग प्रोसिजर 25,000 रुपये भरून पुर्ण करू शकता.

वाचा: Electric Honda Activa: ठरलं! या तारखेला लाँच होणार इलेकट्रीक होंडा ऍक्टिवा

Photo of author

Ajinkya Sidwadkar

२०१० पासून ब्लॉग लिखाण करणारा अजिंक्य सध्या एक मराठी युट्युबर असून त्याला ऑटो मोबाइल क्षेत्रातील माहिती लिहिण्याची आवड आहे.

Leave a Comment