Top Mileage CNG Cars : स्वस्तात खरेदी करा या ५ बेस्ट मायलेज सीएनजी कार्स, वाचा किंमत

Ajinkya Sidwadkar

सध्या भारतीय मार्केट मध्ये अनेक कंपन्या सीएनजी कार्स लाँच करण्यास प्राधान्य देत आहेत. एक पॉकेट फ्रेंडली गाडी घेत असताना भारतीय त्या गाडीची किंमत कमी असावी व जास्तीत जास्त मायलेज प्रदान करणारी असावी या अपेक्षेने कार सर्च करत असतात अश्या वेळेस सध्या मार्केट मध्ये काही कार्स उपलब्ध आहेत ज्या 34.05 kg/km चे मायलेज आणि किमती सुद्धा कमी आहेत.

भारतातील टॉप ५ स्वस्त सीएनजी कार्स

वाढत्या पेट्रोल आणि डिझेल च्या किमती व मिडल ईस्ट मधील अस्थिरता यामुळे CNG (कंप्रेस्ड नॅचरल गॅस) हा पारंपारिक पेट्रोल आणि डिझेल इंधन पर्यायांसाठी पॉकेट-फ्रेंडली आणि पर्यावरण पूरक पर्याय आहेअलीकडच्या काळात सीएनजी वाहनांच्या खरेदीचा आकडा अनेक पटींनी वाढला आहे. सरकारचा सीएनजी कडे असणारा कल आणि ऑटो मेकर्स वर वाढणारा दबाव यामुळे सर्व प्रमुख कार उत्पादकांनी सीएनजी इंधन पर्याय आपल्या वाहनांमध्ये देणं सर्रास सुरु केले आहे. पेट्रोल पर्यायावर चालणाऱ्या वाहनांपेक्षा सीएनजी वर चालणारे वाहन किमती ने महाग असते. म्हणूनच तुमच्यासाठी मार्केटमध्ये सीएनजी इंधन पर्यायामध्ये टॉप ५ सर्वात परवडणाऱ्या सीएनजी कार्स ची यादी सविस्तर फीचर्स सह मांडली आहे.

मारुती सुझुकी अल्टो ८०० सीएनजी: ५.१२ लाख रुपये

Maruti Suzuki Alto800 1

👉🏻 कार, टू-व्हिलर्सच्या माहिती आणि ऑफर्ससाठी जॉईन करा व्हाट्सऍप ग्रुप 

५.१२ लाख रुपये एक्स-शोरूम किमतीमध्ये Alto 800 S-CNG एकाच LXi (O) ट्रिममध्ये उपलब्ध आहे. हि भारतातील एकमेव एंट्री-लेव्हल हॅचबॅक असून सर्वात परवडणारी आणि स्वस्त सीएनजी कार आहे. ५ स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन गेअरबॉक्स सह ७९६ सीसी ३ सिलेंडर इंजिन पर्यायात उपलब्ध असणारी हि छोटी कार ४० बीएचपी आणि ६० एनएम पीक टॉर्क निर्माण करते. या छोट्या कार साठी कंपनीने 31.59 kg/km मायलेज देण्याचा दावा कंपनीने केला असून ग्राहक या पेक्षा जास्त मायलेजची अपेक्षा ठेऊ शकतात. सर्वात कमी वेटिंग आणि छोट्या फॅमिलीसाठी हि एक उत्तम हॅचबॅक आहे.

मारुती सुझुकी अल्टो के १० एस – सीएनजी: ५.९५ लाख रुपये

k10

मारुती सुझुकी अल्टो के १० एस – सीएनजी या मॉडेलची एक्स-शोरूम किंमत ५.९५ लाख रुपये असून यामध्ये १.० लिटर ३ सिलेंडर, मॅन्युअल ट्रान्समिशन गेअरबॉक्ससह के१०सी पेट्रोल इंजिन सीएनजी इंधन पर्यायामध्ये उपलब्ध केले आहे. हे इंजिन ५६ बीएचपी आणि ८२.१ एनएम पीक टॉर्क निर्माण करण्यास सक्षम आहे. अल्टो के १० एस – सीएनजी मध्ये कंपनीने 33.85 kg/km चे मायलेज सांगितलेले आहे.

टाटा टिआगो आय-सीएनजी: ६.३५ लाखांपासून

tata tiago

टाटा टिआगो आय-सीएनजी मध्ये ग्राहकांच्या गरजेनुसार आणि बजेट नुसार ७ ट्रीम्स उपलब्ध करून दिल्या आहेत ज्याची एक्स-शोरूम किंमत ६.३५ लाख रुपयांपासून सुरु होते आणि ७.९० लाख रुपयांपर्यंत पोहोचते. टिआगो मध्ये शक्तिशाली १.२ लीटर ३ सिलेंडर रेव्होट्रॉन पेट्रोल इंजिन दिले जाते जे ७३ बीएचपी आणि ९५ एनएम पीक टॉर्क निर्माण करते. टाटा मोटर्स ने टॉप व्हेरिएंट XZ+ DT मध्ये देखील सीएनजी पर्याय दिलेला आहे. खिशाला परवडणारी आणि लग्झरी फीचर्स ने सुसज्ज टिआगो 26.49 kg/km मायलेज प्रदान करते.

Tata Safari, Harrier ने Global NCAP क्रॅश टेस्ट मध्ये किती सेफ्टी स्टार्स मिळवले जाणून घ्या

मारुती सुझुकी एस्प्रेसो सीएनजी: ५.९० लाखांपासून

spresso

मारुती सुझुकी सध्या टॉप १ पोजिशन वर कार विक्री मध्ये विराजमान आहे कारण सर्वात जास्त खिश्याला परवडणाऱ्या सीएनजी वाहनांची लिस्ट या कंपनीकडे आहे. त्याच लिस्ट मध्ये असलेली एस्प्रेसो सीएनजी LXi CNG (O) आणि VXi CNG (O) या दोन ट्रीम्स मध्ये उपलब्ध आहे. LXi CNG (O) या ट्रिम ची एक्स-शोरूम किंमत ५.९० लाख रुपये तर VXi CNG (O) या व्हेरिएंट ची किंमत ६.१० लाख रुपये इतकी आहे. गाडीत १.० लिटर ३ सिलेन्डर के१०सी पेट्रोल इंजिन सिले जाते. हि मशीन ५६ बीएचपी आणि ८२.१ एनएम पीक टॉर्क निर्माण करते आणि 32.73 kg/km चे मायलेज एका किलो सीएनजी मध्ये प्रदान करते.

मारुती सुझुकी वॅगनआर सीएनजी: ६.४३ लाखांपासून

wagonr

जर मागच्या ३ वर्ष्याच्या वाहन विक्री वर नजर फिरवली तर समजते कि कर विक्रीच्या बाबतीत टॉप ३ मध्ये वॅगनआर नेहमीच विक्रीच्या बाबतीत नंबर १ किंवा २ वर विराजमान असते. चांगले मायलेज आणि भारतीयांच्या बजेट मध्ये असणारी हि गाडी S-CNG टेक्नोलोंजि सह दोन ट्रिम, LXi एक्स-शोरूम किंमत ६.४३ लाख आणि VXi एक्स-शोरूम किंमत 6.86 लाख मध्ये उपलब्ध आहे. मी सांगितलेल्या सर्व यादीमध्ये हे वाहन सर्वात जास्त म्हणजे 34.05 kg/km चे मायलेज प्रदान करते.

वाचा – मारुती सुझुकी स्विफ्ट ADAS लेव्हल २ सह अपडेट होणार, देणार ४० kmpl चे मायलेज, जाणून घ्या खास माहिती

शेवट: मी सांगितलेल्या बजेट फ्रेंडली आणि पॉकेट फ्रेंडली सीएनजी वाहनामध्ये मारुती सुझुकी सर्वात अग्रस्थानी असल्याचे दिसते. सांगितलेल्या टॉप ५ सीएनजी कार्स तुम्ही चांगल्या मायलेज साठी डोळे झाकून घेऊ शकता.

👉🏻 कार, टू-व्हिलर्सच्या माहिती आणि ऑफर्ससाठी जॉईन करा व्हाट्सऍप ग्रुप 
Photo of author

Ajinkya Sidwadkar

२०१० पासून ब्लॉग लिखाण करणारा अजिंक्य सध्या एक मराठी युट्युबर असून त्याला ऑटो मोबाइल क्षेत्रातील माहिती लिहिण्याची आवड आहे.

Leave a Comment